आजकाल केवळ उच्च शिक्षण घेणं पुरेसे नसते. वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलीदेखील सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहतात. त्यामुळे सहाजिकच शिक्षण त्यानंतर एखादे स्पेशलायझेशन त्यानंतर नोकरी आणि त्यातही स्थिरता मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न … या सार्या चक्रामध्ये मुली लग्नाचा विचार वयाच्या पंचविशीनंतरच घेतात. पण मग लग्न झाले की वर्षभरातच बाळाचा विचार कधी करताय ? या प्रश्नाचा तगादा कुटुंबीयांकडून केला जातो. ( नक्की वाचा : करियर आणि आरोग्य सांभाळू शकता मग ‘आई’ होण्याचा निर्णय 30शीच्या पार कशाला ?)
विशिष्ट वय उलटून गेले की बाळाचा विचार करणार्या जोडप्यांमध्ये गरोदरपणाच्या वेळेस अनेक दोष आणि समस्या निर्माण होतात. आईचे आणि बाळाचे आरोग्यही धोक्यात येते. अशी भीती अनेकांच्या मनात डोकावते. पण खरंच तिशीचा टप्पा उलटण्याआधी बाळाचा विचार केलाच पाहिजे. हा हट्टाहास गांभीर्याने घेण्याची गरज आहे का ? या तमाम तरूणींच्या मनातल्या प्रश्नाला Gynaecologist and Obstetrician from Ashwini Hospital, Mumbai चे डॉ विक्रम शहा यांनी हा खास सल्ला दिला आहे.
तिशीच्या आतील स्त्रियांची / मुलींची फर्टीलिटी ही उत्तम असते. वाढत्या वयानुसार त्यांचा दर्जा खालावत जातो. अंड्यांची निर्मिती होण्याचे प्रमाणही खालावते. परिणामी इन्फर्टीलिटीचा त्रास वाढतो. American Society of Reproductive Medicine च्या अहवालानुसार, वयाची तिशी पार केल्यानंतर स्त्री गरोदर राहण्याची शक्यता दर महिन्या गणिक 20% कमी होते. वाढत्या वयानुसार, 35शीच्या टप्प्यात गेल्यानंतर गरोदरपणामध्ये, बाळाच्या आरोग्यामध्ये गुंतागुंत वाढण्याची, गर्भपात होण्याची शक्यता अधिक वाढते. ( नक्की वाचा - गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !)
Nova IVI Fertility (NIF), च्या अभ्यासानुसार, 31 वर्ष आणि त्याहून अधिकच्या वयातील 68% तरूणी इन्फर्टीलिटीच्या समस्येवर उपचार घेतात. तर 31-35 या वयोगटातील 36 % आणि वयाची पस्तीशी पार केलेल्या सुमारे 32 % महिला इन्फर्टीलिटीच्या समस्येवर उपचार घेतात.
तुमची गर्भधारणा यशस्वी झाली तरीही ती टिकून राहणं आणि यशस्वीरित्या पूर्ण होणं कठीण असते. या वयात झपाट्याने शरीरात होणारे हार्मोनल बदल प्रि-मॅच्युअर डिलेव्हरी किंवा गर्भापाताचा धोका वाढवतात. म्हणूनच वयाच्या ३० नंतर गरोदर असणार्या स्त्रियांनी कटाक्षाने नियमित हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे.
उशीरा बाळासाठी प्रयत्न करणार्या स्त्रियांमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक प्रसुतीऐवजी सिझेरियनचा पर्याय सुचवला जातो. आईप्रमाणेच बाळाच्या आरोग्यालाही धोका असतो. त्यांच्यामध्ये जेनिटिक डिसऑर्डर निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच इतर चाचण्या आणि अल्ट्रा साऊंडच्या मदतीने बाळाच्या विकासावर, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा. यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !! पण स्त्री प्रमाणेच सुदृढ बाळासाठी पुरूषांचे ‘बाबा’ होण्याचे योग्य वय काय असावे ? हेदेखील जाणून घ्या.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – instagram