Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

क्षयरोगामुळे महिलांना वंधत्व येऊ शकते का?

$
0
0

क्षयरोगाचा धोका कमी करण्यासाठी  योग्य काळजी व वेळीच उपचार घेतल्यास हा  या आजारातून बाहेर पडणं शक्य आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य विकार असल्याने त्याचे इनफेक्शन प्रामुख्याने रुग्णाला प्रथम फुफ्फुसांमध्ये होते.मात्र हे इनफेक्शन फक्त फुफ्फुसांपर्यंत मर्यादित न राहता पुढे ते शरीरातील इतर अवयवांपर्यंत देखील पोहचू शकते.त्यामुळे होणारे एक्ट्रा पल्मोनरी टीबी अथवा सेकंडरी टीबी देखील तितकेच प्राणघातक असू शकतात.भारत हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत क्षयरोगाचे प्रमाण जास्त असेलेला असलेला देश आहे.असे असले तरी क्षयरोग – एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार !आहे हे देखील जरुर वाचा.

नवी मुंबईच्या अपोलो क्लिनीकच्या कन्सल्टंट गायनेकॉलॉजीस्ट बंदिता सिन्हा यांच्या मते भारतात पल्मोनरी टीबी हा प्राथमिक विकार असून त्याचे प्रमाण सामान्यपणे सर्वत्र आढळून येते.त्याचप्रमाणे दरवर्षी एक्ट्रा पल्मोनरी टीबीच्या अहवाला मध्ये देखील लक्षणीय वाढ होत आहे.

एक्ट्रा पल्मोनरी टीबी अथवा सेकंडरी टीबी महिलांसाठी अधिक धोकादायक असतात-

टीबीचे प्राथमिक इनफेक्शन हे फुफ्फुसांमध्ये होेते तर एक्ट्रा पल्मोनरी टीबीचे इनफेक्शन शरीरातील कोणत्याही अवयवांना होऊ शकते.डॉ.सिन्हा यांच्या मते या इनफेक्शनचे प्रसारण haematogenous मार्गातून होते.शरीराच्या इतर भागात रक्ताद्वारे त्याचे प्रसारण होत असते. उदा.युरीनरी ट्रॅक,जेनीटल ट्रॅक,हाडे व सांधे या अवयवांना देखील टीबीचा संसर्ग होऊ शकतो.जर हा संसर्ग महिलांच्या जनेनद्रिंयाना झाला तर त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊन त्या स्त्रीला वंधत्व येते.

डॉ.सिन्हा यांच्या मते भारतात महिलांमध्ये जेनीटल टीबी होण्याचे प्रमाण एकूण स्त्रीरोगांच्या तुलनेत १ ते २ टक्के आढळते.तसेच हा विकार होण्याचे कारण ५ टक्के पेल्विक इनफेक्शन व १० टक्के पल्मोनरी टीबी हे असू शकते.स्त्रीयांच्या प्रजनन वयात याचा प्रामुख्याने प्रभाव आढळतो.असे असले तरी कधीकधी हा विकार पोस्ट मॅनोपॉजच्या काळातील महिलांमध्ये देखील आढळू शकतो.तसेच यासाठी वेळीच जाणा क्षयरोगाची लक्षणं !

जेनीटील टीबी व वंधत्व यांचा काय संबध असतो-

जेनीटल टीबीचे निदान करणे आव्हानात्मक असते कारण हा विकार वाढे पर्यंत त्याची कोणतीही नैसर्गिक लक्षणे आढळत नाहीत.डॉ.सिन्हा यांच्या मतानूसार स्त्रीच्या जनेनद्रिंये व प्रजननमार्गात हे इनफेक्शन हळूहळू अगदी वाईट पद्धतीने परसल्यास कधीकधी वैद्यकीय हस्तक्षेपाची देखील फार मदत होऊ शकत नाही.ब-याचदा प्रजनन वयोगटातील महिला गरोदर राहण्यात अपयश आल्यावर जेव्हा वंधत्वावर उपचार घेतात तेव्हा जेनीटल टीबीचे निदान होते.प्राथमिक टप्प्यातून हे इनफेक्शन त्या स्त्रीच्या जननेद्रिंयापर्यंत पसरते.याचा प्रादुर्भाव प्रथम तिच्या फेलोपाइन ट्युब्सना होतो व नंतर हळूहळू तिच्या इतर प्रजनन अवयवांना देखील याची लागण होते.डॉ.सिन्हा यांच्या मते पल्मोनरी टीबी इनफेक्शनचा फेलोपाइन ट्युब्सवर १०० टक्के,गर्भाशयाचे अस्तर यावर ५० टक्के,अंडाशयावर २० टक्के,गर्भाशयाचे मुख यावर ५ टक्के,योनीमार्ग व बाह्य जननेद्रिंयावर १ टक्कांपेक्षा कमी असा दुष्परिणाम होतो.

टीबीच्या इनफेक्शनमुळे फेलोपाइन ट्युबवर दुष्परिणाम झाल्याने स्त्रीबीज फलित होऊन ट्युबमधून गर्भाशयापर्यंत पोहचत नाही.त्यामुळे त्या स्त्रीला गर्भधारणा राहण्यास अपयश येते.त्याचप्रमाणे हे टीबीचे जंतू गर्भाशयाच्या अस्तरांचे देखील नुकसान करतात.त्यामुळे फलित झालेले स्त्रीबीज गर्भाशयाच्या अस्तरावर रुजत नाही.सहाजिकच त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही.अंडाशयाला इनफेक्शन झाल्यामुळे बीजांडांची गुणवत्ता कमी होते.त्याचप्रमाणे गर्भाशयाचे मुख,योनीमार्ग व बाह्य जनेनद्रियांना संसर्ग झाल्यामुळे देखील गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.

रोगाची सुप्त लक्षणे-

जेनीटल टीबीचे निदान लवकर न होण्यामागे या विकाराची कोणतीही दर्शनीय लक्षणे आढळत नाहीत ही मुळ समस्या असते.असे असले तरी या समस्येमध्ये काही सुक्ष्म लक्षणे आढळू शकतात.विशेषत: जर त्या स्त्रीला पुर्वी पल्मोनरी टीबीची समस्या झाली असेल तर तिच्यामध्ये  या विकारीची ही सुक्ष्म लक्षणे आढळू शकतात-

ही दोन्ही लक्षणे त्या महिलेच्या जनेनद्रिंयामध्ये काही तरी गंभीर बिघाड झाला आहे असे दर्शवतात.या लक्षणांसह विशेषत: जर त्या स्त्रीला जर पुर्वी पल्मोनरी टीबीची समस्या झाली असेल तर तिला जेनीटल टीबी होण्याची दाट शक्यता असते.

उपाययोजना-इतर टीबी प्रमाणे जेनीटल टीबीवर उपचार करणे सोपे नसून आव्हानात्मक असते.डॉ.सिन्हा यांच्यामते जेनीटल टीबीमध्ये रक्त चाचणी ,कफाची तपासणी अथवा छातीचा एक्स-रे या चाचण्या केल्यास त्यामध्ये काहीही समस्या आढळत नाहीत.त्यामुळे याबाबतीत सविस्तर तपासणी करण्याची गरज भासू शकते.सामान्यत: जेनीटल टीबीचे निदान होणे हे वंधत्वावर करण्यात येणा-या उपचारांचाच एक भाग असते.

जेनीटल टीबीचे निदान करण्यासाठी या टेस्टची मदत होऊ शकते-

Endometrial biopsy- डॉ.सिन्हा यांच्यामते या टेस्टमुळे गर्भाशयाच्या अस्तरामध्ये काही बिघाड झाला आहे का याची कल्पना येऊ शकते.तसेच गर्भधारणा न होण्यामागील कारण देखील यामुळे समजू शकते.या टेस्टमुळे टीबीचे इनफेक्शन झाले आहे का हे देखील शोधण्यास मदत होते.

Culture of menstrual blood-या टेस्टमुळे देखील टीबीचे इनफेक्शन झाले आहे का ते समजू शकते.विशेषत: हे इनफेक्शन योनीमार्गाचे अस्तर अथवा गर्भाशयाचे मुख व बाह्य जनेनद्रिंयाना झाले असेल तर त्याचे निदान होते.

Laproscopy- Lapro-hysteroscopy केल्याने जेनीटल टीबीमुळे प्रजनन अवयवांचे काही नुकसान झाले आहे का ते समजू शकते.

