तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? फ्रेंड्स, कलीग किंवा सोशल ग्रुपमध्ये बोलताना, गप्पा मारताना अथवा मत मांडताना शब्द सापडत नाहीत. नवीन क्लायंट, नवीन लोकांशी बोलताना काय बोलावे, कसे बोलावे ते समजत नाही. आपल्यापैकी बरेचजण कधी ना कधी या प्रसंगाला सामोरे गेले असतील. परंतु, योगसाधना व ध्यानधारणा केल्याने लोकांशी संवाद साधण्याच्या तुमच्या पद्धतीत बराच फरक पडतो. योगा एक्स्पर्ट रमण मिश्रा यांनी सांगितलेल्या या २ श्वसन प्रकारांनी सोशल एन्झाईटी म्हणजेच लोकांसमोर बोलताना वाटणाऱ्या भीतीवर मात करण्यास मदत होईल.
1. Forceful breath: यामुळे भीती, काळजी झटपट दूर होईल. ताण-तणाव हलका करून शांत होण्यास हा श्वसनप्रकार फायदेशीर ठरतो. तसंच भीती दूर करण्यासाठी तुम्ही योगमुद्रा देखील करू शकता. तुळशीचं पान चघळा आणि तणावमुक्त व्हा !
श्वसनप्रकार करण्याचे टप्पे:
- शांत उभे रहा आणि दीर्घ श्वास घ्या.
- संपूर्ण श्वास सोडून द्या. श्वास सोडताना ‘ह्म्म्म’ असा आवाज करा. असे २-३ वेळा करा. अनेक आजारांना दूर सारतील प्राणायमाचे हे ’8′ प्रकार !
जर बोलताना तुम्ही खूपच नर्व्हस होत असाल तर हाताने तोंड बंद करा (जसे खोकला आल्यावर करतो तसे) आणि जाणीवपुर्वक forceful breathing करा. तुमचा आत्मविश्वास लगेचच वाढेल. सकाळच्या वेळेस हा श्वसन प्रकार केल्याने चिंता, भीती, काळजीवर मात करण्यास खूप मदत होईल. मेरूदंड मुद्रा करा आणि स्ट्रेस फ्री व्हा !
2. Luxury breathing: या श्वसनप्रकाराने तुम्हाला शांत वाटेल आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभं राहण्याची क्षमता प्राप्त होईल. तसंच नर्व्हसनेस वर मात करून लोकांशी संवाद साधण्यात मोकळीकता येईल. या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !
श्वसनप्रकार करण्याचे टप्पे:
- सरळ उभे रहा. श्वास घेताना हात वरच्या दिशेने स्ट्रेच करा. त्यावेळी तुमची हाताची बोटे शक्य तितकी एकमेकांपासून लांब पसरवा.
- मोठं तोंड उघडा, जीभ बाहेर काढा. पण यावेळी मान हनुवटी खालच्या दिशेने राहील अशी ठेवा. टाचा वर उचलून पावलांच्या पुढच्या भागावर उभे रहा.
- सावकाश श्वास सोडा आणि पूर्वस्थितीत या. असे २-३ वेळा करा. यामुळे नवीन क्लायंट, व्यक्तीशी मोकळेपणाने व आत्मविश्वासाने बोलण्यास मदत होईल. या 3 श्वसन व्यायामांनी कमी करा वाढवा तुमचा आत्मविश्वास !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock