दूध आणि अंडी हे गाऊट पेशन्टसाठी चांगले नसल्याचे समजले जाते. परंतु, हे खरे नाही. गाऊट पेशन्टला प्रोटीन्स न घेण्याचा सल्ला दिला जातो. तसंच अंडी आणि दूध पूर्णपणे टाळण्यास सांगितले जाते. गाऊट पेशन्टला खाण्यावर फार बंधने असतात. बरेच पदार्थ म्हणजे पालक, मसूर हे वर्ज असतात. या सगळ्या मर्यादेमुळे जेवणाचे योग्य समाधान त्यांना मिळत नाही. तसेच प्रोटीनचे स्रोत असलेले दूध आणि अंडी पूर्णपणे टाळावी लागतात.
परंतु, पदार्थातील प्रोटीनमुळे नाही तर प्युरीन मुळे गाऊटचा त्रास अधिक बळावतो. यावर चेंबूरच्या गीता शेनॉय न्यूट्रिशन अँड वेलनेस क्लिनिक च्या डायटिशन गीता शेनॉय यांनी मार्गदर्शन केले.
अंडी: सगळेच प्रोटीन एकसारखे नसतात. सगळल्याच प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये भरपूर प्युरीन असतात, हा गैरसमज आहे. भाज्या आणि सिरियल्स (cereal) यामध्ये असलेले प्रोटीन्स गाऊट पेशन्ट साठी हानीकारक नसतात, असे डायटिशन शेनॉय यांनी सांगितले. अंड्यात खूप कमी प्रमाणात प्युरीन असल्याने ते गाऊट पेशन्टसाठी चांगले असते. अंड हा ओमेगा थ्री फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत आहे. तसंच त्यात कोलीन (choline), बायोटिन (biotin) आणि फॉलिक अॅसिड (folic acid) यांसारखे व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात. दररोज एक अंड खा आणि आरोग्याच्या समस्या दूर ठेवा !
दूध: काही अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की, दूध रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे गाऊटची तीव्रता कमी होते. हाडांची घनता (bone density) राखण्यासाठी लागणारे पुरेसे कॅल्शियम दुधातून मिळते आणि युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित होते. गरम की थंड दूध पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ?
चिकन, बीफ यांसारखे प्रोटीनचा स्रोत असलेले मांसाहारी पदार्थ गाऊट पेशंटला पूर्णपणे टाळावे लागतात. म्हणून ते नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात दूध व अंड्याचा समावेश करू शकता. गाऊट पेशन्टसाठी खास डाएट प्लॅन
दिवसभरात अंडी व दूध घेण्याचे प्रमाण काय असावे?
तुम्ही दिवसाला ४०० मिली दूध घेऊ शकता, असे डायटिशन शेनॉय यांनी सांगितले. तसेच दिवसातून एक अंड खाणे योग्य ठरेल. गाऊट पेशन्टने पूर्ण अंड खाण्याऐवजी अंड्याचा पांढरा भाग खावा. आहाराची अनेक पथ्ये पाळताना प्रोटीनची गरज भागवण्यासाठी आहारात दूध व अंड्याचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
References:
[1]Loenen, H. M., Eshuis, H., Löwik, M. R., Schouten, E. G., Hulshof, K. F., Odink, J., & Kok, F. J. (1990). Serum uric acid correlates in elderly men and women with special reference to body composition and dietary intake (Dutch Nutrition Surveillance System). Journal of clinical epidemiology, 43(12), 1297-1303.