तुम्हाला लहानपणी रविवारी सुट्टीच्या दिवशी मस्त घराबाहेर फिरायला जाणे किंवा मैदानी खेळ खेळणे खूप आवडायचे.पण आता तुमची मुले मात्र असे करण्यापेक्षा घरात सतत व्हिडीओ गेमला चिकटलेली असतात.व्हिडीओ गेम खेळताना त्यांना अगदी जगाचे भान देखील राहत नाही.सहाजिकच यामुळे तुमची सतत चीडचीड होत असते.अनेक पालकांची हीच तक्रार असते की मैदानी खेळ खेळण्यापेक्षा त्यांचा मुलांना घरात बसून व्हिडीओ गेम खेळत बसणे फार आवडते.
पण याबाबत आता फार चिंता करण्याची काहीच गरज नाही.कारण आता शास्त्रीयदृष्या व्हिडीओ गेम खेळणे हे तितकेसे अयोग्य नसल्याचे सिद्ध झाले आहे.इतकेच नाही तर व्हिडीओ गेम खेळणे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी चांगले असते.कारण व्हिडीओ गेम खेळल्यामुळे तुमच्या मुलांचा मानसिक विकास होऊ शकतो.त्याचसोबत या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !हे देखील जरुर वाचा.
यासाठी मुलांना व्हिडीओ गेम खेळू देण्याची ही ४ शास्त्रीय कारणे जरुर वाचा-
व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांचे विचार कौशल्य समृद्ध होते-
-
व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांना कोणताही बौद्धिक फायदा होत नाही हा समज चुकीचा आहे.उलट व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांचा भावनिक विकास होतो.यामुळे त्यांच्यामध्ये विचार करणे,वाचन करणे,एखादी गोष्ट समजून घेणे,चर्चा करणे व एकाग्रता ही कौशल्ये सुधारण्यास मदत होते.विशेषत: हिरो ४ व ग्रॅन्ड थेफ्ट ऑटो आयव्ही या गेममध्ये अॅक्शन समाविष्ट असल्यामुळे हे खरे आहे.त्याचसोबत मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ५ टीप्स देखील जरुर वाचा.
-
जी मुले मेंटल रोटेशन(रोटेड केल्यावर थ्रीडी अथवा टूडी इमेज कशी दिसू शकेल याची कल्पना करणे) सारखे गेम खेळतात त्यांच्यामध्ये एकाग्रता व काल्पनिक विचार करण्याची क्षमता असते.
-
काही संशोधनानूसार हायस्कूल व कॉलेज पेक्षा व्हिडीओ गेम द्वारे थिंकींग स्कील्स जास्त चांगल्या प्रकारे शिकवले जातात.अनेक अॅक्शन ओरीएंटेड व्हिडीओ गेम्स मध्ये काही सेकंदाच्या आत निर्णय घेण्याची गरज असते त्यामुळे त्या मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.इतकेच नाही तर यामुळे त्या मुलांमध्ये क्रिएटीव्हीटी व समस्या सोडवण्याचे कौशल्य देखील विकसित होते.
मुले अपयश पचविण्यासाठी तयार होतात-
-
याला इन्क्रीमेंटल थेअरी ऑफ इंटीलेंजट असे म्हणतात.जी मुले प्रयत्न करतात त्यांची आपण( असे वा! तू खूप छान खेळलास )अशी स्तुती करतो तेव्हा त्यांच्यामध्ये असा विश्वास निर्माण होतो की ते जीवनात पुढे स्मार्ट होतील.पण मुलांचे आपण जेव्हा त्यांच्या स्मार्टनेस साठी कौतूक करतो ( असे वा! तू खूप स्मार्ट आहेस) तेव्हा त्या मुलांमध्ये आपण जन्मताच स्मार्ट असून स्मार्टनेस ही उपजत देणगी असून ती मिळवण्याची गोष्ट नाही ही भावना निर्माण होते.
-
संशोधकांना असा विश्वास आहे की व्हिडीओ गेम खेळणे मुलांच्या बुद्धीमत्ता विकासासाठी चांगले असते.कारण अनेक वेळा अपयश येऊन देखील प्रत्येक वेळी तुमचे मुल अधिक चांगल्या प्रकारे गेम खेळण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे त्याला चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.
-
व्हिडीओ गेम मध्ये पॉइंट्स व स्कोर असतात त्यामुळे मुलांमध्ये ख-या आयुष्यात प्रतिक्रिया घेण्याचे कौशल्य विकसित होते.त्यामुळे अपयशाला सामोरे जाणे व आत्मविश्वास वाढवणे त्याला सोपे जाते.
-
शास्त्रज्ञांच्या मते अशी मुले त्यांच्या ध्येयाविषयी सकारात्मक होतात.त्यामुळे याचा त्यांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी देखील चांगला फायदा होतो.तसेच या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा.
व्हिडीओ गेम मुळे मुले भावनिक दृष्ट्या मजबूत होतात-
-
सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी मले व तरुणांनी गेम खेळणे हा एक उत्तम व प्रभावी मार्ग असतो.काही संशोधनामधून असे सिद्ध झाले आहे की आवडीचा व्हिडीओ गेम खेळणे व मूड सुधारणे याचा घनिष्ट सबंध असतो.हे आपल्याला विशेषत: अॅन्ग्री बर्ड सारख्या पझल गेम मध्ये प्रामुख्याने जाणवते.
-
गेम जिंकल्यावर मुलांमध्ये स्वाभिमानाची ही भावना जागृत होते.गेम खेळल्यामुळे मुलांना एकलकोंडेपणा व उदासिनतेमधून बाहेर येण्यास देखील मदत होते.
-
काही संशोधनात असे आढळले आहे की वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट सारख्या गेम मधील भुमिका व अवतार यामुळे ते खेळणा-यांना नैराश्य व चिंतेला चांगल्याप्रकारे हाताळता येते.तसेच मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा
व्हिडीओ गेम मुळे मुले अधिक सोशल होतात-
- आजकाल व्हिडीओ गेम हे अनेक लोकांनी एकत्र खेळण्यासारखे असतात ते एकटे खेळता येत नाहीत. वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट सारख्या गेमचे दहा दशलक्ष खेळाडू असू शकतात.त्यामुळे विविध गेम खेळण्यासाठी खेळाडूंना इतर खेळाडूंची देखील आवश्यक्ता असते.संशोधकाच्या मते यामुळे वर्च्युअल कम्युनिटीज निर्माण होतात.तसेच यामुळे मुलांमध्ये कोणावर विश्वास ठेवावा व ग्रूपचे नेतृत्व कसे करावे हे गुण विकसित होतात.
-
या सर्व स्थितीतून मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात.ज्याची त्यांना त्यांच्या ख-या आयुष्यात घरातील मंडळी व मित्रमैत्रिणींमध्ये मिसळण्यामध्ये मदत होते.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock