Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बाळासाठी डायपरऐवजी कापडी लंगोट वापरत असाल तर या ’5′गोष्टींचे भान ठेवा

बाळाला कपड्यांचे डायपर वापरताना कोणती दक्षता घ्यावी हे सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हे स्पष्ट करु इच्छितो की कपड्यांचे डायपर वापरणे हा तितकासा योग्य पर्याय नाही.कारण त्यापेक्षा डिस्पोजेबल डायपर वापरणे अधिक सोपे व आरामदायक असू शकते.पण काही लोकांना डिस्पोजेबल डायपरच्या वापरामुळे बाळाला डायपर रॅशेसची चिंता सतावत असते.पालकांची ही चिंता अगदी स्वाभाविक असली तरी बाळाला डायपर रॅशेस हे कपड्यांच्या लंगोटमुळे देखील होऊ शकतात.मात्र कधीकधी बाळाच्या गुप्तांगावर फंगल इनफेक्शन झाल्यास त्याला कपड्यांचे डायपर वापरावे लागतात.

यासाठी जाणून घेऊयात बाळाला कपड्यांचे डायपर अथवा लंगोट वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी-

१.भरपूर प्रमाणात कपड्याच्या डायपरचा साठा करा-

जर तुम्ही तुमच्या बाळासाठी कपड्यांचे लंगोट अथवा डायपर वापरणार असाल तर प्रथम ते मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवा.जर दिवसभरात तुमच्या बाळासाठी सहा डिस्पोजेबल डायपर वापरावे लागत असतील तर कपड्यांचे डायपर तुम्हाला त्या प्रमाणाच्या दुप्पट लागू शकतात.त्यामुळे कपड्यांचे डायपर जरी इको-फ्रेन्डली असले तरी ते तुम्हाला मोठ्या प्रमाणावर खरेदी करावे लागतात.धावपळ कमी करण्यासाठी दररोज कमीतकमी एक डझन कपड्यांचे डायपर तयार ठेवा.

२.कपड्याचे डायपर वेळीच धुण्यास विसरु नका-

कपड्यांचे डायपर वापरताना ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.कारण जरी तुम्ही एक डझन कपड्याचे डायपर खरेदी केलेले असले तरी ते कमीच पडू शकतात.यासाठी  लंगोट वेळच्या वेळी धुणे गरजेचे आहे तसेच ते धुताना स्वच्छ धुवावेत जेणेकरुन त्याला बाळाच्या शी-शूचा वास येणार नाही.बाळाचे कपड्याचे डायपर धुण्यासाठी कधीच टाळाटाळ करु नका.कमीतकमी तीन दिवस पुरतील एवढे कपड्याचे डायपर आधीच तयार करुन ठेवा.ज्यामुळे तुमच्या बाळाला दिवसभरात किती डायपर वापरावे लागतात हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल.

उदा.जर तुमच्या बाळाला दररोज सहा कपड्यांचे डायपर लागत असतील.तर सहा-सहा कपड्यांच्या डायपरचे पॅक दोन दिवसांसाठी आधीच तयार करुन ठेवा.तसेच दररोज वापरलेले डायपर वेळच्यावेळी धुण्यास मात्र मुळीच विसरु नका.यामुळे पुन्हा त्यांचा वापर करण्यापूर्वी ते चांगले स्वच्छ व कोरडे झालेले असतील.कदाचित एखाद्या दिवशी तुमच्या बाळाला नेहमीपेक्षा अधिक कपड्यांचे डायपर देखील लागू शकतात.जाणून घ्या उन्हाळ्यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी ६ टीप्स

३.क्विक-ड्राय शीट जवळ बाळगा-

तुमच्या बाळाच्या पाळणा अथवा बेडवर क्विक-ड्राय शीट पसरुन ठेवा.कारण बाळाने त्याच्या पाळण्यातील गादीवर शू केली तर त्यामध्ये जंतुसंसर्ग होऊन बाळाला इनफेक्शन अथवा त्याच्या त्वचेला अॅलर्जी होऊ शकते.तसेच कपड्यांचे डायपर वापरल्यामुळे बाळाच्या शी-शूचा त्याच्या दुपटयांना दुर्गंध येऊ शकतो जो नंतर काढून टाकणे कठीण जाते.वाचा बाळाला मोजे घालून झोपवणे योग्य आहे का?

४.तुमच्या बाळाचे गुप्तांग कोरडे ठेवा-

जेव्हा तुम्ही डिस्पोजेबल डायपर वापरता तेव्हा बाळाचे गुप्तांग कोरडेच राहते.पण कपड्यांचे डायपर वापरताना तुम्हाला बाळाच्या गुप्तांगाची व्यवस्थित स्वच्छता राखावी लागते व ते कोरडे राहील याची देखील काळजी घ्यावी लागते.जरी तुम्हाला कंटाळा आला असला तरी तुम्ही बाळाचे गुप्तांग कोरडे न करताच त्याला दुसरा कपड्याचा डायपर वापरु शकत नाही.कारण गुप्तांग ओलसर राहील्यास बाळाला डायपर रॅशेस होऊ शकतात.यासाठी वाचा बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय.

५.इनफेक्शन टाळण्यासाठी बाळाचे लंगोट व्यवस्थित सॅनिटाइज अथवा निर्जंतूक करा-

कपड्यांचे लंगोट अथवा डायपर वापरणे हे एक कष्टाचे काम असू शकते कारण ते आपल्याला सतत सॅनिटाइज अथवा निर्जंतूक करावे लागतात.लंगोट धुणे व स्वच्छ करणे हा सॅनिटाइज करण्याचाच एक भाग असतो.काही मातांना वाटते की लंगोट धुतल्यावर त्यांना निर्जंतूक करण्यासाठी त्यांना अॅन्टीबॅक्टेरियल लिक्विडच्या पाण्यात धुणे योग्य असू शकते.मात्र लक्षात ठेवा हे लिक्वीड वापरायचे असल्यास शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ते लंगोट धुवा जेणेकरुन त्या लिक्वीडच्या केमिकल्सचे अवशेष बाळाच्या डायपरमध्ये राहणार नाहीत.यासोबत या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड ! हे देखील जरुर जाणून घ्या.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>