Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फक्त आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते का ?

$
0
0

मी ४५ वर्षांचा आहे. माझी कोलेस्ट्रॉल लेव्हल २५० mg/dl इतकी आहे. यावर माझ्या डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्या आणि त्याचबरोबर नियमित व्यायाम व काटेकोरपणे डाएट पाळण्याचा सल्ला दिला. गोळ्या घेणे गरजेचे आहे का? कारण मी असे ऐकले आहे की भविष्यात त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. डाएट व व्यायामाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे शक्य आहे का? जर तसे नाही झाले तर मला हृदयविकार होईल का? 

या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिटयूटचे Head of Department of Preventive Cardiology and Rehabilitation आणि Senior Interventional Cardiologist डॉ. निलेश गौतम यांनी दिले. तुम्ही औषधे घेत असाल किंवा नाही, पण कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी आहार आणि व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. म्हणून जर तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल सिमारेषेवर असेल म्हणजेच साधारण 200 gms/dl असेल तर ती स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टर जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देतात. अननसाने ठेवा कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण !

परंतु, जर तुम्हाला स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा काही समस्या असतील तर त्यानुसार डॉक्टर औषधे देतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदल करणे ही प्राथमिक पायरी आहे आणि औषधे देण्यापूर्वी डॉक्टर ती प्रथम पायरी पाळण्याचा सल्ला देतात. परंतु, नियमित व्यायाम करून आणि आहाराची बंधने पळून देखील कोलेस्ट्रॉल कमी किंवा नियंत्रित झाले नाही तर मात्र तुम्हाला औषधांची गरज असते.  तुळस – मधूमेह आणि कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण मिळवण्याचा घरगुती उपाय

जर तुम्ही औषधं घेण्याबरोबरच जीवनशैलीत देखील बदल केलेत तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित येण्याची शक्यता आहे. आणि जर आहार व व्यायामाने कोलेस्ट्रॉच्या पातळी नियंत्रित झाल्यास तुम्हाला औषधांची गरज नाही. पण जीवनशैलीतील बदलांना तुमचे शरीर कसे प्रतिसाद देते यावर सगळे अवलंबून आहे. शरीराचा योग्य प्रतिसाद मिळाल्यास आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहील व तुम्हाला औषधांची गरज भासणार नाही. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !

हृदयविकार होण्याची शक्यता कोलेस्ट्रॉलची पातळीवर अवलंबून असते. साधारणपणे भारतीयांमध्ये अधिक प्रमाणात LDL (low-density lipoprotein) आणि triglycerides असते. तर HDL (high-density lipoprotein) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. परिणामी आपल्याला अर्ट्रियल ब्लॉकेज होण्याची संभावना अधिक असते आणि त्यावर वेळीच उपचार न झाल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला पाळणे महत्त्वाचे आहे आणि डॉक्टरांशी बोलून तुमच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. निरोगी आयुष्यासाठी या १० टेस्ट नियमित करा

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>