Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !

$
0
0

यथा अन्नम् तथा मनम्. म्हणजेच आपण जसे अन्न घेतो तसे आपले मन होते. याचा अर्थ आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावर देखील होत असतो. जसं सात्विक, संतुलित आहाराने आपले मन देखील शांत, प्रसन्न होते. काही पदार्थांमुळे आपला मूड चांगला होतो. काही पदार्थांचा परिणाम मेटॅबॉलिक प्रक्रियेवर होतो तर कधी इम्म्युनिटी संस्थेला चालना मिळते. म्हणून जेव्हा तुमचा मूड चांगला नसतो किंवा तुम्ही काहीसे थकलेले, दमलेले, निराश असता तेव्हा कसा आहार घ्यावा, यावर न्यूट्रीशियनिस्ट पायल सिंघानिया यांनी मार्गदर्शन केले. नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी

कोणते पदार्थ टाळावे?

  • आईसक्रीम आणि चॉकलेट: साखरेमुळे स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते. ब्लड शुगर, इन्सुलिन आणि रिफाईंड शुगर खाल्याने अधिक भूक लागते व चिडचिड होते.
  • कॉफी: लॅटेज आणि मॅचोज सारखे स्वीट कॉफी ड्रिंक हे शुगर सिरपने बनवलेले असतात. एस्प्रेसोमुळे झोप लागणे कठीण होते आणि झोप पूर्ण न झाल्यास अस्वस्थ वाटते, चिडचिड होते.
  • प्रोसेस्ड फूड: प्रोसेस्ड फूडमध्ये सोडियम, फॅट्स आणि कृत्रिम पदार्थांचे प्रमाण अधिक असते आणि पोषकतत्त्व कमी प्रमाणात असतात. तसंच त्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला अधिक नैराश्य येते.
  • तळलेले पदार्थ: वाईट वाटत असेल, दुःखात असाल तेव्हा तळलेले चिकन किंवा फ्रेंच फ्राईज खाणे टाळा. hydrogenated तेलात तळलेल्या या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात. ते नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात.

कोणते पदार्थ खावे?

  • ओमेगा थ्री फॅटी अॅसिड: काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की ओमेगा थ्री फॅटी अॅसिडयुक्त आहारामुळे नैराश्य, चिंता यांच्या लक्षणांशी सामना करण्यास मदत होते. अळशी, रावस, अंडी, सोयाबीन, सब्जा आणि Brussels sprouts हे पदार्थ ओमेगा थ्री फॅटी अॅसिडचे उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत.
  • Chamomile tea: दिवसभर कॉफी घेण्यापेक्षा एखादा वेगळा स्वाद चाखून पहा आणि त्यासाठी Chamomile tea घ्या. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की नैराश्य, चिंता यावर हा चहा म्हणजे अतिशय उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
  • बदाम आणि अक्रोड: यात व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम आणि बी १२ हे भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही तणाव, नैराश्यात असताना इम्म्युनिटी सिस्टीम सुरक्षित राहण्यास मदत होते. दररोज ३-४ बदाम आणि अक्रोड खाणे, ताण-तणाव कमी होण्यास उपयुक्त ठरतात.
  • भोपळ्याचा बिया: नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया हा नैसर्गिक उपाय आहे, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. कारण त्यात मुबलक प्रमाणात L-tryptophan हे अमिनो अॅसिड असते. त्यामुळे मेंदूतील serotonin ची पातळीत बदल होण्यास मदत होते. serotonin हे न्यूरोट्रान्समीटर असून त्यामुळे बदलणाऱ्या मूड मध्ये संतुलन राखले जाते. अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं

Read this in English

Translated By –DarshanaPawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

References:

[1] Clin Psychopharmacol Neurosci. 2015 Aug 31;Omega-3 Polyunsaturated Fatty Acids in Prevention of Mood and Anxiety Disorders. Su KP, Matsuoka Y, Pae CU.
[2] Srivastava JK, Shankar E, Gupta S. Chamomile: A herbal medicine of the past with bright future. Molecular medicine reports. 2010
[3]. Ros E. Health Benefits of Nut Consumption. Nutrients. 2010; doi:10.3390/nu2070652.
[4] Russo AJ. Decreased Zinc and Increased Copper in Individuals with Anxiety.Nutrition and Metabolic Insights. 2011;4:1-5.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>