आपल्याला असे वाटते की पोषकतत्त्वांच्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिरिक्त शारीरिक ताणामुळे थकवा येतो. पण शरीरात होणाऱ्या काही बदलांमुळे तुम्हाला अतिशय थकल्यासारखे वाटते. हार्मोनल बदलांमुळे खूप थकवा येतो. कोणत्या हार्मोनल बदलांमुळे खूप थकवा जाणवतो, यावर डॉ. सुब्रता दास यांनी मार्गदर्शन केले.
- Cortisol चे असंतुलन: cortisol च्या पातळीत बदल झाल्यास adrenal fatigue जाणवतो. यामुळे सेक्सची इच्छा कमी होते. मीठ व साखरयुक्त पदार्थ खावेसे वाटतात, दुपारच्या वेळेस डोकं दुखतं, गरगरल्यासारखे वाटते व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
- Leptin resistance: फॅट सेलमधून leptin नावाच्या हार्मोनची निर्मिती होते. त्यामुळे शरीरातील फॅट ऊर्जा मिळण्याकरता साठवण्याचा संकेत मेंदूला मिळतो. जेव्हा शरीराला leptin ची ओळख पटत नाही, तेव्हा भूक लागल्यासारखे वाटते आणि त्यामुळे अतिरिक्त फॅट्स साठवले जाते. Leptin resistance मुळे तुम्हाला आळसावल्यासारखे वाटते, सतत भूक लागते, वजन वाढते व ताण येतो. वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना
- Insulin resistance: leptin resistance प्रमाणे insulin resistance हे देखील हार्मोनल hormonal resistance आहे. साधारणपणे टाईप 2 डाएबिटीस असलेल्यांना आणि प्री डायबेटिक पेशन्ट मध्ये आढळून येते. शरीर जेव्हा इन्सुलिनचा वापर करत नाही तेव्हा खूप आळसावल्यासारखे वाटते आणि वजन कमी होते. गोड पदार्थ खाण्याचा मोह होतो व जेवल्यानंतर थकल्यासारखे वाटते. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
- थायरॉईडचे असंतुलन: अधिक उत्तम कार्य करण्यासाठी शरीरातील प्रत्येक सेलला थायरॉईडची आवश्यकता असते. थायरॉईडचे असंतुलन झाल्यास खूप थकवा जाणवतो, वजन वाढते, नैराश्य येते, त्वचा कोरडी होते व केस पातळ होतात. स्त्रियांमध्ये वाढणार्या केसगळतीमागे दडली आहेत ही ’10′ कारणं !
- Estrogen चे असंतुलन: यामुळे खूप थकवा येवून नैराश्य येते, योनीमार्गात कोरडेपणा जाणवतो, सेक्स करताना त्रास होतो, रात्री घाम येतो.
- Progesterone चे असंतुलन: शरीरात progesterone कमी प्रमाणात स्त्रवल्यामुळे एस्ट्रोजनचे प्रमाण वाढते व त्यामुळे थकवा येतो. तसंच निद्रानाश, चिंता, इन्फेर्टिलिटी, वजन वाढणे या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर ब्रेस्टमध्ये दुखते.
- Testosterone चे असंतुलन: testosterone च्या कमतरतेमुळे स्त्री-पुरुष दोघांना देखील थकवा जाणवतो, आळस येतो. तसंच त्यामुळे अॅक्ने येतात, हातावर व चेहऱ्यावर खूप केस येतात, PCOS, hypoglycaemia आणि केस पातळ होणे या समस्या उद्धवतात. नैसर्गिक उपचार पद्धतीने मिळवा अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती
स्त्रियांमध्ये testosterone च्या कमतरतेमुळे वजन वाढते व सेक्सची इच्छा कमी होते. या ५ कारणांमुळे PCOSच्या समस्येचा सेक्स लाईफवर होतो परिणाम
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock