Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Alkaline Diet कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतो का ?

$
0
0

आजकाल डाएट फॅड अधिक लोकप्रिय होत अाहे.अनेकजण झटपट वजन कमी करण्यासाठी अथवा उत्तम आरोग्य राखण्यासाठी निरनिराळे डाएट करत असतात.त्यापैकीच एक डाएट फॅड म्हणजे अल्काइन डाएट अथवा अल्कधर्मी आहार.एका अहवालात असे आढळले आहे की अल्कधर्मी आहाराने कर्करोगाला प्रतिबंध करता येतो अथवा तो पुढे टाळता येतो.तसेच काही संशोधनानूसार आहारातील चुकीच्या सवयींमुळे कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते आहे असे देखील आढळले आहे.ज्या अन्नामध्ये नैसर्गिक अॅसिड घटक असतात जसे की काही पदार्थांमध्ये अॅनिमल प्रोटीन व मीठाचे प्रमाण अधिक असते अशा पदार्थांमुळे विविध प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.यासाठी  कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी या ’7′ सवयी अंमलात आणाच !

या पदार्थांचा प्रभाव कमी करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे आहारात ताजी फळे व ताज्या भाज्यांचे प्रमाण वाढवणे हा होय.फळे,भाज्या,तृणधान्ये,डाळी यांची अल्कधर्मी आहारामध्ये गणना होते.ज्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या जिवाणूंचे पोषण होते.अल्कधर्मी आहारा मुळे शरीरामधील दाह कमी होतो व कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यास देखील मदत होते.खरेतर अल्कधर्मी पदार्थांमुळे कर्करोगग्रस्त रुग्णाला केमोथेरपी उपचार घेण्यास चांगली मदत होते.काही संशोधनानूसार विशेषत: केमोथेरपीमध्ये अल्कधर्मी आहारामुळे शरीरातील पीच लेवल वाढल्याने कर्करोगाच्या पेशी मृत होतात असे आढळले आहे.यासाठी केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार !हे देखील जरुर वाचा.

अल्कधर्मी आहाराची कर्करोगाला प्रतिबंध करण्यास मदत होते का?

खरेतर नाही.अजून पर्यंत कोणत्याही संशोधनात असे सांगण्यात आले नाही की अल्कधर्मी आहाराची कर्करोगाला प्रतिबंध करण्यास मदत होते.

मुंबईच्या लीलावती,ब्रीच कॅन्डी आणि सैफी हॉस्पिटलचे Uro-Oncological आणि  Robotic सर्जन डॉ.अनूप रामाणी यांच्या मते सर्व प्रकारचे अन्न खाल्याने शरीरावर योग्य नियंत्रण राहण्यास मदत होते.यासाठी प्रथम आहार सतुंलित राखण्याचा प्रयत्न करा.योग्य प्रमाणात घेतलेल्या कार्बोहायड्रेट,प्रोटीन,फॅट आणि सुक्ष्म व अतिसुक्ष्म पोषणमुल्यांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते व शरीरातील अवयवांचा दाह कमी होतो.कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी कोणतेही फॅड डाएट करण्याची काहीच गरज नाही.कारण सर्वच योग्य व पोषक अन्नपदार्थ तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक औषधासारखे कार्य करत असतात.यासाठी शरीराचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी सर्व प्रकाराचा पोषक व सतुंलित आहार घ्या.यासाठी बिनधास्त करा डाएट,अस्सल भारतीय पदार्थांनी …

संदर्भ-

[1] Robey, I. F. (2012). Examining the relationship between diet-induced acidosis and cancer. Nutrition & metabolism, 9(1), 1.

[2] Schwalfenberg, G. K. (2011). The alkaline diet: is there evidence that an alkaline pH diet benefits health?. Journal of Environmental and Public Health, 2012.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>