माझे बाळ ५ महिन्यांचे आहे.मी त्याला बोअरवेलच्या पाण्याने अंघोळ घालू शकते का? माझ्या परिसरात फक्त बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा होतो त्यामुळे माझ्याकडे पाण्याचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर मी काय करावे?
या शंकेबाबत द्वारका येथील व्यंकटेश्वर हॉस्पिटलचे Paediatrics आणि Neonatology विभागाचे एचओडी व सिनियर कन्सल्टंट Dr Sunil Mehendiratta यांचा हा महत्वाचा सल्ला जरुर जाणून घ्या.
बोअरवेलचे पाणी जड असते त्यामुळे त्याचा त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो.सहाजिकच बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी व अंघोळीसाठी मुळीच सुरक्षित नाही.बोअरवेलचे पाणी हे ग्राउंड वॉटर असते.ग्राउंड वॉटर असल्याने ते प्रदूषित असते.ज्यामध्ये जड धातु, POPs(persistent organic pollutants) सेद्रिंय प्रदूषक घटक व न्यूट्रिशन्ट असतात ज्यांचा त्वचेवर विपरित परिणाम होत असतो.बोअरवेल चे पाणी निंजर्तुक देखील नसल्याने ते बाळाला अंघोळ घालण्यासाठी नक्कीच सुरक्षित नाही.अंघोळ घालताना हे पाणी बाळाच्या तोंडात गेल्यास बाळ आजारी देखील पडू शकते.यासाठी वाचा उकळलेले,गाळलेले की बाटलीबंद पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे ?
ग्राउंड वॉटरने अंघोळ केल्यामुळे प्रौढांमध्ये देखील त्वचेवर खाज येणे,त्वचा कोरडी व रुक्ष होणे,गजकर्ण(eczema),केसगळती व इनफेक्शन अशा अनेक त्वचा व केसांबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.तुमच्या बाळाची त्वचा तर फारच नाजूक व सौम्य असते.त्यामुळे बाळाच्या त्वचेची याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
मात्र जर तुम्हाला अंघोळीसाठी बोअरवेलचे पाणी वापरण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर ते पाणी आधी स्वच्छ करुन मगच अंघोळीसाठी वापरा.
यासाठी बोअरवेलचे पाणी वापरण्यापूर्वी ते RO च्या माध्यमातून फिल्टर करुन घेणे हाच एक सुरक्षित व उत्तम मार्ग असू शकतो.तसेच तुम्ही अंघोळीपूर्वी पाणी स्वच्छ करण्यासाठी त्या पाण्यामध्ये तुरटीचा देखील वापर करु शकता.पाण्यावरुन तुरटी फिरवणे हा पाणी स्वच्छ करण्याचा एक कमी खर्चिक पर्याय आहे.मात्र बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी बाळाच्या त्वचेवर बॉडी ऑइल जरुर लावा ज्यामुळे अंघोळीनंतर बाळाची त्वचा कोरडी पडणार नाही.तसेच बाळाला अंघोळ घालण्यासाठी वापरण्यात येणारी अंघोळीची साधने देखील योग्य गुणवत्तेची निवडा.बाळाला अशा पाण्याने लवकर अंघोळ घाला कारण बराच वेळ अंघोळ घातल्याने बाळाच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्याची त्वचा कोरडी पडू शकते.बाळाला अंघोळ घातल्यावर लगेच त्याचे अंग पुसून कोरडे करा व त्याला योग्य प्रकारे मॉश्चराईज करा.जाणून घ्या लहान मुलांसाठी साबण आणि शाम्पू वापरायला सुरवात कधी कराल ?
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock