पोहे हा नाश्त्याला झटपट तयार होणारा आणि बहुतेकांना आवडणारा एक पदार्थ आहे. पण रोज रोज साधे पोहे किंवा बटाटे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यामध्ये थोडे हटके आणि हेल्दी ट्विस्टदेखील आजमावून पहा. झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार म्हणजे दही पोहे.
इतर पोहे थोडे कोरडे असतात. मात्र दह्याचा आणि तडक्याचा समावेश केल्यानंतर हे पोहे थोडे अजून मऊ आणि ओलसर होतात. त्यामुळे हे दही पोहे संध्या काळच्या वेळेसही अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. पोहे- नाश्त्याचा अत्यंत हेल्दी पर्याय का आहे ? हेदेखील नक्की जाणून घ्या
साहित्य :
- 1 ½ कप पोहे
- 1 कप घरगुती दही
- 1 टेबलस्पून तेल
- 7-8 कढीपत्त्याची पानं
- 1टीस्पून हळद
- 1 चिरलेली हिरवी मिरची
- 1टेबलसपून उडीदडाळ
- ½ टीस्पून मोहरी
- ½ टीस्पून जिरं
- इंचभर खिसलेले आलं
- 8-10 शेंगदाणे
- चिमुटभर हिंग
- चिरलेली कोथिंबीर
- मीठ
कृती -
- पोहे आसडून आणि साफ करून स्वच्छ धुवावेत. जास्त वेळ पाण्यात भुजवून ते मऊ करू नका. 1-2 वेळेस धुतलेले पोहे चाळणीत काही वेळा ठेवा. म्हणजे अतिरिक्त पाणी निथळून जाईल.
- त्यामध्ये दही आणि मीठ मिसळा. हे मिश्रण एका बाऊलमध्ये ठेवा.
- तडक्याच्या बाऊलमध्ये तेल गरम करून आधी त्यामध्ये मोहरी आणि नंतर जिरं टाका. हे तडतडल्यानंतर त्यामध्ये उडीद डाळ, शेंगदाणे, हिंग टाका.
- त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आलं टाकून सारे मिश्रण हलकेच हलवून घ्या.
- दही आणि पोह्यांच्या मिश्रणावर हा तडका टाकून मिश्रण नीट एकत्र करा. पोहे फारच कोरडे वाटत असतील तर त्यामध्ये दही मिसळा.
- त्यावर कोथिंबीर टाकून मिश्रण नीट एकजीव करा.
अशाप्रकारे बनवलेले पोहे गरम गरम खाणे गरजेचे नाही. हे बनवून ठेवल्यानंतर काही वेळानेदेखील खाता येऊ शकतात त्यामुळे ऑफिसमध्ये जाणार्यांसाठी संध्याकाळी नाश्त्याला डब्बा म्हणून दडपे पोहे हा उत्तम पर्याय आहे.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock