Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आतड्यांंचा कॅन्सर –कोणत्या टप्प्यात त्याची गंभीरता किती ?

$
0
0

कोलन कॅन्सरचे निदान झाल्यास त्याच्या पुढची पायरी म्हणजे कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे ते जाणून घेणे. यामुळे कॅन्सरस सेल्स किती लांब पसरलेत याची माहिती मिळते व त्यानुसार ट्रीटमेंट करता येते. Cytecare Hospital चे Senior Consultant – Gastrointestinal आणि HBP Surgical Oncology, Dr.  Kenneth D’ Cruz, यांनी कॅन्सरचे चार टप्पे सांगून त्यावरच्या ट्रीटमेंट आणि कोलन कॅन्सरने पीडित व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता यावर मार्गदर्शन केले.

कॅन्सरचे टप्पे: साधारणपणे कोलन कॅन्सरचे चार टप्पे आहेत. परंतु, कोलनचे स्वरूप आणि सेल्स कोलन पासून किती दूर पर्यंत पसरले आहेत यावरून पुढे याचे वर्गीकरण केले जाते.

colon-cancer-stages

पहिला टप्पा : कोलन कॅन्सरच्या सुरवातीच्या टप्प्यात कोलनच्या आवरणावर mucosa आणि submucosa हे कॅन्सरस सेल्सची वाढ होऊ लागते.

दुसरा टप्पा : दुसऱ्या टप्प्यात सेल्स कोलनच्या बाहेर पडून कोलनच्या इतर भागात पसरतात. यावरून त्यांचे 2A, 2B आणि 2C, यामध्ये वर्गीकरण केले जाते. 2A मध्ये कॅन्सरस सेल्स हे कोलनच्या बाहेरील आवरणापर्यंत पोहचलेले असतात. 2B च्या टप्प्यात बाहेरच्या आवरणापासून ते membranes पर्यंत पोहचतात. आणि 2C च्या टप्प्यात सेल्स जवळच्या अवयवांपर्यंत पसरू लागतात. या ’10′ लक्षणांनी पोटाचा कॅन्सर वेळीच ओळखा !

तिसरा टप्पा: या टप्प्यात कॅन्सरस सेल्स lymph nodes च्या जवळ पोहचतात. त्यानंतर किती lymph nodes वर कॅन्सरस सेल्सचा परिणाम झालाय यावरून त्याचे 3A, 3B आणि 3C असे वर्गीकरण होते. 3A मध्ये कोलन जवळ असलेल्या lymph node वर परिणाम होतो. जर २-३  lymph node वर परिणाम झाला तर तो 3B चा टप्पा असतो. आणि ४ पेक्षा अधिक lymph node वर परिणाम दिसून आला तर तो 3C चा टप्पा असेल.

चौथा टप्पा: हा कॅन्सरचा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात कॅन्सरस सेल्स शरीराच्या इतर अवयवांनापर्यंत पोहचतात. जवळच्या अवयवांवर म्हणजे यकृत किंवा फुफ्फुसांवर याचा परिणाम होतो. याचे वर्गीकरण साधारणपणे 4A, 4B असे होते. 4A मध्ये कॅन्सरस सेल्स जवळपासच्या अवयवांवर परिणाम करतात तर  4B मध्ये कॅन्सरस सेल्स दूरच्या एखाद दुसऱ्या अवयवांपर्यंत पसरतात.

कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे यावरून त्यावरची ट्रीटमेंट ठरते. सामान्यपणे पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यात सर्जरी करून कोलन कॅन्सरचा ट्युमर काढला जातो. परंतु, उशिरा म्हणजे तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या काळात कॅन्सरस सेल्सचा परिणाम इतर अवयवांवर होऊ नये म्हणून किमोथेरपी आणि सर्जरी दोन्ही केले जाते. शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी हे कॅन्सर ट्रीटमेंटचे परिणामकारक उपाय आहेत. चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

कॅन्सर झाल्यानंतर सुरक्षित राहण्याची शक्यता किती आहे?

हे सुद्धा कोलन कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे, तसंच वय, ग्रेड, माणसाचे आरोग्य यावर अवलंबून आहे. मायक्रोस्कोपमध्ये सेल्सचे परीक्षण करून सेल्स किती हेल्दी आहेत यावरून कॅन्सरचे ग्रेडिंग होते. ग्रेड हाय असल्यास सेल्स अधिक अॅबनॉर्मल दिसतात आणि रोग निदान होणे कठीण असते. तर लो ग्रेड कॅन्सर हळूहळू वाढतो आणि रोगाचे निदान लवकर होते. सामान्यपणे प्रत्येक पेशन्टची जिवंत राहण्याची शक्यता ५ वर्षांपर्यंत ५०% इतकी असते. परंतु, कॅन्सरच्या टप्प्यानुसार ती बदलते. कोलन कॅन्सर पहिल्या टप्प्यात असल्यास जिवंत राहण्याची ५ वर्षांपर्यत शक्यता ९०% असते. दुसऱ्या टप्प्यात ती ८०-८३% असते. तिसऱ्या टप्प्यात ६०% तर चौथ्या टप्प्यात ती ५ वर्षांकरिता ११% इतकी असते. म्हणजेच पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत जिवंत राहण्याची शक्यता कमी होत जाते. कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी या ’7′ सवयी अंमलात आणाच !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>