Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या फायद्यांसाठी प्रसूतीनंतर नवमातांनी अवश्य मसाज घ्यावा !

$
0
0

गर्भारपणात स्त्रिच्या स्नायूंवर व शरीरावर स्ट्रेस येतो. त्या काळात स्त्रिच्या शरीरात अनेक बदल होतात. पहिल्यांदा प्रेग्नेंट राहिल्यानंतर बऱ्याच महिला गोंधळून जातात. आपल्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे, हे समजणे कठीण होते. नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

परंतु, यासाठी post-natal massage यांसारख्या काही नैसर्गिक थेरपींनी फायदा होईल. त्यामुळे  प्रसूतीवेदना सुसह्य होण्यास आणि मातेला ऊर्जा, उत्साह परत मिळवून देण्यास मदत होते. post-natal massage मुळे प्रसूतीनंतरचा ताण कमी होतो व स्नायूंची लवचिकता वाढते. त्याचबरोबर मसाज केल्याने दूध निर्मिती वाढवणाऱ्या Oxytocin या हार्मोनची निर्मिती होते. तसंच योग्य पद्धतीने मसाज केल्यास चांगली झोप येते आणि रक्ताभिसरण सुधारते. The Himalaya Drug Company च्या  Research Associate – R&D च्या Dr. Subhashini N.S यांनी याबद्दल मार्गदर्शन केले.

  • प्रसूतीनंतर किती कालावधीनंतर नवमातेने मसाज घ्यावा?

प्रसूतीनंतर मसाज घेणे हा नवमातेसाठी फायदेशीर असते. प्रसूतीनंतर आवश्यक असलेला मसाज नवमातेला लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे. परंतु, प्रसूतीनंतर ६-७ आठवड्यांनंतर मसाज घ्यावा, असा सल्ला अनेक डॉक्टर देतात.

  • प्रसूतीनंतर मसाज घेतल्यास खरंच फायदा होतो का आणि कसा?

अभ्यासानुसार प्रसूतीनंतर घेतलेल्या मसाज थेरपीमुळे चिंता, नैराश्य दूर होण्यास मदत होते. स्नायू, सांधे रिलॅक्स होतात आणि नवमातेचे आरोग्य सुधारू लागते. रक्तप्रवाह सुधारतो. lymphatic drainage मुळे शरीरातील अतिरिक्त फ्लुईड आणि टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या दुध निर्मितीत वाढ होते. त्वचेला फर्मनेस येतो. त्वचा हायड्रेटेड, मऊ व कोमल होते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर घेतलेला मसाज पाठदुखी, डोकेदुखी, ताण, चिंता आणि प्रसूतीनंतर येणारे नैराश्य यावर अत्यंत परिणामकारक ठरतो. ताण कमी होवून संपूर्ण शरीराला आराम मिळतो आणि थकवा दूर होवून शांत झोप येण्यास मदत होते. प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

  • हा मसाज किती वेळा घ्यावा?

मसाज केल्याने शरीर व मन रिलॅक्स होवून ते एकमेकांशी सुसंगत होते. मसाज घेतल्याने मातेच्या भावनिक आणि शारीरिक गरजांचा समतोल राखला जातो. साधारणपणे प्रसूतीनंतर महिनाभर रोज तेलाने मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. बरेचदा अनेक नवमातांना प्रसूतीनंतर पहिल्या सहा महिन्यात ६ वेळा मसाज घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • post-natal massage  घेताना  कोणती काळजी घेणे गरजेचे आहे?

प्रथमतः मसाज करण्यासाठी योग्य तेलाची निवड करा. तसंच मसाज योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे असतात. त्यामुळे परिणामकारक मसाज मिळण्यासाठी योग्य तेलाची निवड करणे महत्त्वाचे आहे. तिळाचे तेल, कोरफड यांसारखे हर्बल प्रॉडक्स तुम्ही वापरू शकता. त्यामुळे शरीर रिलॅक्स होवून तुम्हाला उत्साही वाटेल. मसाज्याचे फायदे मिळण्यासाठी तो योग्य पद्धतीने करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेचा परिणाम निश्चितच आरोग्यावर होतो. ब्रेस्टफिडींग वीक : नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय

  • मसाज घेण्याचा कालावधी किती असावा?

प्रसूतीनंतर घेण्यात येणारा मसाज साधारणपणे ३०-४५ मिनिटे घ्यावा, असा सल्ला दिला जातो. यामुळे लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. तसंच मसाज घेताना नवमातेने त्याचा आनंद जरूर घ्यावा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>