शरीरावर विचित्र ठिकाणी केसांची वाढ होत असेल तर ते अनावश्यक केस ताबडतोब काढून टाकण्याचा मोह होतो. पण अशाप्रकारे केस काढून टाकणं त्रासदायकही ठरू शकते. म्हणूनच डरमॅटोलॉजिस्ट डॉ. चंदन जयस्वाल यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. कारण अनावश्यक केस काढण्याच्या विविध उपचारपद्धतींचेही आहेत दुष्परिणाम
1. स्तनाजवळ : स्तनांजवळ विरळ स्वरूपात केस असणं सामान्य आहे. ते उपटण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. ट्विझरने केस उपटल्याने इन्फेक्शन होऊ शकते. विनाकारण 2 मिलीमीटरपेक्षा लहान केस उपटू नका. अगदीच गरज असेल तर स्तनाजवळील केसांना उपटण्याऐवजी ट्रीम करा.
2. आयब्रो - कपाळावरील आयब्रो हा देखील एक नाजूक भाग आहे. सतत त्या जागेवरील केस उपटल्याने हेअर फॉलिकल्सला त्रास होऊ शकतो. ब्युटी पार्लरमध्ये तज्ञांद्वारा भुवयांना शेप देणं सुरक्षित आहे. परंतू स्वतःहून भुवयांजवळील केस उपटू नका. थ्रेडींगने आयब्रो केल्यानंतर होणारा त्रास दूर करतील या खास टीप्स !
3. चामखिळी : अनेकदा शरीरावरील चामखिळीतून केस उगवतो. पण अशाप्रकारचे केस खेचून काढू नका. तसे केल्याने तीव्र वेदना होतात सोबतच इन्फेक्शनचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे चामखिळीतून केस उपटून काढण्याचा मोह टाळा. तुम्हांला अशाप्रकारचे केस त्रासदायक वाटत असतील तर ट्रीम करा किंवा लेझर हेअर रिड क्शनच्या मदतीने योग्य आणि सुरक्षित पद्धतीने काढा.
4. इन्ग्रोव्हन हेअर : वॅक्सिंग किंवा रेझरमुळे शरीरावर इन्ग्रोव्हन केस वाढतात. असे केस ट्विझिंगने काढणं त्रासदायक ठरतं. यामुळे स्कार / डाग किंवा इंफेक्शनचा त्रास वाढतो. पण तुम्हांला इन्ग्रोव्हन केसांचा त्रास कमी करायचा असेल तर डरमेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि त्यानुसार पुढील उपचार पद्धती निवडा. याचप्रमाणे प्युबिक एरियावरील केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करावा का ?
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock