Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लठ्ठपणाचा किडनीवर होतो या ’5′प्रकारे दुष्परिणाम

किडनीचे कार्य बिघडण्यामागे तुमची शारीरिक अवस्था व जीवनशैली जितकी कारणीभूत असते तितकाच तुमचा लठ्ठपणादेखील कारणीभूत असू शकतो.लठ्ठपणा ही शरीराची एक अशी अवस्था असते ज्या अवस्थेत तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात व किडनीसारख्या इतर अवयवांचे नकळत नुकसान होते.यासाठी किडनीविकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका.

कधीकधी लठ्ठपणाचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो तर कधीकधी हळूहळू किडनीमध्ये बिघाड निर्माण होऊ लागतात. शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे किडनीवर हा ताण येण्यास सुरुवात होते.याबाबत झेन हॉस्पिटलचे consultant nephrologist and kidney transplant physician डॉ.विश्वनाथ बिला यांच्या मते किडनीचे कार्य शरीरातील प्रोटीन बाहेर टाकणे नसून शरीतातील फक्त टाकाऊ पदार्थ व विषद्रव्ये बाहेर टाकणे हे आहे.

डॉक्टर बिला यांच्या सल्लानूसार जर तुमची किडनी निरोगी असावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा लठ्ठपणा वाढणार नाही याची काळजी घ्या.यासाठी तुम्ही तुमच्या बीएमआय रेंजवर नियंत्रण ठेऊ शकता.बीएमआय अथवा बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचे वजन व उंची यानूसार तुमच्या शरीरातील चरबीचे मोजमाप करणे.एखाद्या व्यक्तीचा बीएमआय ३० च्या पुढे असेल तर ती व्यक्ती लठ्ठ असू शकते.डॉक्टर बिला यांच्या मते याबाबत योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी व निरोगी बीएमआय साठी तुमचे वजन अंदाजे ६० किलो पर्यत असावे.कारण तुमचे वजन १२० किलो जरी असले तरी त्यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांचा आकार व कार्यक्षमता वाढत नाही.६० किलो वजन असणे आवश्यक असलेल्या व्यक्तीचे वजन १२० किलो असल्यास त्याच्या अवयवांवर या अतिवजनाचा ताण येऊ लागतो.यासाठी जाणून घ्या बॉडी मास इंडेक्स खरंच देते का वजनाचा अचूक अंदाज ?

लठ्ठपणाचा परिणाम तुमच्या किडनीवर अशा प्रकारे होऊ लागतो-

टाईप 2 डाएबिटीसचा धोका वाढतो 

लठ्ठपणाच्या स्थितीत तुमच्या शरीरातील साखर दिवसेंदिवस वाढू लागते.ब-याच लठ्ठ माणसांना टाईप 2 डाएबिटीस असतो.डॉक्टर बिला यांच्या मते फक्त लठ्ठ शरीरामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढत नसून शरीरातील चरबीमुळे इन्सुलीनच्या कार्याला अवरोध होतो ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.ज्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.किडनीला रक्त शुद्ध करुन विशद्रव्ये शरीराबाहेर टाकण्याच्या कार्यावर ताण येऊ लागतो.कालांतराने किडनीतील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होते व त्यांची रक्तशुद्ध करण्याची क्षमता कमी होते.ज्यामुळे शरीरातील प्रथिनांची गळती होऊ लागते व शरीरात मीठ आणि पाणी जमा होऊ लागते.या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भयंकर किडनी विकार होतात अथवा किडनी निकामी होते.यासाठी किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !

हायपरटेंशनचा त्रास बळावतो 

लठ्ठपणा व उच्च रक्त दाब नेहमी एकत्रच येतात.डॉक्टरांच्या मते शरीराचा आकार जरी वाढला तरी ह्रदयाची रक्त पंप करण्याची कार्यक्षमता तितकीच असते.लठ्ठपणामुळे ह्रदयाला जास्त रक्त पंप करावे लागल्यामुळे त्याच्यावर ताण येऊ लागतो ज्याचा परिणाम किडनी व शरीरातील इतर अवयवांवर होऊ लागतो.कालांतराने या अनियंत्रित उच्चरक्तदाबाचा परिणाम किडनीच्या रक्तवाहिन्यांवर पडू लागतो व त्या अरुंद व कमजोर होतात.या रक्तवाहिन्या कठीण झाल्यामुळे किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.मोठ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे लहान रक्तवाहिन्यांना रक्तातून होणारे पोषण व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर याचा हळूहळू परिणाम होऊ लागतो.हे देखील जरुर वाचा किडनी खराब होण्याची ही आहेत ‘५’ कारणंं

कोलेस्टेरॉल वाढू लागते-

लठ्ठपणामुळे सहाजिकच शरीरातील कोलेस्टेरॉल व एचडीएल चे प्रमाण वाढू लागते.डॉक्टर बिला यांच्या मते कोलेस्टेरॉल अधिक असल्यामुळे ह्रदय धमन्यांमध्ये चरबी जमा होऊन धमन्या अरुंद होऊ शकतात ज्यामुळे हार्ट अटॅक व किडनी बिघाड हा दुहेरी धोका वाढतो.तुळस – मधूमेह आणि कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण मिळवण्याचा घरगुती उपाय जरुर करुन पहा.

मेटाबॉलिक विकार वाढू शकतात-

लठ्ठपणा हे अनेक विकारांचे माहेरघर आहे.विशेषत: पोटाच्या भागाकडील लठ्ठपणा असल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.यामुळे हाय ब्लड प्रेशर,हाय ब्लड शूगर,हाय लिपीड लेवल या समस्या निर्माण होतात.मधुमेहाचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर देखील होऊ शकतो.वाचा या कारणांंमुळे पायांंवर वाढते सूज !

स्लीप अॅप्नीया होऊ शकतो-

सामान्यत: लठ्ठपणात घोरणे हे स्लीप अॅप्नीयाचे एक लक्षण आढळून येते.घोरल्यामुळे झोपेत त्या व्यक्तीला ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो.कमी ऑक्सिजनचा ह्रदयाच्या कार्यावर परिणाम होतो.याचाच परिणाम पुढे रक्तदाबावर देखील होतो.ज्यामुळे किडनीला रक्तपुरवठा करणा-या  रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो व हळूहळू किडनीच्या कार्यावर दुष्पपरिणाम होऊ लागतो.यासाठी वाचा शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !

लठ्ठपणाच्या किडनीच्या कार्यावर निरनिराळ्या प्रकारे परिणाम होत असतो.डॉक्टर बिला यांच्या मते लठ्ठ लोकांनी हा धोका टाळण्यासाठी दर सहा महिन्यातून नियमित युरीन टेस्ट करणे गरजेचे अाहे.ज्यामुळे किडनीच्या कार्याबाबत तुम्हाला पुरेशी माहिती मिळू शकते.चाचणी दरम्यान जर लघवीमध्ये प्रोटीन आढळल्यास मात्र ती एक धोकेची सूचना असू शकते.थोडक्यात लठ्ठपणावर नियंत्रण ठेऊन तुम्ही तुमची किडनी नक्कीच निरोगी व सुरक्षित ठेऊ शकता.यासाठी या किडनी विकाराच्या रुग्णांसाठी ११ डाएट टीप्स जरुर करा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>