Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

क्षयरोगाचा धोका कमी करण्यासाठी या ’10′गोष्टी वेळीच जाणून घ्या !

$
0
0

क्षयरोग हा एक गंभीर विकार असून भारतात दर तीन मिनीटाला दोन रुग्ण क्षयरोगाचे बळी पडत असतात.मुंबईत जागे अभावी अनेक लोक दाटीवाटीने राहतात अशा राहणीमानामुळे या रोगाच्या वाढीमध्ये अधिकच भर पडते.तर अस्वच्छतेमुळे टीबीच्या बॅक्टेरीयांची अधिक जोमाने वाढ होते.त्यामुळे जर तुम्हाला या विकारापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर या १० गोष्टी जाणून घेणे फार गरजेचे आहे.

 # १-ब-याच जणांना फुफ्फुसांमध्ये नकळत टीबी जंतूंचा संसर्ग होऊ शकतो-

आपण सतत Mycobacterium Tuberculosis च्या संपर्कात येत असतो ज्यामुळे आपल्या फुप्फुसांना प्राथमिक टीबीचे इनफेक्शन होऊ शकते.मात्र आपल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे हा विकार होण्यापासून आपला बचाव होतो.पण जर काही कारणात्सव आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाली तर इनफेक्शन होऊन आपल्याला टीबी होण्याची शक्यता असते.या प्रक्रियेला रिअॅक्टीवेशन असे म्हणतात.

# २-शरीराचे आरोग्य व रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवल्यामुळे तुम्हाला टीबीपासून बचाव करता येतो-

पोषक आहार,पुरेशी झोप,व्यायाम यामुळे तुमच्या आयुष्यातील ताण-तणावांना दूर ठेवणे व टीबीच्या इनफेक्शनला रोगप्रतिकार शक्तीने प्रतिबंध करणे तुम्हाला शक्य होते.चांगला आहार घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ४ ते ५ वेळा अॅन्टीऑसिडन्ट भरपूर प्रमाणात असलेल्या ताज्या भाज्या व ताजी फळे खा.जर काही अडचणींमुळे तुम्हाला ती खाणे शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्लानुसार दररोज अॅन्टीऑक्सिडन्ट किंवा मल्टीव्हिटॅमिनचे डोस घ्या.अॅन्टीऑक्सिडन्टमुळे तुम्हांला आजारात शरीरात निर्माण होणा-या फ्री रेडीकल्स विरुद्ध लढा देण्यास व शरीतील पेशींना दुरुस्त करण्यास मदत होते.जाणून घ्या कसे डाएटचं खूळ वाढवतंय ‘टीबी’चा धोका!

 # ३-ताजी हवा व सुर्यप्रकाशामुळे टीबीपासून संरक्षण मिळवता येते-

टीबीतील सुक्ष्मजीव थंड व ओलसर भागात पोसले जातात.तुम्ही घरी अथवा ऑफीसमध्ये कुठेही असलात तरी दिवसातील जास्तीत जास्त वेळ तेथील खिडक्या उघड्या ठेवा.ज्यामुळे त्या ठिकाणी पुरेसा सुर्यप्रकाश येईल व हवा देखील खेळती राहील.

 # ४-टीबीचा प्रभाव फुफ्फुसाप्रमाणेच इतर अवयवांवर देखील पडतो-

खोकला तीन आठवड्यांपेक्षा अधिक दिवस असेल,कफावाटे रक्त येत असेल,अंगात तापाची कणकण असेल,श्वास घेण्यास त्रास होत असेल व वजन खूपच कमी झाले असेल तर ही फुफ्फुसांच्या टीबीची लक्षणे असू शकतात.इतर अवयवांच्या टीबीची लक्षणे निराळी असतात.उदा.त्वचेच्या टीबीमध्ये बरे न होणारे व्रण होतात,पाठीच्या कण्यातील टीबीमध्ये पाठदुखी,पाठ जखडणे किंवा पाठीवर सूज येणे अशी लक्षणे दिसतात,आतड्यांच्या टीबीमध्ये ओटीपोटात ताण व बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो तसेच बरा न होणारा अॅनल फिस्टूला देखील टीबीमुळे होऊ शकतो. lymph nodes टीबीमध्ये शरीराच्या अनेक भागांवर सूज येते.विशेषत: लहान मुलांना होणारा Meningitis TB मेंदू व पाठीच्या कण्याशी सबंधीत असतो.

# ५-BCG या क्षयरोग प्रतिबंधक लसीमुळे आयुष्यभर टीबीला प्रतिबंध करता येत नाही-

या लसीकरणाची इतर प्रकारच्या टीबीला प्रतिबंध करण्यास देखील मदत होत नाही.यासाठी असे सांगण्यात येते की जन्माला आल्याबरोबर बाळाला इनफेक्शन टाळण्यासाठी लगेच BCG लस देणे गरजेचे आहे.

 # ६-टीबी उपचार करुन पुर्ण बरा करता येण्यासारखा विकार आहे-

जर नियमित योग्य पद्धतीने औषधांचा संपुर्ण कोर्स घेतला व याबाबत नियमित डॉक्टरांकडून तपासणी केली तर टीबी पुर्ण बरा करता येतो.१९९३ साली भारतात टीबी नियंत्रणासाठी RNTCP (Revised National Tuberculosis Control Program) राबवण्यास सुरुवात करण्यात आली.गेल्या दोन दशकांपासून या कार्यक्रमामुळे लक्षणीय प्रगती झाली आहे.भारतात खाजगी हॉस्पिटल व मेडीकल कॉलेजच्या सहकार्याने या कार्यक्रमाचा १०० टक्के प्रचार करण्यात आला.या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट (थुंकीची तपासणी व छातीचा एक्स-रे यांच्या द्वारे)रोगाचे त्वरीत निदान करणे,रुग्णाला लवकरात लवकर उपचार देणे व रुग्णाने (Directly Observed Treatment-DOTS)़डॉट उपचारपुर्ण

करण्यासाठी त्याला प्रवृत्त करणे.टीबीसाठी Isoniazid, Rifampicin, Pyrazinamide, Ethambutol व Streptomycin ही प्राथमिक औषधे देण्यात येतात.पण नेहमी ही औषधे डॉक्टरांच्या देखरेखी खालीच घ्यावीत.कारण त्यांचा गैरवापर झाल्यास कावीळ,लिव्हर निकामी होणे व किडनी निकामी होणे अशा समस्या होऊ शकतात.उपचारांचा कालावधी प्रत्येक रुग्णाच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असतो मात्र कमीतकमी सहा महिने उपचार घ्यावेच लागतात.सरकारी दवाखाने,प्राथमिक व कम्युनिटी आरोग्य केद्रांमध्ये क्षयरोगाची चाचणी व उपचार विनामुल्य करण्यात येतात.यासाठी हे जरुर वाचा क्षयरोग – एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार !

# ७-क्षयरोग प्रतिबंधक कार्यक्रमातील सर्वात प्रमुख अडथळा डॉक्टरांच्या सल्लानूसार सांगण्यात आलेल्या औषधांचा डोस पूर्ण न करणे हा आहे-

यामुळे शरीरात रोगावर ताबा मिळवणा-या फस्ट लाईन ड्रग्जंना विरोध करणारी यंत्रणा निर्माण होते ज्यामुळे मल्टी ड्र्ग्ज रेसीस्टंट टीबी होऊ शकतो.

# ८-स्टॅन्डर्ड टीबी ड्रग्स पेक्षा मल्टीपल-ड्रग्स रेसिस्टन्ट टीबी खर्चिक व त्रासदायक असल्यामुळे त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही-

MDR-TB चा प्रभाव नवीन केसेसमध्ये २.३ टक्के आहे तर परत उपचार करण्या-यांमध्ये याचे प्रमाण १२ ते १७ टक्के आहे.हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे डॉक्टरांच्या सल्लानूसार देण्यात येणारा टीबी प्रतिबंधक औषधांचा कोर्स पूर्ण करणे हा आहे.

 # ९- समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल स्तरांतील माहिलांमध्ये वंधत्व येण्याचे कारण जेनीटल टीबी आहे-

फुफ्फुसांना टीबीच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यास  ते विषाणू जननेद्रिंये व शरीरातील इतर अवयवांमध्ये देखील पसरतात.त्यांचा संसर्ग गर्भाशय अथवा फेलोपाइन ट्यूबला देखील होतो. सामान्यत: याची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत.त्यामुळे त्याचे निदान करणे फारच गुंतागुंतीचे असते.जननेद्रिंयाच्या मार्गातील टीश्यूजच्या नमुन्यांची चाचणी करुन त्याचे निदान करता येऊ शकते.यासाठी वाचा या ’7′ कारणांमुळे स्त्रियांच्या पेल्विक भागात वेदना जाणवतात !

 # १०- लहान मुलांमध्ये अगदी तान्हा बाळाला देखील टीबी होऊ शकतो.पण ब-याचदा त्याचे निदान केले जात नाही-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशननूसार दरवर्षी सुमारे अर्धा दशलक्ष लहान मुलांना व नवजात बाळांना टीबी होतो व त्यातील ७०,००० मुले मृत्युमुखी पडतात.तीन वर्षांच्या आतील विशेषत: कुपोषित व रोग प्रतिकार शक्ती कमी असणा-या मुलांना क्षयरोग होण्याचा अधिक धोका असतो.असे असले तरी त्यांचा मृत्युदर अधिक असल्याने या लक्षणांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही.लहान मुलांचा क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी जन्माला आल्याबरोबर लहान बाळाला बीसीजी लस द्या ज्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुधारेल.तसेच घरातील मंडळी अगदी मदतनीस देखील जे मुलांच्या अधिक सहवासात असतात त्यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.त्याच प्रमाणे सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान केल्यामुळे देखील टीबीला प्रतिबंध करण्यासाठी लहान बाळाची प्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते. 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>