भस्म अथवा विभूती म्हणजे पवित्र राख.जी मंत्रजपासह एखाद्या धुनी,होम अथवा यज्ञातील विशिष्ट लाकूड,तुप,औषधी वनस्पती व काही पवित्र गोष्टीपासून तयार झालेली असते.आपल्या संस्कृतीमध्ये हे पवित्र भस्म कपाळावर लावणे महत्वाचे मानले जाते.भारतात अशी विभूती अथवा भस्म अंगाला लावणे हे सामान्यपणे दिसून येते.एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यास त्या परिसरातील अध्यात्मिक मंडळींनी अंगाला विभूती अथवा भस्म लावलेले आपल्याला दिसते.भस्म अंगाला लावण्याबाबत असा समज आहे की विभूती अथवा भस्म अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट व दुष्ट शक्तीपासून संरक्षण होते.तुम्हाला कदाचित चंदन कपाळाला लावण्याचे धार्मिक महत्व माहित असेलच.पण चंदनाप्रमाणे भस्म अथवा पवित्र राख देखील कपाळाला लावण्याचे विशिष्ट असे फायदे आहेत.यासाठी आयुर्वेदिक तज्ञ Dr. Nitasha Manikantan यांच्याकडून जाणून घेऊयात अंगाला भस्म लावल्याचे नेमके काय महत्व असते.यासोबत नियमित मंत्रोच्चाराचे आरोग्यदायी फायदे !देखील जरुर वाचा.
विभूती अथवा भस्म लावण्याचे फायदे-
डोकेदुखी कमी होते-
चायनिज अॅक्युप्रेशर शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील दोन भुवयांच्या मधील भाग हा शरीरातील सर्व नसांना जोडणारा बिंदू आहे असे मानन्यात येते.त्यामुळे त्या भागावर मसाज केल्यामुळे डोकेदुखी कमी होते असा देखील समज आहे.दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होऊ शकते.तसेच यासाठी अधिक वाचा अॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय !
तुम्ही सकारात्मक होता-
तिसरा डोळा हा तुमच्या अंर्तमनाचे प्रतिनिधीत्व करीत असून तो तुमच्या मनातील विचारांच्या माध्यमातून कार्यरत असतो. तुमच्या शरीरातील या चक्रामध्ये नकारात्मक विचारांमधून नकारात्मक उर्जा शरीरात प्रवेश करत असते.मात्र पवित्र भस्म अथवा विभूती तिथे लावल्यामुळे नकारात्मक उर्जेला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखता येऊ शकते.
सर्दी पासून संरक्षण होते-
भस्म अथवा राखेचा आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापर करण्यात येतो.भस्म अथवा विभूती लावल्यामुळे शरीरातील अतिरिक्त आद्रता शोषून घेतली जाते व सर्दीपासून देखील संरक्षण होते.
शरीरातील उर्जेची कवाडे मोकळी होतात-
जर तुमच्या शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवाहित होण्यामध्ये अडथळे येत असतील तर भस्म अथवा पवित्र राख लावल्याने शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवेश करणारी दारे उघडी होतात व तुम्हाला नैसर्गिक उर्जेचा पुरवठा होतो.तसेच उत्तम आरोग्यासाठी भस्म लाऊन शरीरातील सप्तचक्र देखील कार्यरत केली जातात.
भस्म अथवा राख सामान्यत: कपाळावर लावण्यात येते.पण एखादी व्यक्ती भस्म अथवा पवित्र राख छाती अथवा दंडावर देखील लावू शकते.यासाठीच काही लोक पुर्ण सर्वांगाला भस्म लावतात.तसेच यासोबत वाचा अभ्यंगस्नान- तेलाच्या मसाजामध्ये दडलय निरोगी स्वास्थ्याचे रहस्य !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Facebook/Duvvada-Jagannadham