जेनीटल टीबीवर काय उपचार करण्यात येतात-

जेनीटल टीबीचे निदान झाल्यावर त्या स्त्रीच्या प्रजनन अवयवांना सक्रिय करण्यासाठी व  वंधत्वावर मात करण्यासाठी पुढील उपचार करण्यात येतात.

ATT treatment-सर्वप्रथम त्या स्त्रीवर टीबी प्रतिबंधक उपचार करण्यात येतात.डॉ.सिन्हा यांच्यामते वंधत्वाचे निवारण करुन नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यासाठी त्या स्त्रीने या उपचारातील औषधांचा पूर्ण कोर्स घेणे गरजेचे असते.

Restorative surgery-जर जेनीटल टीबीच्या जंतूंमुळे प्रजनन अवयवांचे नुकसान झाले असेल तर त्या रुग्णावर उपचार करण्याचा Restorative surgery हा एकमेव मार्ग असतो.डॉ.सिन्हा यांच्या मते या विशेष शस्त्रक्रियेद्वारे त्या स्त्रीच्या प्रजनन अवयवांवर उपचार केल्याने त्या स्त्रीला गर्भधारणा व सुलभ प्रसूतीसाठी  मदत करता येऊ शकते.

जेनीटल टीबी पासून बचाव कसा करावा-

आजकाल प्रजनन वयोगटाच्या महिलांमध्ये जनीटल टीबीचे प्रमाण अधिक आढळत असल्याने या टीबी पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आधीच याबाबत उपचार करणे गरजेचे आहे.डॉ.सिन्हा यांच्या मते एक्ट्रा पल्मोनरी टीबीचे बॅक्टेरीया देखील फुफ्फुसांच्या संसर्गामुळेच पसरत असल्याने आधी त्याबाबत योग्य निदान करुन त्वरीत उपचार सुरु करावेत.चांगल्या परिणांमासाठी औषधांचा कोर्स पुर्ण करणे फार गरजेचे आहे.ब-याचदा अनेक लोक रोगाची लक्षणे दिसणे कमी झाले की औषधे घेणे बंद करतात.त्यामुळे ते विषाणू नंतर या औषधांना प्रतिसाद देत नाहीत.तसेच पहिल्या इनफेक्शनवर योग्य उपचार न झाल्यास त्यामुळे एक्ट्रा पल्मोनरी टीबी देखील होऊ शकतो.त्याच प्रमाणे डॉ.सिन्हा याबाबत अधिक सांगतात की अगदी दुर्मिळ प्रमाणात जेनीटल टीबी झालेल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने देखील याची लागण होऊ शकते.मात्र असे फार कमी प्रमाणात घडते.त्यामुळे जर तुमचा जोडीदार टीबीवर उपचार घेत असेल तर सुरक्षित सेक्स रिलेशन ठेवणे हेच हितकारक असू शकते.

जेनीटल टीबी टाळण्यासाठी प्रथम पल्मोनरी टीबीपासून बचाव करणे गरजेचे आहे.योग्य स्वच्छता राखून व पोषक आहार घेऊन तुम्ही या रोगापासून बचाव करु शकता.टीबी हा संक्रमित व्यक्तीच्या शिंकणे अथवा सर्दी-खोकल्यातून देखील पसरु शकतो त्यामुळे संक्रमित व्यक्तीने याबाबत विशेष काळजी घ्यावी व औषधाचा कोर्स पुर्ण करावा ज्यामुळे त्यांना मल्टी-ड्रग्ज रेसिस्टंट टीबी पासून स्वत:ला वाचविता येईल.

जेनीटल टीबी असेल्या महिलामध्ये त्यांच्यावरील उपचार पुर्ण झाल्यावर देखील गर्भधारणा राहण्याची शक्यता खूप कमी असते.ब-याचदा अशा महिलांना अनैसर्गिक उपचार पद्धतींची मदत घ्यावी लागते.आयव्हीएफ उपचारांचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.यासाठी जाणून घ्या IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ? तसेच कधीकधी या आजारपणामुळे त्यांच्या प्रजनन अवयवांचे देखील खूप नुकसान होते.त्यामुळे अशा महिलांना मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी सरोगसी उपचारांची मदत घ्यावी लागू शकते.यासाठी वाचा सरोगसी म्हणजे काय ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles