Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जोडीदार तुम्हाला फसविल्यानंतर ही ७ कारणं देऊ शकतो !

$
0
0

जोडीदाराकडून फसवणूक झाल्यास खूप मनस्ताप होतो.फसवल्यानंतर चुकीचे समर्थन देण्यासाठी त्याच्याकडे नेहमी काही ठराविक कारणे असतातच.एखाद्याने आपल्याला फसवले आहे ही भावना खुपच दु:खद असते.अशा भावनिक स्थितीत त्यांची चुक लपविण्यासाठी तो तुम्हाला काही विशिष्ट कारणे देऊन समजविण्याचा प्रयत्न करु लागतो.पण खरेतर हे प्रेम त्याने चूक करण्याआधी लक्षात घ्यायला हवे होते.कारण तुमची फसवणूक करताना त्यांनी ती युक्तीने केलेली असते.मात्र आता पकडले गेल्यावर त्यांच्याकडे काहीतरी कारण देण्याशिवाय पर्यायच नसतो. या ’10′ कारणांमुळे घ्यावा लागतो ‘ब्रेकअप’चा निर्णय !!

फसविल्यानंतर जोडीदार तुम्हाला ही कारणे देऊ शकतो - 

१.प्रवासात असल्यामुळे,तुम्ही त्यांच्यापासून दूर असल्यामुळे किंवा भावनांना आवरणे शक्य नसल्याने ही चूक घडली हे चूकीचे समर्थन करण्यामागचे एक कारण असू शकते.तसेच आता तर व्यक्ती आपल्यापासून खूप दूर असल्यामुळे तिला परत कधाही भेटणार देखील नाही असेही ते तुम्हाला सांगून ते तुमची दिशाभूल करु शकतात.

२. त्या दोघांमध्ये कोणतीही भावनिक जवळीक नाही.ते फक्त एका चुकीच्या क्षणी शारीरिक जवळीकीमुळे झालेले सेक्ससबंध होते.त्याचे पूर्वी व आता फक्त तुमच्यावरच प्रेम आहे असेही समर्थन तो करु शकताे.

३. ब-याचदा याबाबत नेहमी देण्यात असे स्पष्टीकरण देण्यात की मद्य घेतल्यामुळे त्याला नशेमध्ये काय व कसे घडले ते समजलेच नाही.

४.सेक्सटींग,व्हिडीओ सेक्स अथवा सायबर सेक्स करणे हे अयोग्य आहे.त्यामुळे ते तुम्हाला आम्ही एकमेकांनी स्पर्श देखील केला नाही फक्त बोलण्यातूनच अशा भावना निर्माण झाल्या असे देखील ते तुम्हाला सांगू शकतात.किंवा व्हर्चुअल सेक्स हा प्रत्यक्षात सेक्स नसल्याचे तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करु शकतात.व्हॉट्सअ‍ॅपवरील या ’10′ चूका नात्यास ठरतात मारक !

५. तुमचे भांडण झाल्यामुळे त्याने रागावून दुस-या महिलेसोबत सेक्स केले हे कारण ते तुम्हाला देऊ शकतात.पण तुम्ही त्यांच्यावर रागवल्यावर असे करु शकता का? मग त्याने देखील त्याचा भावनांचा निचरा करण्यासाठी हस्तमैथून करुन राग शांत करायला हवा.

६. ब-याचदा पुरुष असे कारण देतात की तीने मला उत्तेजित केले व जबरदस्ती केली.तुम्हाला खरेच वाटते का अशा ढोंगी पुरुषावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा.जरी कोणत्याही स्त्रीने त्याला सिड्यूस केले तरी तुमच्या जोडीदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवायला हवे होते.जर तो कोणत्याही परक्या स्त्रीकडून सिड्यूस होत असेल तर तो तुम्हाला सतत फसविण्याची शक्यता अधिक आहे.

७. तुमचा जोडीदार तुम्हाला सांगू शकतो की “तू नेहमी घर व मुले यांच्यामध्ये इतकी बिझी असतेच की तुला माझ्या सेक्शूअल गरजा समजून घेता येत नाहीत किंवा तुला मला हवा तसा सेक्समधला आनंद देता येत नाही.त्यामुळे आपण पुरेसे सेक्स करत नाही.” पण ही कारणे तुम्हाला फसविण्यासाठी योग्य आहेत का याचा नीट विचार करा.असे असेल तर तुम्ही एकत्र राहण्यात काय अर्थ आहे.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Youtube.com/ZeeMarathi


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>