Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

$
0
0

डिप्रेशन ही भावना फक्त निराश,उदास असणे अथवा एकाकी वाटणे यापेक्षा जरा निराळी असू शकते.नैराश्य हा एक असा आजार आहे ज्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये रासायनिक बदल घडत असतात.डिप्रेशन येण्याची कारणे निरनिराळी असू शकतात. एकाकीपणाची भावना मागे टाकण्यासाठी आपल्यासारख्या विकसनशील देशात देखील याचा प्रभाव अधिक आढळून येत आहे. मुंबईतील Family Psychiatrist आणि Psychotherapist Syeda Ruksheda यांच्या मते एखादी व्यक्ती नैराश्याच्या अधीन जाण्याची व जगापासून वेगळी राहण्यामागची काही विशिष्ट लक्षणे असतात.जनरेशन मधील बदलानूसार या आजाराच्या प्रगटीकरणामध्ये देखील आजकाल काही बदल झालेले आढळतात.मात्र असे असले तरी या आजाराची तीव्रता मात्र आजही तशीच आहे.यासाठी जरुर वाचा कशा नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी

आजकाल डिप्रेशनची आढळणारी काही लक्षणे-

१.सोशल मिडीयाच्या आहारी जाणे-

आजकाल सोशल मिडीया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.मैत्री करणे,नेटवर्क वाढवणे,आपले विचार व मत मांडण्यासोबत मनात दडलेल्या भावनांचा निचरा करण्याचे देखील ते एक माध्यम बनत चालले आहे.मात्र सोशल मिडीयाच्या आहारी जाणे धोक्याचे असू शकते.कारण नैराश्यामध्ये असलेल्या लोकांसाठी सोशल मिडीयाचे व्यसन काहीसे निराळे असू शकते.रुक्षेदा यांच्यामते नैराश्यग्रस्त माणसे आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये मिसळणे टाळतात पण तासनतास फेसबूक अथवा इतर सोशल साईटवर वेळ घालवतात.सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे अशी माणसे सोशल मिडीयावर संवाद करीत नाहीत किंवा एखाद्या पोस्टसाठी लाईक,कमेंट अथवा शेअर देखील करीत नाहीत.मात्र असे असूनही सोशल मिडीयापासून थोडावेळ देखील लांब राहणे त्यांना फार कठीण जाते.व्हॉट्सअ‍ॅपवरील या ’10′ चूका नात्यास ठरतात मारक !

२.अति झोपणे-

ताण-तणावामुळे झोप येणे व डिप्रेशन मुळे सतत झोप येणे यामध्ये थोडा फरक आहे.सतत पुढे जाण्याच्या धावपळीमध्ये आपल्याला पुरेशी झोप घेता येत नाही. आठ तासांची झोप ही पुरेशी झोप असू शकते.तसेच कधीकधी फारच थकवा आल्यास अगदी दहा तास झोपणे देखील अयोग्य नाही.पण सतत झोपून राहण्याची जर तुम्हाला सवयच लागली असेल तर मात्र ती नक्कीच धोकादायक असू शकते.रुक्षेदा यांच्यामते जर एखाद्याला पुरेशी झोप घेऊन देखील सतत झोप येत असेल तर ते डिप्रेशन चे एक लक्षण असू शकते.दिवसा सारख्या येणाऱ्या झोपेवर काही सोपे उपाय!

३.शारीरिक थकवा-

व्यायाम हा नैराश्य दूर ठेवण्याचा एक उत्तम उपाय आहे असे यासाठीच सांगितले जात असावे.कारण नैराश्यग्रस्त लोकांना साधे चालणे किंवा फिरणे देखील कठीण जाते.वाढत्या निष्क्रीयतेमुळे त्यांच्या परिस्थितीत अधिकच भर पडत जाते.रुक्षेदा यांच्या मते नैराश्यग्रस्त माणसे नेहमी पाय जड झाल्यामुळे त्यांच्या कामाचा वेग मंदावत आहे किंवा त्यांना थकवा जाणवत असल्याची तक्रार करतात.त्यामुळे जर कोणतीही शारीरिक समस्या नसताना देखील एखाद्याला शारीरिक हालचाली,व्यायाम करणे अथवा चालणे कठीण जात असेल तर त्याला मदतीची नक्कीच गरज असू शकते.यासाठी वाचा अनेक आजारांना दूर सारतील प्राणायमाचे हे ’8′ प्रकार !

४.नकाराबाबत अतिसंवेदनशील असणे-

नैराश्यग्रस्त लोकांच्या मनात खोलवर नकाराबाबत भिती दडलेली असते.रुक्षेदा यांच्यामते ही नकाराची भिती निरनिराळ्या गोष्टींमधून बाहेर येते.

उदा.एखादी ड्रिपेशनच्या आहारी गेलेली व्यक्ती तिच्या/त्याच्या फोटोला खूप जास्त लाईक अथवा कमेंट्स न मिळाल्यामुळे निराश होऊ शकते तसेच ती व्यक्ती लगेच दुस-या एखाद्या जास्त सोशल रीच असलेल्या व्यक्तीसोबत स्वत:ची तुलना करुन उदास देखील होऊ शकते.अशी माणसे त्यांची रोमेन्टीक रिलेशनशीप देखील या नकाराच्या भितीमुळे संपवून टाकू शकतात.मनात नकाराच्या या खोलवर रुतलेल्या भितीमुळे ते सतत नाकारले जाऊ शकतात. रुक्षेदा यांच्यामते अशा नैराश्यग्रस्त व्यक्तीला त्याचे लॉग लास्टींग रिलेशनशीप टिकविणे फार कठीणे जाते.यासाठी वाचा अपयशी प्रेमही शिकवते या ’8′ गोष्टी !

५.चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाणे-

कधीकधी मित्रांसोबत बाहेर जाणे, लोकांमध्ये मिसळणे,मद्य घेणे व मौजमजा करणे ठीक आहे पण दर विक एन्डला बाहेर जाण्यासाठी त्या दिवसाची आतूरतेने वाट पाहणे हे निराळे असू शकते.कारण तुमचे डिप्रेशन तुम्हाला या गोष्टींच्या आहारी जाण्यास प्रवृत्त करीत असते.रुक्षेदा यांच्या मते बाहेर जाणे व मौजमजा करणे चुकीचे नाही पण सतत या गोष्टींसाठी आतूर असल्यास तुम्हाला सावध राहण्याची गरज असू शकते.मनाला बरे वाटावे या कारणासाठी अशी माणसे लोकांमध्ये मिसळणे व मौजमजा करण्याची संधी शोधत असतात.अशा लोकांमध्ये हे लक्षण दररोज आढळून येत नाही मात्र आठवड्यातून एकदा त्यांना मद्य घेण्याची तीव्र इच्छा होत असते.यासाठी जरुर वाचा दारूची नशा उतरवणारे घरगुती उपाय !

६.निरानिराळ्या गोष्टी करण्यास असमर्थ असणे-

जर एखाद्यी व्यक्ती मल्टीटास्क नसेल अथवा तिचे तिच्या कामावर नियंत्रण नसेल तर हे डिप्रेशनचे एक लक्षण असू शकते.डिप्रेशनमुळे एखाद्याच्या कामावरील एकाग्रता,फोकस व कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.रुक्षेदा यांच्या मते जर जर एखाद्या व्यक्तीला पूर्वी जसे काम करता येत होते तसे आता करताना ताण येत असेल तसेच नैराश्याची इतर काही लक्षणे देखील त्यामध्ये आढळत असतील तर त्या व्यक्तीला चांगल्या तज्ञांकडून मदत घेण्याची आवश्यक्ता असू शकते.हे देखील जरुर वाचा अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं

७.थकवा व ताप येणे-

डिप्रेशनची कारणे नेहमीच अस्पष्ट असतात असे नाही.कधीकधी व्यक्तीच्या शारीरिक लक्षणांमधून देखील नैराश्याचे प्रगटीकरण होत असते.काहीही कारण नसताना जर एखाद्याला थकवा व ताप येत असेल तर ते डिप्रेशनचे एक लक्षण असू शकते.रुक्षेदा यांच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीही आरोग्य समस्या नसताना ताप येतो किंवा अचानक रक्तदाब कमी होतो तेव्हा ते काळजीचे कारण असू शकते.एखादी गोळी अथवा थोडीशी विश्रांती घेऊन या समस्येला दूर करता येते.पण असे लक्षण सतत आढळल्यास त्याकडे पुरेसे लक्ष देण्याची नक्कीच गरज असू शकते.लक्षात ठेवा डिप्रेशन अनेक सुक्ष्म माध्यमातून प्रगट होत असते व त्याच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते.

८.स्वत:शीच संवाद करणे-

द अमेरिकन सायकेट्रीक असोसिएशने अशी अधिकृत पुष्टी केली आहे की स्वत:शीच बोलणे हा एक मानसिक आजार आहे.रुक्षेदा यांच्या मते जे लोक सेल्फी काढून सोशल मिडीयावर शेअर करतात तेव्हा त्यांना दुस-यांनी त्यांचे कौतूक करावे ही इच्छा असते कारण ते स्वत:साठी तसे करु शकत नसतात.तर काही माणसे अशीही असतात जी सेल्फी काढतात व सतत तो बघत राहतात.जर लोकांना ते त्यांचा फोटो दाखवू शकत नसतील तर ते तो स्वत:च सतत बघत राहतात.या दोन्हीही स्थिती फारच भयकंर असू शकतात.

सूचना-

जर तुमच्यामध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळली तर त्रास करुन घेऊ नका.यातील एखाद्या लक्षणामुळे तुम्ही लगेच नैराश्याच्या आहारी गेला आहात असा त्याचा अर्थ होत नाही.कारण डिप्रेशनची लक्षणे निरनिराळी असू शकतात.त्यामुळे ती तज्ञ व्यक्तीकडून तपासून मगच त्याबाबत खात्री दिली जाऊ शकते.मात्र जर तुम्हाला खरेच याबाबत मदतीची गरज आहे असे वाटत असेल तर चांगल्या तज्ञांची मदत घेण्यास संकोच बाळगू नका. स्वास्थ्य सुधारायला binaural beats ऐकणं अशाप्रकारे करते मदत !हे देखील जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>