उन्हाच्या तीव्र उकाड्यामुळे तुम्हाला जीमला जाणे कंटाळवाणे झाले असेल अथवा कडक उन्हाळ्यामुळे निरुत्साही वाटत असेल किंवा अगदी कोणतीही फिजीकल अॅक्टीव्हिटी करणे नको असे वाटत असेल तर ही माहिती जरुर वाचा.कारण जर वजन कमी करायचे असेल व फीट रहायचे असेल तर उन्हाळ्याचा कितीही त्रास झाला तरी तुम्ही व्यायाम अथवा वर्कआउट टाळू शकत नाही.तसेच वाचा आला उन्हाळा , आरोग्य सांभाळा !
यासाठी मुंबईतील CurveStrength Wellness Fitness Studio चे फीटनेस एंटरप्रेनर व फाउंडर,पर्सनल ट्रेनर विक्रम दत्ता यांच्याकडून वर्कआउट करताना उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी या काही एक्सपर्ट टीप्स जाणून घ्या-
१.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये वर्कआउट करण्यापूर्वी तुमचा व्यायाम चांगला व्हावा यासाठी तुम्ही शरीराला पुरेशी उर्जा मिळेल असे काहीतरी खाणे गरजेचे आहे.यासाठी व्यायामापूर्वी तुमच्या आहारामध्ये खाली दिलेल्या पदार्थाचा जरुर समावेश करा.
-
केळ- यामध्ये हाय पोटॅशियम,व्हिटॅमिन सी,बी६,साखर त्वरीत शोषून घेणे,कमी सोडीयम-ज्यामुळे त्वरीत उर्जा मिळणे हे गुणधर्म असतात.
-
मनुका- यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात,लोह,व्हिटॅमिन बी,कॅरोटीन,व्हिटॅमिन सी व नैसर्गिक साखर असते.
-
डाळिंबाचा रस- पोटॅशियम अधिक मात्रेत असते,व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन के व फायबर असतात.ज्यामुळे स्नायूंच्या वेदना कमी होण्यास मदत होते व मसल रिकव्हरी देखील जलद होते.
२.जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये रनींग,बायकींग व हायकींग असे हाय इंटेन्सीटी वर्कआउट व इन्डूरन्स-बेस अॅक्टीव्हिटी करता तेव्हा कडक उन्हामुळे तुम्हाला थकवा येतो.यासाठी संध्याकाळी व सकाळी फक्त सौम्य सुर्यप्रकाशामध्येच असे व्यायाम करा.सामान्यत: यासाठी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेमध्ये व्यायाम करु नका असे सांगण्यात येते.कारण हा दिवसभरातील कडक उन्हाचा काळ असतो.
३.तसेच आउटडोअर वर्कआउटसाठी घराबाहेर पडताना आरामदायक सुती अथवा सुती-पॉलिस्टर मिक्स असलेले कपडे घाला.तसेच ते कपडे शरीर थंड ठेवण्यासाठी हलक्या रंगाचे व घाम सहजरित्या शोषून घेणारे असावेत.लायक्रा सारख्या कापडाचे गडद रंगाचे घट्ट कपडे सुर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषून घेतात.त्यामुळे ते एअरकंडीशर असलेल्या जीममध्येच जास्त सोयीस्कर असतात.मात्र बाहेरील वातावरणात अशा कपडयांमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.असे आरामदायक नसल्याने घामामुळे शरीरावर घामोळे व रॅशेस येण्याची देखील शक्यता असते.त्याचप्रमाणे बाहेर जाताना कॅप अथवा हॅट घालण्याचा देखील सल्ला देण्यात येतो.
४.उष्णतेमुळे अधिक घाम येतो.घामामुळे शरीराला थंडावा मिळतो व शरीराचे तापमान खाली जाते.पण घामामुळे तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता कारण घामाद्वारे तुमच्या शरीरातील पाणी,इलेक्ट्रॉलाइट व मीठ कमी होते.त्यामुळे इलेक्ट्रॉलेट पाणी पिऊन तुम्ही तुमचे शरीर पुन्हा री-हायड्रेट करणे फार गरजेचे असते.ज्यामुळे वर्कआउट नंतर देखील तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते.तसेच उन्हाळ्यातील रिफ्रेशिंग पेय – जलजीरा देखील जरुर करुन बघा.
५.जर तुम्हाला उष्णतेमुळे आजारपण येण्याची लक्षणे दिसत असतील तर अशा वेळी तुम्ही व्यायाम कमी करावा अथवा व्यायाम करणे थांबवावे.कधीच जास्त थकवा येईल अशा पद्धतीने व्यायाम करु नका.
६.जर तुम्ही घराबाहेर काम करीत असाल तर अचानक उन्हामध्ये जाऊ नका.एअर कंडीशनर रुममधून अथवा थंड जागेतून लगेच बाहेरील सुर्यप्रकाशात जाणे टाळा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock