Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या लक्षणांनी ओळखा तुमचा मेटॅबॉलिझम रेट कमी आहे

$
0
0

जर तुमचे सतत वजन वाढत असेल व खूप प्रयत्न करुन देखील ते कमी होत नसेल तर त्याचे एक कारण तुमच्या शरीराचा मेटाबॉलीझम रेट कमी असणे हे देखील असू शकते.मेटाबॉलीझम कमी असेल तर डाएट व अति व्यायाम करुन देखील फारसा फायदा होत नाही. मग तुमच्या शरीराचे मेटॅबॉलिझम कमी आहे हे नेमके कसे ओळखावे याकरिता भारतातील गोल्ड जीमचे मार्केटींग व्हीपी व फीटनेस एक्सपर्ट Althea Shah  यांनी सुचवलेल्या या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या. तसेच तुमच्या शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी हे प्रयत्न नक्की करून पहा. 

तुम्हाला भूक लागत नसेल-

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर भूकच लागत नसेल व तुम्ही काहीही न खाता दुपारचे जेवण करत असाल तर याचा अर्थ तुमचे मेटाबॉलीझम कमी आहे.लक्षात ठेवा तुम्ही झोपेतून उठल्यानंतर कमीतकमी चार तासांच्यावर उपाशी राहू शकत नाही.यासाठी तुम्ही सकाळी व्यवस्थित नास्ता करणे  आवश्यक आहे.जेवण टाळणे, तुम्हाला बनवू शकते लठ्ठ !

शरीरात सतत ठणके व वेदना जाणवत असतील-

जर तुम्हाला सतत स्नायूंमध्ये वेदना व ठणके जाणवत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य मंदावलेले आहे.कारण त्यामुळेच तुम्हाला या वेदना जाणवत असतात.तुमच्या थायरॉईड ग्रंथीच्या बिघडलेल्या कार्याचा तुमच्या मेटाबॉलीझमवर देखील परिणाम होत असतो.त्यामुळे या अंगदुखीच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तुमच्या शरीराचे  मेटाबॉलीझम सुधारण्याकडे पुरेसे लक्ष द्या.थायरॉईडच्या समस्येवर व्यायामाने फायदा होईल का …

पोट वाढू लागले आहे-

तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा तुमच्या शरीराचे  मेटाबॉलीझम कमीअसते तेव्हा काहीही न खाताही देखील तुमचे पोट,नितंब व मांड्याकडील भागाची जाडी अचानक वाढते. यावर तुम्ही खुप प्रयत्न करुनही तुमचे वजन कमी होत नाही.त्याचप्रमाणे जर तुमच्या शरीराचे  मेटाबॉलीझम कमी असेल तर तुमचे वजन अचानक वाढू लागते मात्र वजन कमी करणे कठीण होते.

तुमच्यातील उत्साह कमी होतो-

जेव्हा तुमच्या शरीराचे  मेटाबॉलीझम कमी होते तेव्हा तुम्ही निरुत्साही दिसू लागता.त्यामुळे  तुम्हाला सेक्सची ईच्छा कमी होते व सतत आळस येतो.तुमच्या शरीरात अशी ऊर्जा कमी असण्याचे एक कारण व्हिटॅमिन बी चा अभाव असू शकतो.त्यात वजन कमी करण्यासाठी कमी खाल्यामुळे अधिकच भर पडते व मेटाबॉलीझम रेट अधिकच खालावतो.यासाठी दिवसभरात कमीतकमी सहा वेळा थोडे थोडे खाण्याची सवय ठेवा. ज्यामुळे तुमचे मेटाबॉलीझम सुधारेल व वजन देखील नियंत्रणात येईल. वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना 

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles