काळेभोर, लांबसडक केस कोणाला नको असतात ? ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. पण जाड, लांबसडक केस मिळण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजेच आहार, तेल, मसाज, आरोग्य, आनुवंशिकता इत्यादी. पण आपली हीच इच्छा महिन्याभरात पूर्ण होईल, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण हे खरे आहे. जाणून घेऊया कसे ते. नक्की वाचा: केसगळती रोखण्यासाठी दिवसातील ’5 मिनिटं’ हा उपाय नक्की करा
याबद्दल एका तरुणीशी संवाद साधला असता तिने तिचा खरा अनुभव सांगितला. स्वप्नाली राजे असे तिचे नाव असून ती २७ वर्षांची आहे. हीचे केस आधी केस छोटे, पातळ, कोरडे व निस्तेज होते. केसांना फारशी वाढ नव्हती .इतरांचे सुंदर केस बघितले की आपले देखील घनदाट केस असावे असे तिला वाटत असे. यासाठी तिच्या मैत्रिणीने तिला एक हेयर पॅक सांगितला आणि महिन्याभरात केस वाढतील व मजबूत होतील अशी हमी दिली. आधी तिचा विश्वास बसला नाही मग तिने तो उपाय करायचे ठरवले. शाम्पूच्या वापरामुळे केस गळतीची समस्या वाढते का ?
हेयर पॅक कसा बनवाल ?
एक वाटी दह्यात, २ अंड्याचा सफेद भाग, बदाम तेल, कोरफड आणि मेथीचे दाणे किंवा पावडर घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा व हे मिश्रण आठवड्यातून दोनदा केसांना लावा. अर्धा तास थांबून केस आधी पाण्याने स्वच्छ करा व नंतर शॅम्पू लावा. असे महिनाभर करा आणि स्वतः फरक अनुभवा. चमकदार आणि मजबूत केसांसाठी अंड्याचे घरगुती हेअरपॅक
स्वप्नालीने हा उपाय नियमित केला आणि तिला फरक दिसून आला. तुम्हीही हा उपाय नक्की करून बघा.
परंतु, त्याचबरोबर काही नियम पाळणं आवश्यक आहे. त्यामुळे केसवाढीस मदत होईल.
१. जंक फूड टाळा. घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे
२. फळांचे रस घ्या.
३. सुकामेवा भरपूर प्रमाणात खा.
४. मांसाहार घ्या. या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव !
५. रोज तेल लावा. रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने ते खरंच अधिक वाढतात का ?
हेयर पॅक लावण्याबरोबरच या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला देखील महिन्याभरात लांबसडक, काळेभोर आणि सुंदर केस मिळतील.
हा उपाय नक्कीच करा. पण त्याआधी कॅलेंडर बघा. आज काय आहे? 1 एप्रिल ……….. एप्रिलफूल…!!!
टीप: वरील उपायाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा फक्त एप्रिल फूल प्रॅंक आहे.