उन्हाळात असह्य उन्हामुळे घामाच्या धारा,घामोळे,उष्णतेचे पुरळ अशा अनेक त्रासदायक समस्या वाढतात. सहाजिकच त्यामुळे या दिवसात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न अनेक नवमातांना सतावत असतो. उन्हाळ्यामुळे जरी तुमचे बाळ अस्वस्थ होत असले तरी काही खास उपाय करुन तुम्ही बाळाला नक्कीच आनंदी ठेऊ शकता.जाणून घ्या या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !
बाळाला उन्हाळ्यात देखील स्वस्थ ठेवण्यासाठी काही टीप्स-
बाळाला योग्य प्रकारचे कपडे घाला -
उन्हाळ्यात नेहमी सुती कपडेच घालावे.कारण बाळाला या दिवसांमध्ये इतर प्रकारचे कपडे घातल्यास त्याला घाम येतो व अस्वस्थ वाटू लागते.अशा अयोग्य कपड्यांमुळे तुमच्या बाळाला घामोळे आणि पुरळ देखील येऊ शकतात.तसेच सकाळी बाळाला घराबाहेर नेताना त्याला स्लीव्हलेस अथवा बिन बाह्यांचे कपडे कधीच घालू नका.अशा वेळी त्याच्यासाठी हलक्या,सुती व पूर्ण बाह्यांचे कपड्यांचीच निवड करा.उन्हाळ्यामध्ये बाळासाठी समर हॅट जरुर घ्या.मात्र त्या हॅटला इलॅस्टीक रबर नसेल याची काळजी घ्या कारण त्यामुळे बाळाच्या रक्ताभिरणामध्ये अडथळा येऊ शकतो.
सतत डायपर बदला-
खरेतर बाळाचा डायपर प्रत्येक तीन तासांनी बदलणे गरजेचे असते.उन्हाळ्यामध्ये मात्र याबाबत सतत सावध रहायला हवे कारण उन्हाळ्यात येणारा घाम व ओलसरपणामुळे बाळाला डायपर रॅशेस होण्याची दाट शक्यता असते.तसेच बाळाला नवीन डायपर घालण्यापूर्वी त्याचे गुप्तांग प्रथम स्वच्छ धुवून कोरडे करा व मगच त्याला नवीन डायपर घाला.यासाठी वाचा हे बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय
बाळ हायड्रेड राहील याची काळजी घ्या-
उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो.जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर त्याला वेळेवर दूध दिल्याने बाळ हायड्रेड राहण्यास मदत होईल.पण जर तुम्ही बाळाला बाहेरचे अन्न देत असाल तर लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये तुमच्या बाळाची भूक कमी होत असते.यासाठी त्याला फळांचा रस,ताक अथवा मिल्कशेक असे द्रवपदार्थ द्या.हे पदार्थ भरविण्यापूर्वी ग्लास काही मिनीटे फ्रीजमध्ये ठेवा पण ते फार थंड होणार नाही याची काळजी घ्या.एक प्लेट खिचडी अथवा पेज देण्यापेक्षा अशा थंड पण हेल्दी पेयांमुळे तुमच्या बाळाला अधिक आराम मिळेल.हे देखील जरुर वाचा उन्हाळ्यात डी-हायड्रेशन पासून बचावण्यासाठी खास ’9′ टीप्स !
तेल मसाज करणे टाळा-
उन्हाळ्यामध्ये तेल मसाज केल्याने त्वचेवरील तेलामुळे फायद्यांपेक्षा त्रासच अधिक होतो.कारण जर हे तेल व्यवस्थित स्वच्छ नाही केले नाही तर ते त्वचेच्या दुमडलेल्या भागात तसेच रहाते.ज्यामुळे तुमच्या बाळाला उष्णतेचे पुरळ,खाज,गळू अशा त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात.हे तेल नॅपीच्या भागात,गळ्याच्या मागच्या भागात,पाठ व खांद्यावर तसेच रहाते.यासाठी तुम्ही बाळाचे हे भाग चांगले स्वच्छ केले आहेत याची जरुर खात्री करा.तसेच बाळाच्या संपुर्ण शरीरावर खूप पावडर थापून ठेवणे टाळा.कारण घामामुळे ती पावडर ओली होते व त्वचा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. बाळाला मसाज करणे योग्य की अयोग्य ?हे जरुर जाणून घ्या.
नियमित वेळेवर अंघोळ घाला-
लक्षात ठेवा तुम्ही हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये बाळाला अंघोळ घालणे टाळू शकत नाही.त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुमच्या बाळाला नियमित स्वच्छ अंघोळ घाला.सायंकाळी तुम्ही बाळाला फक्त क्रीम मसाज करुन थंड पाण्याचा स्पंजबाथ करु शकता.ज्यामुळे त्याला रात्री शांत झोप लागेल.यासाठी वाचा लहान मुलांसाठी साबण आणि शाम्पू वापरायला सुरवात कधी कराल ?
बाळाला सकाळी बाहेर नेणे टाळा-
सुर्यप्रकाश टाळण्यासाठी बाळाला सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाहेर घेऊन जाऊ नका.मात्र सुर्यास्तानंतर तुम्ही बाळाला फिरायला नक्कीच घेऊन जाऊ शकता.कारण उन्हाळ्यामध्ये देखील तुमच्या बाळाला खेळण्याची तितकीच गरज असते.ज्यामुळे तुमच्या बाळाचे मेटॅबॉलीजम योग्य रहाते व त्याला भूक देखील चांगली लागते.जर तुमचे बाळ दोन वर्षांपेक्षा अधिक मोेठे असेल तर त्याला उन्हाळ्यामध्ये वॉटरस्पोर्टसाठी जरुर घेऊन जा.
घरातील तापमान नियंत्रित ठेवा-
जर तुम्ही घरामध्ये एसी वापरत असाल तर एसीचे तापमान दिवसभर समान २४ अंशावर राहील याची काळजी घ्या.कारण जर तापमानामध्ये जरा जरी बदल झाला तर तुमच्या बाळाला सर्दी-खोकला होऊ शकतो.तसेच बाळाला अंघोळ घातल्यावर लगेच एसीच्या थंड वातावरणामध्ये ठेऊ नका.जाणून घ्या बाळाला मोजे घालून झोपवणे योग्य आहे का?
घरामधील वातावरण स्वच्छ व हवेशीर ठेवा-
खिडक्या उघड्या ठेऊन घरातील वातावरण हवेशीर राहील याची काळजी घ्या.तसेच घरात आजूबाजूला अस्वच्छ साठलेले पाणी नसेल याची देखील काळजी घ्या.यासाठी घरात वेळच्यावेळी स्वच्छता राखा.कारण अस्वच्छ वातावरणामध्ये डेंग्यू व मलेरीयाचे डास तयार होत असतात.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock