लहान मुलांना सांभाळणे, त्यांच्या भावना समजून घेणे काहीसे कठीण असते. बऱ्याचदा त्यांच्या आपल्याला भावना समजतात पण त्या कशा हाताळाव्या किंवा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे आपल्याला समजत नाही.काही वेळेस आपण त्यांना ‘तू आता मोठा झालास’ असे दटावतो तर काही वेळेस ‘अजून तू लहान आहेस’ असे सांगतो. यामुळे मुलं गोंधळतात, रागावतात. लहान मुलांना अगदी कोणत्याही गोष्टीवरून राग येऊ शकतो आणि त्यांचा राग कसा हाताळावा, हे आपल्याला समजत नाही. राग आल्यावर मुलं भिंतीवर डोकं आपटतात. नजरेला नजर देत नाहीत किंवा काही वेळेस पालकांना मारू लागतात. असे प्रसंग चारचौघात झाल्यावर मात्र आपल्याला लाजिरवाणे वाटते. हे असे प्रसंग कसे हाताळावे आणि चारचौघातला गोंधळ टाळण्यासाठी या एक्स्पर्ट टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !
1. एक पाऊल मागे जा व अंक मोजा: मुलांना असे वाटते की आपण दिवसभर खेळावे, टी. व्ही. पाहावा पण पालकांनी यावर काहीही न बोलता उलट आपले लाडच पुरवावे. आपल्याप्रमाणेच लहान मुलं देखील त्यांच्या आवडत्या टी. व्ही. प्रोग्रॅममध्ये रंगून जातात. कार्टून कॅरेक्टर्स तर त्यांच्यासाठी आदर्श असतात. त्यांचे मुलं अगदी सहज अनुकरण करतात. परंतु, अशीही काही कार्टून्स आहेत ज्यामध्ये रागावर कसे नियंत्रित मिळवावे हे दाखवले जाते. ती कार्टून्स मुलांना दाखवा. उदा. Danielle Tiger, ज्यामध्ये तो राग आल्यावर एक पाऊल मागे जातो व अंक मोजतो. या अगदी लहान सहान गोष्टींचे मुलं अनुकरण करतात कारण कार्टून कॅरेक्टर्सला ते फार गंभीरपणे बघतात. या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा
2. शांत रहा: मुलं रागवतात, चिडतात तेव्हा शांत राहणे कठीण आणि लाजिरवाणे असते. पण अशावेळी लोकांचा विचार करू नका. लोकांच्या प्रश्नार्थक, नकारात्मक नजरांकडे चक्क दुर्लक्ष करा. यासाठी पॅरेंटिंगची काही पुस्तके वाचा. त्यात anger management चा भाग अवश्य वाचा. ते ज्ञान तुम्हाला मुलांना हाताळताना नक्कीच उपयोगी पडेल. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा
3. रागाने परिस्थिती अधिक वाईट होईल: मुलांना शांत हो, ओरडू नको, हे सांगताना तुम्हीच जर ओरडून बोललात तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. अशा वेळी लहान मुलांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. मुलं जर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल तर तुम्ही न रागवता मुलाला समजवण्याचा प्रयत्न करा. त्याचा राग शांत झाल्यावर मुलाला त्याची चूक समजवून सांगा आणि रागावणे हे कोणत्याही गोष्टींवरचा उपाय नाही, हे पटवून द्या. मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock