Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गुढीपाडवा विशेष –केशर फिरणी

$
0
0

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष ! या दिवशी पूजा झाल्यानंतर गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. श्रीखंड -पुरी हा पदार्थ हमखास बनवला जातो. पण उन्हाळ्याच्या दिवसात काहींना तेलकट पुर्‍या नकोशा वाटतात. मग अशावेळी गोडाचा हेल्दी आणि टेस्टी सोबतच थंडगार एखादा पदार्थ चाखायला मिळाला तर ?  पण गुढीपाडव्याला ‘कडूलिंब’ का खातात ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

फिरणी हा तांदळापासून बनवला जाणारा एक गोडाचा पदार्थ आहे. तसेच वेटलॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फिरणी ही लो फॅट किंवा लो कॅलरीयुक्त फिरणीदेखील बनवता येते. मग यंदा झटपट आणि हेल्दी फिरणी कशी बनवाल त्याची ही खास संजीव कपूरने दिलेली रेसिपी नक्की करून पहा.

साहित्य -:

  • स्किम्ड मिल्क  -  2  कप
  • 3 टेबलस्पून भिजवलेले तांदूळ
  • केशर 3-4 काड्या
  • वेलची पूड अर्धा टीस्पून
  • पिस्ता पूड एक टेबलस्पून
  • आर्टीफिशिअल स्वीटनर्स – 3 टीस्पून किंवा अर्धी वाटी किसलेला गूळ

कशी बनवाल फिरनी ?  

  • दूध उकळून एका बाजूला ठेवा आणि ते थोडे थंड होऊ द्यावे.
  • भिजत ठेवलेल्या तांदळामधून पाणी गाळून ते थोडावेळ निथळत ठेवा. पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ जाडेभरडे वाटा.
  • एक टेबलस्पून दूधामध्ये केशराच्या काड्या भिजत ठेवा.
  • दूधामध्ये तांदळाची पेस्ट मिसळून मिश्रण एकत्र करा. तयार मिश्रण  गॅसवर ठेवा आणि चमच्याने सतत  हलवत रहा. असे केल्याने गुठळी होणार नाही.
  • या मिश्रणामध्ये गूळ, पिस्ता पूड, वेलचीपूड आणि केशराचे दूध मिसळा.
  • मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • सर्व्ह करण्यापूर्वी फिरणी थोड्यावेळ फिरणी बाहेर ठेवा. फिरणी रूम टेम्परेचरला आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा.
  • फिरणी  मातीच्या मटक्यामधून सर्व्ह केली तर अधिक टेस्टी लागते. पण तुमच्याकडे जे  बाऊल उपलब्ध  असतील त्यामध्ये फिरणी काढून सर्व्ह करा.
  • सजावटीसाठी त्यावर पुन्हा पिस्त्याची पूड घाला.

वाटीभर फिरणीमध्ये सुमारे 220 कॅलरीज असतात. पण फिरणीप्रमाणेच इतर गोडाच्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात हेदेखील नक्की जाणून घ्या.

टीप – कॅलरी काऊंंट हा हेल्दीफाय मी अ‍ॅपनुसार आहे. (Calories calculated using HealthifyMe, the world’s first Indian nutrition tracker.) 

पण गुढीपाडव्याला मधूमेहींनाही श्रीखंडाचा आनंद घेता यावा याकरिता त्यांच्यासाठी खास हेल्दी टेस्टी फळांचे श्रीखंड नक्की करून पहा. फळांच्या श्रीखंडाप्रमाणे तुम्ही गुलकंदी श्रीखंड देखील नक्की घरीच बनवू शकता.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>