Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात जुळ्या गर्भाची कशी काळजी घ्याल ?

$
0
0

आई होणं हा स्त्रीच्या जीवनातील एक सुखद अनुभव असतो. विशेषत: जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांना जन्म देणार असता तेव्हा तुमच्या गर्भात दोन  जीव वाढत आहेत ही भावना फारच सुखावह असते.सहाजिकच तुम्हाला इतर गरोदर स्त्रीयांपेक्षा अधिक काळजी घेत सावध राहण्याची गरज आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार ३० ते ४० या वयोगटातील गरोदर स्त्रीयांमध्ये जुळी बाळं होण्याची शक्यता अधिक असते असे आढळले आहे.कारण या वयोगटातील स्त्रीयांमधील ओव्हूलेटरी सायकल अनियमित असते.त्यामुळे दोन स्त्रीबीजांचे ओव्हूलेशन होऊन त्यांना  जुळी गर्भधारणा होऊ शकते.हे जरुर वाचा जुळ्या बाळासाठीचे प्रयत्न यशस्वी करतील हे ’6′ पर्याय !

जुळी गर्भधारणा झाल्यास काय काळजी घ्याल-

अशा वेळी तुमच्या शरीराचे व बाळांचे योग्य पोषण करत तुमचे वजन देखील नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी जरुर लक्षात ठेवा-

१.प्रसूती तज्ञांची नियमित भेट घ्या-

तुम्हाला जुळी गर्भधारणा झाली असेल तर गरोदरपणात तुम्हाला सतत अल्ट्रासाउंड व काही टेस्ट कराव्या लागतात.ज्यामुळे डॉक्टरांना तुमच्या बाळाची वाढ व विकासाबाबत अचूक माहिती मिळते.जाणून घ्या गर्भात असताना बाळ करते या ’8′ इंटरेस्टिंग गोष्टी !

२.पोषणमुल्ये वाढवणे-

जर एखाद्या मातेला दोन अथवा त्यापेक्षा जास्त गर्भधारणा झाली असेल तर त्या मातेने अधिक प्रमाणात प्रोटीन,फॉलीक अॅसिड,कॅल्शियम,लोह अशा अनेक पोषणमुल्यांचे सप्लीमेंट घेणे गरजेचे अाहे.यासाठी दररोज योग्य व पोषक आहार घ्या.तसेच गरोदरपणात आठवणीने प्रसूतीपूर्व व्हिटॅमिन देखील घ्या.कारण जुळे गर्भ असलेल्या गरोदर स्त्रीला अॅनिमिया होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे तिला व तिच्या गर्भांना अधिक लोह व आवश्यक पोषणमुल्यांची गरज असते.यासाठी हे जरुर वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

३.अधिक आराम करणे-

अशा वेळी काही जणींना गरोदरपणात घरी अथवा हॉस्पिटलमध्ये पुरेसा आराम करण्याची गरज लागू शकते.मात्र हे त्या स्त्रीची शारीरिक अवस्था व तिच्या समस्या यावर अवलंबून असू शकते.साधारणपणे प्रौढ वयातील व जुळी अथवा तिळी गर्भधारणा असणा-या गरोदर स्त्रीला तिच्या गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीमध्ये बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात येतो.यासाठी वाचा बेड रेस्टचा सल्ला दिलेल्या गरोदर स्त्रीयांसाठी खास टीप्स !

४.प्रसूतीकाळ लवकर असणे-

एकच गर्भधारणा असेल तर प्रसूतीपर्यंतचा कालावधी हा ३९ आठवड्यांचा असतो.पण जुळ्या गर्भांसाठी हा कालावधी ३७ आठवडे अथवा त्यापेक्षाही अगोदर असू शकतो.असे म्हटले जाते जितके जास्त गर्भ तितका गरोदरपणाचा कालावधी कमी असतो.डॉक्टरांच्या मते जुळ्या बाळांचा जन्म ३४ आठवड्या नंतर होणे हे सामान्य आहे.जर तुमची प्रिमॅच्युर डिलीवरी होण्याची शक्यता असेल तर डॉक्टर तुमच्या बाळांच्या फुफ्फुसांच्या वाढीसाठी तुम्हाला स्टिरॉइडस देऊ शकतात.कारण आजकाल प्रिमॅच्युर बाळांमध्ये फुफ्फुसांची वाढ कमी होण्याची समस्या अधिक वाढत आहे.या ’11′ कारणांमुळे वाढतो प्रिमॅच्युअर डिलेव्हरीचा धोका !

