बदललेली जीवनशैली म्हणजे खाण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूड, रात्रीची जागरणे, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे पिंपल्स येऊ शकतात. मात्र पिंपल्स आल्यावर आपला हात नकळत तिकडे जातो आणि मग ते फोडण्याचा मोह होतो. खूप प्रयत्न करूनही हा मोह आवरता येत नाही. पिंपल्स फोडल्यावर त्या जागी जळजळ जाणवते, काही वेळेस सूज येते आणि त्याचे डाग देखील त्वचेवर राहतात. मग अशा वेळी काय करावे? यावर Marvie Ann Beck Academy च्या ब्युटी एक्स्पर्ट नंदीनी अग्रवाल यांनी काही टीप्स दिल्या. ‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !
पायरी १: पिंपल्स फोडल्यानंतर त्या भागाचा लालसरपणा आणि सूज कमी करण्यासाठी त्यावर बर्फ लावा. त्यामुळे त्या भागाचा रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे सूज आणि जळजळ कमी होते. बर्फ २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लावू नका. चेहर्यावर पिंपल येण्याच्या जागेवरून ओळखा त्यामागील कारण
पायरी २: त्यानंतर थोडेसे benzoyl peroxide लावा. पिंपल्स फोडल्याने पिंपल्समधील स्त्राव त्वचेत खोलवर जातो. Benzoyl peroxide लावल्यामुळे त्या भागातील बॅक्टरीया कमी होण्यास मदत होईल. तसंच जळजळ कमी होवून डाग येण्याची शक्यता कमी होईल. शहाळ्याच्या पाण्याने कमी करा पिंपल्सचे डाग !
त्वचेवर डाग पडू नयेत म्हणून काही खास टीप्स:
- हात स्वच्छ धुवा: पिंपल्स फोडल्यानंतर हात स्वच्छ धुवा. हात न धुता ते चेहऱ्याच्या इतर भागात लावल्यास इन्फेकशन पसरू शकते. व त्यामुळे ब्रेकआऊटस होऊ शकतात. म्हणून पिंपल्स फोडल्यानंतर हात धुवायला विसरू नका. झटपट टीप्स – कसा कराल घरच्या घरी चेहरा स्वच्छ ?
- खाजवू नका: पिंपल फोडल्यानंतर त्या जागी खाज आल्यासारखी वाटेल आणि सारखं खाजवण्याचा मोह होईल. पिंपल्स फोडताना ते अधिकाधिक दाबू नका त्यामुळे सूज येईल. जळजळ होईल व त्वचेवर डाग येईल. त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!
- बरं होताना आलेली त्वचा काढू नका: पिंपल्स फोडल्यानंतर त्यावर येणारी त्वचा काढू नका. ती त्वचा येणे म्हणजे तो त्रास बरं होण्याचे लक्षण आहे. त्यामुळे त्रास लवकर बरा होऊन त्यावर नवीन त्वचा येत असते. ती त्वचा काढल्यास त्वचेवर डाग पडेल व तो लवकर जाणार नाही. घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock