Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

World Oral Health Day 2017: तोंडाचे आरोग्य जपा या ‘५’खास टीप्सने !

$
0
0

दात आणि तोंड यांचे आरोग्य जपणे गरजेचे असल्यासचे आपण सगळेच जाणतो. पण त्यासाठी योग्य ती काळजी कशी घ्यायची याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून वर्ल्ड ओरल हेल्थ डे च्या निमित्ताने आम्ही काही डेंटिस्टशी बोललो. तोंडाचे आरोग्य जपणे किती महत्त्वाचे आहे आणि ते कसे जपावे यासाठी त्यांनी काही टीप्स दिल्या. जाणून घेऊया पाच डेंटिस्टने सांगितलेल्या खास टीप्स. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !

1. डॉ. दर्शन वोरा, वोराज डेंटल केयर, मुलुंड.

तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी दररोज दात स्वच्छ घासणे, फ्लॉस करणे गरजेचे आहे. दाताच्या फटीत अडकलेले जे अन्नकण ब्रश केल्याने निघत नाहीत, त्यासाठी फ्लॉस करणे आवश्यक आहे. तोंडाच्या आरोग्याकडे गंभीरपणे बघण्याची ही वेळ आहे आणि त्याचबरोबर मुलांनाही तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. लहान मुलांचे दात लवकर किडू नये म्हणून dental sealants वापरणे उत्तम ठरते. तसंच त्यामुळे दातांवर प्लाग तयार होण्यास आळा बसतो. दातदुखीची 10 कारणं !!

2. डॉ. दीपाली मेहता, पंकज मेहता डेंटल केयर, नवी मुंबई.

ब्रश आणि फ्लॉस करण्याबरोबरच जीभ स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना हे महत्त्वाचे वाटत नाही. पण जिभेवर अनेक ओरल बॅक्टरीयाची उत्पत्ती होत असते. म्हणून फक्त ब्रश करणे पुरेसे नाही. तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी नियमित डेंटल चेकअप करणे महत्त्वाचे आहे. दातांच्या आरोग्याबाबत या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

3. डॉ. राजेंद्र संकपाळ

दात आणि हिरड्यांमधील भागाला बोटांनी  मसाज करा. मसाज करताना बोटं गोलाकार फिरवा. त्यामुळे तोंडातील अन्नकण बाहेर पडण्यास मदत होईल व त्याचबरोबर रक्तप्रवाह सुधारून दात व हिरड्यांची क्षमता वाढेल. या ‘५’ नैसर्गिक तेलांनी दात होतील मजबूत !

4. डॉ. निकीता गोयल

दिवसातून दोनदा दात घासणे गरजेचे आहे. काही खाल्या किंवा प्यायल्यानंतर दातांवर प्लागचा पातळ थर तयार व्हायला सुरवात होते. आपल्या लाळेत असलेल्या neutralise या प्लाग अॅसिड मुळे dental enamel खराब होऊन दात किडू लागतात.  तोंडात तयार होणारी लाळ या अॅसिडशी सामना करते. परंतु, रात्रीच्या वेळी आपले तोंड खूप वेळ बंद असते त्यामुळे तोंडात लाळ कमी प्रमाणात किंवा तयारच होत नाही. म्हणून प्लाग घालवण्यासाठी झोपण्यापूर्वी ब्रश करणे गरजेचे आहे. या ’7′ समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश कराच !

5. डॉ. नेहा तिवारी

तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी चांगल्या माऊथवॉशने गुळण्या करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक माऊथवॉश मध्ये फ्लोराईड असतं व ते dental caries कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे काही खाल्यानंतर किंवा दिवसातून दोनदा चांगल्या माऊथवॉशने अवश्य गुळण्या करा. घशातील खवखव ते तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा गुळण्या !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>