५.सिझेरीयन डिलेवरी-

जुळी बाळे असतील तर सिझेरीयन डिलीवरीची शक्यता अधिक असते.तुमची नैसर्गिक प्रसूती देखील होऊ शकते पण हे त्यावेळी बाळांच्या असलेल्या स्थितीवर अवलंबून असते.जर पहिल्या बाळाचे डोके खालच्या दिशेने असेल तरच नैसर्गिक प्रसूती करणे सुलभ असू शकते.कधीकधी पहिले  बाळ नैसर्गिक प्रसूतीने जन्माला येते तर काही समस्या आल्यास दुस-या बाळासाठी मात्र सिझेरीयन करावे लागते.यासाठी वाचा सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका

५.उच्च रक्तदाब-

जुळ्या गर्भाधारणा असलेल्या मातेला उच्च रक्त दाबाचा त्रास असण्याची दाट शक्यता असते.उच्च रक्त दाबासह मूत्रामध्ये प्रोटीन असल्यास Preeclampsia ही समस्या होऊ शकते.ही समस्या गरोदरपणात सामान्यत: २० आठवड्याआधी किंवा ३७ आठवड्यानंतर होते.कधी कधी गरोदरपणाच्या दुस-या टप्प्यात Pre-eclampsia ही समस्या होण्याची देखील शक्यता असते.वेळेत निदान झाल्यास नियमित औषधोपचारांनी या समस्या कमी करता येऊ शकतात.आता गरोदर स्त्रियांमधील ‘हाय बीपी’चे निदान वेळीच होणार !

जुळ्यांचे प्रकार-

जुळ्या बाळांचे Fraternal आणि Identical हे दोन प्रकार असतात-

Fraternal-

जेव्हा दोन शूक्राणू व दोन स्त्रीबीजांचे फलन होऊन एकाच वेळी गर्भाशयात दोन गर्भधारणा होतात तेव्हा त्या प्रकाराला Fraternal अथवा नॉन-आयडेंटीकल जुळी असे म्हटले जाते.ही दोन भावंडे समान लिंगाची अथवा भिन्न लिंगाची असू शकतात.

Identical-

जेव्हा एकच स्त्रीबीजाचे फलन होते पण त्याचे विभाजन होऊन त्यामुळे दोन गर्भ धारण होतात तेव्हा त्या प्रकाराला आयडेंटीकल जुळी असे म्हणतात.हे दोन्ही गर्भ एकाच जीन्स अथवा गुणसूत्राचे असतात.त्यामुळे या प्रकारातील जुळी बाळे समान लिंगाची व एकसारखीच दिसणारी असतात.

गरोदपणामुळे तुम्हाला मातृत्व लाभत असले तरी तुम्ही या काळात काळजी घेण्याची  फार आवश्यक्ता अाहे.जर तुमचे शरीर त्या गर्भाची वाढ पोषण करण्या इतपत निरोगी व पोषक असेल तरच तुम्ही सुदृढ बाळांना जन्म देऊ शकता.यासाठी जुळ्या बाळांना जन्म देण्यासाठी माता देखील तितकीच सुदृढ असणे आवश्यक आहे.तुमच्या आहारातून तुमच्या गर्भांना कमीतकमी २७०० कॅलरीज,पुरेसे कॅल्शियम व लोह याचा पुरवठा होईल याची काळजी घ्या.

तुम्हाला जुळ्या बाळांमुळे कदाचित लवकर प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार असेल तर त्याची आधीच तयारी करुन ठेवा.तुमच्या डॉक्टराकडून प्रसूतीपूर्व आरोग्य काळजी, हॉस्पिटल,तिथल्या सुविधा,नवजात शिशू अतिदक्षता विभाग याविषयी आधीच माहिती घ्या.डिलेव्हरीसाठी हॉस्पिटल्समध्ये जाताना तुमच्या सोबत या 23 वस्तू ठेवा !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>