पालक सहजपणे मुलांवर रागाने ओरडतात.मुलांना असे रागावून ओरडण्यापुर्वी त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल याबाबत पालक साधा विचार देखील करीत नाही.तुम्हाला असे वाटत असते की मुलांना कठोर शिक्षा देण्यापेक्षा अथवा कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर रागावणे ठीकच आहे.मात्र पालकांनी असे वागणे फारच चुकीचे असते.मुलांवर ओरडल्यामुळे त्यांचे जरी शारीरिक नुकसान होत नसले तरी यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो व त्यांच्या मानसिक स्वास्थावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो.
यासंदर्भात मुंबईच्या Psychiatrist and Sexologist डॉ.संघनायक मेश्राम यांच्याकडून जाणून घेऊयात मुलांवर पालकांच्या ओरडण्याचे,सतत सल्ले व टोमणे देण्याचे,इतर मुलांसोबत तुलना करण्याचे काय परिणाम होतात.तसेच मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा हे देखील जरुर वाचा.
जाणून घ्या मुलांवर पालकांच्या रागवण्याचे काय परिणाम होतात-
१.नवजात बाळ ते एक वर्षाचे बाळ-
या काळात बाळाला तुमच्याकडून प्रेम,काळजी,आपुलकी व नविन जगासोबत तडजोड करण्यासाठी ध्येर्याची गरज असते.डॉ. मेश्राम यांच्यामते जर तुम्ही बाळंतपणानंतर येणा-या नैराश्याने हैराण होऊन चिडून तुम्ही तुमच्या बाळावर याचा राग काढला तर त्याचे बाळावर वाईट परिणाम होऊ शकतात.खरेतर असे करणे हे फार चुकीचे आहे.कारण तुम्ही तुमच्या बाळाला ओरडून एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तुम्ही एक चिडलेली व्यक्ती आहात असे वाटू लागते.
काय परिणाम होतो-
डॉ.मेश्राम यांच्यामते या काळात बाळाला रागावल्यास त्यांना तो फक्त एक जोरात झालेला आवाज आहे असे वाटते.कदाचित यामुळे मुले चिडचिडी होतात व त्यांच्या झोपेमध्ये व्यत्यय येण्याची समस्या निर्माण होते.अगदी कधीतरी असे झाल्यास याचा मुलांवर याचा फार वाईट परिणाम होणार नाही पण सतत बाळावर असे ओरडणे मात्र नक्कीच योग्य नाही.
काय कराल-
बाळाला शांत करा,त्याला प्रेम करा,त्याच्यासोबत खेळा,त्याच्यासोबत प्रेमाने गप्पा मारा.यामुळे तुमच्या बाळाला सुरक्षित वाटेल व आराम मिळेल.
एक ते तीन वर्षांची मुले-
या वयात मुले फारच संवेदनशील असतात त्यामुळे या वयातील मुलांवर ओरडल्यास त्यांच्या मनावर याचे चुकीचे ठसे उमटतात.डॉ.मेश्राम यांच्यामते मुलांवर ओरडून शिस्त लावण्यापेक्षा त्यांना सुरक्षित वाटेल असे वागले पाहिजे.ओल्या लादीवरुन फिरताना अथवा टॉयलेट ट्रेनींग देताना किंवा अगदी जेवणावरुन देखील तुम्ही त्यांना जेव्हा ओरडता तेव्हा त्यांना खरेतर ते समजतच नसते.
काय परिणाम होतो-
या संवेदनशील वयात त्यांच्यावर ओरडल्यामुळे मुले अस्वस्थ होतात.सतत ओरडल्यामुळे त्याच्या आत्मविश्वास व मोकळेपणावर विपरित परिणाम होतो.अशा मुळे ते त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्यासमोर व्यक्त करत नाहीत.
काय कराल-
ओरडण्यापेक्षा तुमच्या मुलांसोबत प्रेमाने संवाद साधा.डॉ.मेश्राम यांच्यामते अशा परिस्थितीत मुलांना तुमच्या आधाराची अधिक गरज असते.त्यामुळे मुलांसोबत शांतपणे संवाद साधा तुम्हाला का ओरडावे लागले व त्याच्या या कृतीमुळे काय त्याचे नुकसान झाले हे त्याला समजावून सांगा.हे जरुर वाचा मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग !
तीन ते पाच वर्षाची मुले-
डॉक्टरांच्या मते हे मुलांचे एक अवघड वय असते.त्यामुळे या वयात तुमचे मुल त्याच्या आजूबाजूच्या लोकांसोबत कसे वागते याकडे नीट लक्ष द्या.कारण तुम्ही जर या वयात त्याच्या सोबत जे वागता त्याची तुलना तो त्याचे आजी आजोबा अथवा घरातील इतर माणसे यांच्यासोबत करत असतो.तसेच हेही लक्षात ठेवा की या वयात मुले मोठ्यांकडून त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा करत असतात.तसेच या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !
काय परिणाम होतो-
खूप ओरडल्यामुळे अथवा रागवल्यामुळे मुलांचे व पालकांचे नाते बिघडू शकते.डॉ.मेश्राम यांच्यामते जर सतत तुम्ही मुलांवर ओरडत असाल तर यामुळे तुमचे मुल विक्षिप्त होऊ शकते.ज्या मुलांना कठोर शब्द ऐकावे लागतात ती मुले पुढे विचित्र वागू शकतात.कदाचित ती तुम्ही त्यांच्यावर ओरडाल म्हणून तुमच्या सोबत खोटे बोलू शकतात,तसेच त्यांचा तुमच्यावरचा विश्वास देखील कमी होऊ शकतो.
काय कराल-
काही कारणात्सव मुलांवर ओरडल्यानंतर त्यांच्यासोबत प्रेमाने बोला.एक मोठा श्वास घ्या व तुमच्या मुलांना समजून सांगा की त्यांच्यावर तुम्हाला का ओरडावे लागले.त्यांनी पाण्याचा ग्लास तोडला असेल अथवा दूध सांडले असेल म्हणून जर तुम्ही त्यांना ओरडला असाल तर साफसफाई करण्यासाठी त्यांची मदत घ्या.ती चुक दुरुस्त करण्याच्या क्रियेत मुलांना सामिल करुन घ्या,ज्यामुळे मुलांना चुक कशी दुरुस्त करायची हे शिकता येईल.तसेच मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल ?हे देखील जरुर वाचा.
ओरडणे का गरजेचे असते-
कोणतीही गोष्ट अति करणे हे नेहमीच चुकीचे असते.त्यामुळे अति रागावणे देखील अयोग्यच आहे.पण डॉ.मेश्राम यांच्यामते जर तुम्ही तुमच्या मुलांना कधीही रागावलाच नाहीत तर त्यामुळे देखील त्यांचे नुकसान होऊ शकते.कारण अति लाड झालेली मुले पुढे तुमचे नेहमी ऐकतीलच असे नाही.जर तुम्ही मुलांना लहानपणापासून रागावला नाहीत व ८ ते १० वयात त्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली तर अशी त्या काळात मुले बंडखोर होऊ शकतात.अशी मुले यामुळे सिगारेट ओढणे,डोके भिंतीवर आपटणे,चिडचिड व एकलकोंडेपणा शिकू शकतात.यासाठी डॉ.मेश्राम यांच्यामते मुलांना सावधपणे व समजूतदारपण शिस्त लावा.मुलांवर ओरडल्यावर त्यांवा जवळ घेण्यास व त्यांना प्रेमाने समजावून सांगण्यास विसरु नका.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock