Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कोणते मीठ आणि किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हितकारी ?

$
0
0

सलाड मध्ये अथवा फळांच्या फोडींवर चिमुटभर मीठ भुरभुरल्यास त्याला एक विशिष्ट चव येते.आजकाल बाजारामध्ये अनेक मीठांचे पर्याय उपलब्ध असतात.काही जण नेहमीचे टेबल सॉल्ट वापरण्यापेक्षा खडे मीठ वापरतात तर काही जण हिमालयीन मीठाचा वापर करतात.आजकाल पांढ-या रंगाचे व सोडियम कमी असलेले मीठ अधिक प्रमाणात वापरण्यात येते.त्यामुळे जर तुम्हाला देखील कोणते मीठ वापरावे याबाबत शंका असतील तर फिटनेस फस्ट इंडीयाच्या डायटीशन मिस रीना बालीगा यांच्याकडून जाणून घ्या मीठाचा नेमका कोणता पर्याय आरोग्यासाठी हितकारक आहे.

टेबल सॉल्ट आरोग्यासाठी हितकारक असते का ?

हिमालया मीठ,खडे मीठ,सैंधव मीठ किंवा समुद्री मीठा पेक्षा टेबल सॉल्ट मध्ये अनेक प्रक्रिया केल्यामुळे त्यातील मिनरल्स कमी होतात ज्यामुळे ते इतर मीठांपेक्षा कमी पोषक असते.टेबल सॉल्ट मध्ये फक्त एकच गोष्ट चांगली असते ती म्हणजे प्रक्रिया करताना त्यामध्ये आयोडीन योग्य प्रमाणात मिसळण्यात येते.

मात्र या मीठाच्या अति सेवनामुळे शरीरातील पाणी कमी होते तसेच किडनीवर दाब येतो.भरपूर पाणी शरीराबाहेर गेल्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्सचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही.  या ’8′ मार्गाने नकळत आहारात वाढते मीठ !

टेबल सॉल्ट की हिमालय मीठ,सैंधव मीठ,खडे मीठ आणि समुद्री मीठ-

सर्व प्रकारच्या मीठांमुळे शरीराचा पीएच संतुलित राहणे,गॅस व जळजळ कमी करणे,पचनाला चालना देणे हे फायदे होतात.पण हिमालय मीठामुळे अन्नाला अधिक चांगली चव येते.याचे कारण असे की फक्त याच मीठात ११८ मिनरल्सपैकी ८४ ते ९२ मिनरल्सचे घटक आढळतात.तसेच ते १०० टक्के नैसर्गिक असते.ते अनरिफाईंड असल्यामुळे त्यात प्रदुषित व सोडीयम घटक कमी असतात.हे मीठ मेडीकल थेरपी साठी देखील वापरण्यात येते.

तुम्ही निरनिराळ्या आरोग्य समस्यांसाठी निरनिराळे मीठ वापरु शकता.

जसे की सैंधव मीठ  अॅनिमिया आणि गालगुंड या समस्या झालेल्या रुग्णांसाठी उत्तम असते कारण त्यामध्ये लोह व आयोडीनचे घटक असतात.तर हिमालया मीठ उच्चरक्तदाब   व ऑस्टिओपोरोसिस या विकारांवर उपयुक्त ठरते कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स असतात.समुद्री मीठ कफ कमी करण्यासाठी व रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते.तर खडे मीठ मधुमेहींसाठी उपयुक्त असते कारण त्यातील घटक इन्सुलीनला सक्रीय करण्यास मदत करतात. आहारातील मीठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पाळा ही ’5′ गुपितं !

मीठाचे योग्य प्रमाण किती असावे?

वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनाजेशनच्या सल्लानूसार आपण योग्य प्रमाणातच मीठ सेवन केले पाहीजे.त्यांनी सांगितलेले योग्य प्रमाण म्हणजे दिवसभरात २ ग्रॅम मीठ सेवन करणे कारण मानवी शरीराला दिवसभर फक्त ५०० ग्रॅम सोडियमची गरज असते जी यातून भागविली जाऊ शकते.एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या संशोधनानूसार भारतीय ब्लूएचओ ने दिलेल्या प्रमाणापेक्षा ११९ टक्के अधिक मीठ सेवन करतात.असे आढळले आहे की भारतीय लोक दिवसभरात १०.९८ ग्रॅम मीठाचे सेवन करतात जे दिलेल्या योग्य प्रमाणाच्या पाचपट अधिक अाहे.एक चमचा मीठ म्हणजे ६ ग्रॅम मीठाचे प्रमाण ज्यामध्ये २३०० मिग्रॅ सोडियम घटक असतात.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अर्धा चमचा मीठाचे सेवन करणे योग्य असू शकते.

तसेच यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मीठाचा पर्याय निवडू शकता फक्त टेबल सॉल्ट मध्ये थोड्या कमी सोडियम घटक असतात.पण याचा अर्थ तुम्ही हे मीठ अधिक प्रमाणात सेेवन करु शकता असा होत नाही.रीना यासाठी टेबल सॉल्ट २ ग्रॅम पेक्षा कमी व हिमालया सॉल्ट २ ते ४ ग्रॅम पेक्षा जास्त न वापरण्याचा सल्ला देतात.(एक चमचा हिमालय मीठामध्ये ४०० मिग्रॅ सोडियमचे घटक असतात)

खडे मीठ,सैंधव मीठ आणि समुद्री मीठामध्ये टेबल सॉल्टप्रमाणेच सोडियमचे घटक असल्याने ते देखील २ ग्रॅम पेक्षा अधिक सेवन करु नये.तसेच टेबल सॉल्ट पेक्षा इतर मीठांचे पर्याय हेल्दी असले तरी त्यांच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे देखील खूप महत्वाचे असते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>