Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ताण तणावामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढतो का ?

$
0
0

चेहर्‍यावर एखादा जरी पिंपल वाढताना दिसला तरीही अनेकदा तरूण मंडळी बैचेन होतात. अनेकांचा असा विश्वास आहे की, ताणतणावामुळे अ‍ॅक्ने वाढतात. पण तुमच्यावरील ताण  तणाव अ‍ॅक्नेची समस्या वाढवण्यास कसे कारणीभूत ठरते हे जाणून घेण्यआधी अ‍ॅकने कसे वाढतात हे समजणे गरजेचे आहे.

 मुंबईस्थित फोर्टिस हॉस्पिटलच्या कन्सल्टंट डरमॅटोलॉजिस्ट डॉ. स्मृती नस्वा यांच्या सल्ल्यानुसार, रक्तातील अशुद्धतेपेक्षा शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे अ‍ॅक्नेचा त्रास अधिक वाढतो. ताण तणाव  हे अ‍ॅक्नेच्या त्रासामागील मूळ कारण नसून त्याच्यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढायला मदत होऊ शकते.

  • ताण तणाव  आणि अ‍ॅक्नेचा एकमेकांशी कसा संबंध आहे ?

परीक्षेच्या आधी किंवा लग्नाच्या अवघे काही दिवस आधी अनेक तरूण-तरूणींच्या चेहर्‍यांवर अचानक पिंपल वाढतात.

Stanford University ने 2003 साली केलेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार, Archives of Dermatology  [1] ने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या मौसमामध्ये ताण तणाव वाढल्याने तरूणांम्ध्ये अ‍ॅक्नेचा त्रास वाढत असल्याचेही आढळते. ताणतणावाचा शरीरावर जसा परिणाम होतो तसाच त्वचेवरही होतो. जसा तुमच्यावर ताण वाढतो. तसे तुमच्या शरीरातील हार्मोनल्सचे सिक्रीशन होण्याचे प्रमाणही वाढते. Androgens किंवा cortisol हे स्ट्रेस हार्मोन्स आहेत. त्यांचे प्रमाण वाढते. या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने सेबल हे त्वचेतील तेलही वाढते. या हार्मोन्सचे आरोग्यावरही परिणाम होत असल्याने तुमचा  ताण तणाव हलका करणं गरजेचे आहे. अन्यथा अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही औषधं गोळ्या वापरत असाल तर त्याचाही फारसा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही.

तरूणांमध्ये अ‍ॅक्नेचा त्रास वाढणं ही समस्या अगदीच सामान्य असते. वयाच्या या टप्प्यावर मुरूमं किंवा तारुण्यपिटीका येणं सहाजिकच असते. डॉ. स्मृती सिंग यांच्या सल्ल्यानुसार,तारुण्यपिटीकांचा त्रास हा मुलं वयात येताना ताणतणावामुळे पिंपल्सचा त्रास अधिक वाढवतात. त्यामुळे वेळीच तुमच्या चेहर्‍यावर पिंपल्स वाढण्यामागील नेमके कारण काय हे ओळखा आणि त्यावर तात्काळ उपचार करा. तुमच्यावरील ताण तणाव हलका करण्यासाठी योगासनं किंवा ध्यानसाधना करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. तुमचा एखादा छंद जोपासल्यानेही ताण कमी होण्यासाठी मदत होते. तुमच्यावरील ताण जितक्या लवकर कमी करता येईल तितका अ‍ॅक्नेशी सामना करणं सुकर होतं. प्रामुख्याने तरूणाईत हा त्रास अधिक असल्याने ताण हलका करण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

References:

  1. Chiu A, Chon SY, Kimball AB. The response of skin disease to stress: changes in the severity of acne vulgaris as affected by examination stress. Arch Dermatol. 2003 Jul;139(7):897-900. PubMed PMID: 12873885.

Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>