Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुलगा वयात आला याचे संकेत देतात ही ’5′लक्षणं !

$
0
0

मुलांनी प्रौढ वयात प्रवेश करण्याचा काळ म्हणजे पौगंडावस्था.या अवस्थेमध्ये मुलांमध्ये हॉर्मोनल,शारीरिक आणि भावनिक असे अनेक बदल होतात.पौगंडावस्था अनुभवणा-या  मुलांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.त्यामुळे या अवस्थेतील बदल समजून घेणे मुलांसाठी फारच कठीण असते.अनेक लोकांना विशेषत: पालकांना या काळात मुलांमध्ये मूड स्वींग,आक्रमकता,बंडखोरपणा व मुलांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलण्याचा अनुभव येऊ शकतो.त्याचप्रमाणे पौगंडावस्थेत शरीरात होणा-या हॉर्मोनल बदलांमुळे मुलांमध्ये अनेक भावनिक बदल देखील जाणवू लागतात.ब-याचदा पौगंडावस्थेत १२ ते १४ वर्षांच्या मुलांमध्ये शारीरिक बदलांमुळे मुड बदलत असल्याचे दिसून येते.असे असले तरी देखील अशा मुलांना या काळात त्यांचे पालक अथवा मोठ्या माणसांशी याबाबत संवाद साधणे कठीण जाते.चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. सुची दळवी यांच्यामते पौगंडावस्था ही प्रत्येकासाठी निरनिराळी असू शकते.यासाठी जाणून घ्या आजकाल मुलांमध्ये पौगंडावस्था लवकर येण्याची 5 प्रमुख कारणंं

डॉ. सुची दळवी यांच्याकडून जाणून घेऊयात मुलांमधील पौगंडावस्थेत त्यांच्यामध्ये जाणवणारी ही काही सामान्य लक्षणे-

  • मुलांमधील पौगंडावस्थेचे प्राथमिक लक्षण म्हणजे या काळात त्यांचे टेस्टीकल म्यॅच्युर्ड होतात.त्यांच्या टेस्टीकलचा आकार वाढतो पण Scrotum मात्र लहान होतात व त्यांचा रंग देखील जास्त गडद होतो.

  • तसेच पेल्विक भाग देखील पेनिस सह गडद रंगाचा दिसू लागतो

  • काखेत व प्युबिक भागात केस येण्यास सुरुवात होते.

  • पौगंडावस्थेतकाही मुलांना चेह-यावर देखील केस (दाढी व मिसरुड ) येऊ लागतात.तर काही मुलांना चेह-यावर केस (दाढी व मिशी) उशीरा येतात.

  • पौगंडावस्था ही अशी अवस्था असते ज्यामध्ये मुले सेक्शुअली प्रौढ होतात.त्यामुळे जाणून घ्या या अवस्थेत मुलांना पॉर्न बघण्यापासून कसे परावृत्त कराल ?

  • तसेच या काळात मुलांचे सेक्शुअल इच्छेमुळे जाणिवपुर्वक इरेक्शन देखील होऊ लागते.

  • मुलांना पौगंडावस्थेत घाम अधिक येऊ लागतो.

  • मुलांच्या आवाजात बदल जाणवू लागतात व आवाज घोगरा होतो.

  • अनेक मुलांच्या त्वचेमध्ये देखील यामुळे बदल होतात.अचानक त्यांची त्वचा तेलकट अथवा कोरडी होते व त्वचेवर अॅक्ने येऊ लागतात.

  • पौगंडावस्थेत मुलांमध्ये अनेक भावनिक बदल जाणवतात.त्यांच्यामध्ये मूडस्वींग होणे,एकलकोंडेपणा व आक्रमकता या गोष्टी आढळू लागतात.या सर्व बदलांसह त्यांच्यामध्ये शारीरिक बदल विशेषत: त्वचेच्या समस्या अधिक जाणवतात.तसेच त्यांच्यामध्ये कमी आत्मसन्मान व लोकांसमोर असलेली त्यांची शारीरिक प्रतिमा याबाबत समस्या देखील जाणवतात.यासाठी तुमची मुलं लपून सिगारेट, ड्रग्ज घेतात का ? हे ओळखण्याचे ’9′ संंकेत देखील जरुर वाचा.

पौगंडावस्था ही मुलांमधील अशी अवस्था असते ज्यावेळी मुलांना पालकांचा आधार व समजूतदारपणाची अधिक गरज असते.एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसोबत संवाद साधून त्यांच्या आयुष्यात घडणारे बदल हे त्यांच्या वाढीमधील अगदी सामान्य बदल असून त्यात काहीही अयोग्य व लाजिरवाणे नाही हे त्यांना समजावून सांगायला हवे.त्याचप्रमाणे मुलांच्या मनातील शंका व चिंतावर तुम्ही उत्तर देण्यासाठी सतत तयार असायला हवे.यासाठी मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग ! जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>