परीक्षा जवळ आल्याने टेन्शनमुळे तुम्हाला झोप लागत नाही? परंतु, तुम्हांला झोपेची गरज आहे. मग शांत झोप येण्यासाठी काही योगासने फायदेशीर ठरतील. अशीच काही योगासने योगा एक्स्पर्ट प्रग्या भट यांनी सांगितली. त्यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळून शांत झोप येण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला ५ मिनिटे खर्च करावी लागतील. तसंच ही आसने करण्यास देखील सोपी आहेत. या एक्सपर्ट टीप्सने कमी करा परीक्षेचा ताण !
Dangling pose
डॅंगलिंग पोजमुळे पाठीच्या कण्याला स्ट्रेच मिळेल आणि हृदयाची गती संथ होईल. पोटातील अवयवांना मसाज मिळेल आणि गॅस, ब्लॉटिंग या समस्यांवर आराम मिळेल. Bloating आणि पोटात गॅस वाढण्याच्या समस्येमागील ’10′ कारणं
हे आसन करण्यासाठी:
पायामध्ये खांद्यांइतके अंतर घेऊन सरळ उभे रहा आणि गुडघे काहीसे दुमडून कमरेतून पुढे झुका. डोकं जमिनीच्या दिशेला जाईल आणि हात जमिनीला टेकवा. शक्य तितका वेळ या आसनात रहा व सावकाश वर या. निद्रानाश टाळण्यासाठी करा ही ५ योगासने
हे आसन कोणी करू नये?
उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे आसने करणे टाळावे. जाणून घ्या: रक्तदाब,निद्रानाश यासारख्या समस्यांवर दीर्घश्वसन कसे ठरते फायदेशीर ?
Wide-knee child’s pose:
जीवनात कशाची तरी चिंता, काळजी प्रत्येकालाच असते. अशावेळी हे आसन केल्याने खूप फायदा होईल. मन शांत, स्थिर होण्यास मदत होईल. यकृताला मसाज मिळेल आणि पाठीच्या कण्यावरील ताण दूर होऊन शांत व आरामदायी झोप मिळेल. नक्की वाचा: ‘भुजंगासन’ करा आणि ताण-तणाव हटवा
हे आसन कसे करावे?
वज्रासनात बसा. गुडघ्यात शक्य तितके अंतर घ्या. हात वरच्या दिशेने ताणा आणि हळूहळू पुढे झुका. डोकं दोन्ही हातांच्या मध्ये जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. या आसनात कमीत कमी तीन मिनिटे राहण्याचा प्रयन्त करा. आता या आसनातून बाहेर येण्यासाठी हातांच्या आधाराने शरीराचा वरचा भाग वर उचलण्याचा प्रयन्त करा. पाठीवर अधिक ताण न देता हळूहळू वर येण्याचा प्रयन्त करा. जरूर वाचा: सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपाय
हे आसन कोणी करू नये?
अॅसिडीटी असल्यास, प्रेग्नेंट असल्यास किंवा पाठीच्या कण्याला दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. योगसाधनेतून करा पाठदुखीला अलविदा !
Image source: Getty Images, Shutterstock Images
Read this in English
Translated By –Darshana Pawar