Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तुमच्या पूर्वायुष्याबद्दल जोडीदाराला सांगताना या ’7′गोष्टींचे भान ठेवा !

$
0
0

जोडीदाराला तुमच्या पूर्वायुष्याबद्दल सांगताना खूप सावध राहणे गरजेचे असते.तुमच्या भूतकाळातील प्रेमप्रकरणाविषयी तुमच्या आताच्या जोडीदाराला माहित असणे हे जरी गरजेचे असले तरी त्यामुळे तुमच्या नात्यात कोणताही दुरावा येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.यासाठी अशा गोष्टी सांगताना सावधपणे काही गोष्टी आवर्जुन टाळणे आवश्यक आहे.तसेच लग्नाआधी या ७ गोष्टींबाबत जोडीदारासोबत जरुर बोला

तुमच्या जोडीदाराला तुमच्या एक्स बद्दल सांगताना या टीप्स जरुर पाळा-

  • महत्वाची गोष्ट त्याला जे तुमच्याकडून ऐकायला आवडेल तेच त्याला सांगा.तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या पार्टनरला थोडेफार ओळखत असाल तर तो ओपन-माईंडेड स्वभाचा आहे किंवा त्याला कोणती गोष्ट सांगितलेली आवडणार नाही हे तुम्ही थोडेफार समजू शकता.त्याप्रमाणे सावधपणे विचार करुन मगच एखादी गोष्ट सांगण्याची कृती करा.

  • त्याने तुमच्या आधी इतर मुलीसोबत रोमांचक लवलाईफ कधीही अनुभवले नसेल तर मात्र तुम्ही अधिक सावध रहाणे गरजेचे आहे.जर तो मनमोकळ्या स्वभावाचा नसेल तर तो ही गोष्ट कदाचित सकारात्मक दृष्टीकोनातून घेणार नाही.असे असले तरी तुम्ही त्यांना तुमच्या पुर्वीच्या प्रेमप्रकरणाविषयी सांगू शकता पण त्या नात्यातील सर्व छोट्या छोट्या गोष्टी त्याला सांगू नका.लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रीणीं समोर तुमच्या जुन्या प्रेमप्रकरणाच्या बढाया मारत नाही आहात तर हा तुमचा भविष्यातील जोडीदार आहे.

  • सेक्शुअल पार्टनर विषयी सांगणे जाणिवपुर्वक टाळा.कारण आता तुमची पुर्वीची सेक्शुअल नाती अथवा वन नाईट स्टॅड जास्त महत्वाची नाही आहेत.तुम्ही त्याबाबत त्याला कल्पना देऊ शकता पण अगदी सविस्तरपणे काहीच सांगण्याचा प्रयत्न करु नका. लाँग डिस्टंस रिलेशनशिप टिकवण्यासाठी या 5 टीप्स

  • पुर्वीच्या जोडीदाराविषयी प्रशंसा करून तुमच्या आताच्या जोडीदाराला कधीच कमी लेखू नका.उलट तुम्ही त्याला तो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे व तुम्ही त्याच्यासोबत आयुष्यभर कशा सुखी रहाल याची जाणिव करुन दिली पाहिजे.त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या एक्ससोबत कसा आनंद मिळवला हे त्याला सांगून आता काहीच उपयोग नाही.

  • जर ही तुमच्या रिलेशनशिपची नुकतीच सुरुवात असेल तर तुमच्या एक्ससोबत अनुभवलेल्या सेक्स फॅन्टेसी तुमच्या या जोडीदारासोबत कधीच शेअर करु नका.जर तुमचा जोडीदार सेक्सजीवनातील अशा थरारक गोष्टी तुमच्या सोबत करत नसेल तर त्याला तुमच्या इच्छा समजावून सांगा.हे ही जरुर वाचा सिंगल मुलींनो ! या ’6′ डेटिंग टीप्स टाळाच

  • तो बोलताना त्याच्या चेह-यावरचे भाव ओळखण्याचा प्रयत्न करा.त्याच्या चेह-यावरील भावमुद्रेनुसार तुमच्या सांगण्यामुळे तो निराश होत अाहे असे दिसत असेल तर ती गोष्ट त्याला जरा सकारात्मक पद्धतीने समजावून सांगा.पहिल्यांदा ‘डेट’वर असताना हे ’7′ प्रश्न अवश्य विचारा !

  • तुमच्या एक्स पार्टनर विषयी तुमच्या जोडीदाराला सांगताना तो तुझ्यासारखाच दिसायचा अथवा तुझ्यासारखाच विचार करायचा असे बोलू नका.कारण कोणालाही तुम्ही त्याची तुलना तुमच्या एक्स सोबत केलेली कधीच आवडणार नाही.तुमचं रिलेशन टिकून न राहण्याचे संकेत देतात ही ’5′ लक्षणं !

लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमचे संपुर्ण आयुष्य या व्यक्तीसोबत काढायचे असेल तर तुम्ही त्याला तुमच्या वर्तमानकाळ व भविष्यकाळाचा एक महत्वाचा हिस्सा म्हणून वागणूक द्यायला हवी.तुमच्या दोघांमधील नाते कायम असेच घट्ट रहाण्यासाठी तुमच्या भुतकाळातील गोष्टी त्याला अशा योग्य प्रकारे सांगा की ज्यामुळे त्याच्या भावना कधीच दुखावल्या जाणार नाहीत.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Youtube.com/ Zee Marathi


Viewing all articles
Browse latest Browse all 1563


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>