Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लाल भोपळ्याची खीर –लो कॅलरी पण अत्यंत चविष्ट गोडाचा पदार्थ !

$
0
0

तोंडावर ताबा ठेवून वजन घटवण्याचं आणि ते आटोक्यात ठेवण्याचं मिशन यशस्वीरित्या पूर्ण करणे हे एक आव्हानच आहे. त्यातही गोड खाल्ल्याशिवाय तुमचा दिवसच जात नसेल तर हे आव्हान अधिकच वाढते. पण आहारतज्ञ प्रेमा कोडिकल यांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या गोड खाण्याच्या सवयीला थोडा हेल्दी ट्विस्ट दिला तर ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते. सतत गोड खाण्याच्या इच्छेवर मात करा या ’7′ उपायांच्या संगे !

लाल भोपळा प्रामुख्याने भाजीमध्ये किंवा घारगे बनवून खाल्ले जातात. पण त्याची खीर देखील अतिशय चविष्ट होते. याकरिता लाल आणि गोड भोपळा आणि सायी शिवाय दूध वापरा. लाल भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. 100 ग्रॅम भोपळ्यातून केवळ 26 कॅलरीज मिळतात. तसेच भोपळ्यात व्हिटॅमिन ए, ई,सी मुबलक आढळतात. सोबतच फायबर आणि आयर्न ही मुबलक असल्याने दिवसभर पुरेल इतकी उर्जा मिळते. या सोबतच लाल भोपळ्याचे ’9′ आरोग्यदायी फायदे देखील नक्की जाणून घ्या. खीर दूधापासून बनवली जात असल्याने त्यात प्रोटीन घटक असतात. सुकामेव्यातून आणि प्रामुख्याने बदामातून ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळते. यामुळे त्वचा आणि केस मॉईश्चराईज्ड राहतात. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर आहारात भोपळ्याच्या खीरीचा समावेश करणे उत्तमच !   वजन घटवण्यासोबतच लाल भोपळा दूर करेल या ’5′ सौंदर्याच्या समस्या !

 

साहित्य -:

  • पिकलेल्या लाल भोपळ्याचा कीस  – 1 वाटी
  • Skim milk – 2 कप
  • साखर  – 1/4 कप
  • वेलचीपूड  – ¼ टीस्पून
  • बदामपूड  – 1/4 कप
  • साजूक तूप  – 1 टीस्पून

कशी बनवाल भोपळ्याची खीर ?

  • मंद आचेवर कढई गरम करून त्यामध्ये तूप टाका.
  • तूपावर भोपळ्याचा कीस हलकाच परता. काही मिनिटांतच भोपळ्याचा कीस मऊ होईल.
  • यामध्ये दूध मिसळून सुमारे 15-20 मिनिटे मिश्रण उकळू द्यावे.
  • हळूहळू दूध आटायला सुरवात होईल.
  • त्यानंतर यामध्ये साखर, वेलचीपूड, बदामपूड मिसळा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर गॅस बंद करा.
  • खीर थंड झाल्यानंतर ती अधिक चविष्ट लागेल.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>