बेस्ट फ्रेन्ड ही तुमच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती असते जिच्यासोबत तुम्ही हक्काने हसता,रडता,भांडता.जिवलग मित्र अथवा मैत्रिणीसोबत तासनतास गप्पा मारताना देखील तुम्ही मुळीच थकत नाही.एकवेळ जर तुमचा बॉयफ्रेन्ड अथवा गर्लफ्रेन्ड तुमच्यापासून दूर गेले तर तुम्हाला चालते पण बेस्ट फ्रेन्ड ला गमावणे तुम्हाला अजिबात शक्य नसते.त्यामुळे तुमच्या बेस्ट फ्रेन्ड सोबत लव रिलेशनशिप करणे तुमच्यासाठी कसे चांगले असू शकते हे नक्की जाणून घ्या.
तुमच्या बेस्ट फ्रेन्डलाच तुमचा लाईफ पार्टनर करण्याची ही ९ कारणे जरुर वाचा-
-
तुम्हाला एकमेकांच्या मनात काय चालले आहे हे अगदी चांगले समजू शकते.कारण तुम्हाला एकमेकांना काहीही सांगण्याची गरज लागत नाही.तुम्हाला एकमेकांची विचार करण्याची पद्धत माहित असते व चर्चा करताना एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असेल हे देखील तुम्हाला तुमच्या बेस्टीने न सांगताच समजते.
-
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा दोघांचे अनेक मित्र-मैत्रिणी कॉमन असतात.त्यामुळे लाईफ पार्टनर अथवा जोडीदाराला नंतर तुमचे मित्र-मैत्रिणी न आवडण्याचा प्रश्नच येत नाही.जर तुम्ही एकाच ग्रुपमधले असाल तर तुम्हाला नंतर तुमच्या मित्र-मैत्रिणींपासून दूर रहावे लागत नाही.हे जरुर वाचा मुलींनी पुढाकार घेऊन प्रपोज केल्यास होतील हे ’9′ फायदे !
-
तुमच्या जोडीदाराला देखील तुमचे मित्र-मैत्रिणी आवडत असतात.त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्याची परवानगी वगैरे घेण्याची समस्या निर्माण होत नाही.
-
तुम्ही बराच काळ एकत्र घालवला असल्याने तुम्हाला एकमेकांचे वागणे विचित्र वाटत नाही.
-
तुम्ही एकत्र पिकनिकला गेलेला असता त्यामुळे नंतर एकत्र एकमेकांसोबत पिकनिकला अथवा बाहेर जाणे अगदी सोपे जाते.तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी माहित असल्याने कुठे जायचे यावरुन तुमचे वाद होत नाहीत अथवा त्यासाठी तुम्हाला तडजोड देखील करावी लागत नाही.
-
तुमचा बेस्ट फ्रेन्ड तुमच्यासाठी कन्फर्ट झोन असतो त्यामुळे त्यासोबत तुम्हाला आयुष्य आरामात घालवता येऊ शकते.तुम्हाला त्याच्यासोबत जपून बोलावे लागत नाही त्यामुळे तुम्ही मनमोकळे पणाने त्याच्याशी काहीही बोलू शकता.
-
तुम्ही तुमचे चांगले अथवा वाईट सेक्स अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले असतील तर आता त्यांच्यासोबत इंटीमेट होताना तुम्हाला विनोदी वाटू शकते.अशा वेळी याबाबत तुमची तुलना न झाल्यामुळे तुम्ही नाराज न होता त्यांच्यासोबत मोकळेपणाने विनोद देखील करु शकता.
-
अशा रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असुरक्षित अथवा मत्सर वाटत नाही.कारण बेस्ट फ्रेन्डला तुम्हाला वेळेवर न येण्याची अथवा फोन न उचलण्याची किंवा सहका-यांसोबत लंचला जाण्याची कारणे द्यावी लागत नाहीत.त्यामुळे बेस्ट फ्रेन्डला पार्टनर अथवा जोडीदार केल्याने तुमच्या अर्ध्ाअधिक अशा समस्या कमी होतात.तसेच लाँग डिस्टंस रिलेशनशिप टिकवण्यासाठी या 5 टीप्स जरुर वाचा.
-
अशा नात्यामध्ये तुम्हाला एकमेकांच्या बद्दल प्रंचड विश्वास, प्रेम, कम्फर्ट, आपुलकी, काळजी आणि आदर असतो.तुम्ही कधीकधी एकमेकांना गृहीत धरु शकता पण तुम्हाला तुमची मैत्री इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रिय असते.त्यामुळे यातून तुमची रिलेशनशिप अधिक मजबूत होऊ शकते.असे असले तरी लग्नाआधी या ७ गोष्टींबाबत जोडीदारासोबत जरुर बोला.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock