सेलिब्रिटीजचा आपल्यावर नेहमीच प्रभाव पडत असतो.त्यांच्यासारखे दिसण्यासाठी आपल्याकडून नकळत प्रयत्न केले जातात.कदाचित तुम्हाला देखील कंगना राणावत सारखा कर्ली लूक करावा असे वाटू शकते.
पण या कर्ली लूकसाठी जर तुम्ही घरीच केस कर्ल करण्याचा विचार करत असाल तर मात्र सावध रहा.कारण घरी केस कर्ल करताना केसांची खूप काळजी घेणे आवश्यक आहे.कारण स्ट्रेटनींग पेक्षा कर्लींग करताना अधिक मेहनत व योग्य तंत्रज्ञान वापरण्याची गरज असते.
आजकाल बाजारात केस कर्ल करण्यासाठी अनेक साधने सहज उपलब्ध असतात.या साधनांमुळे केस कर्ल करणे खूप सोपे देखील झाले आहे.
पण तरीही घरीच केस कर्ल करताना तुम्ही या काही गोष्टींची काळजी जरुर घ्या-
हेअर पॅटर्न-
केस कर्ल करण्याचे अनेक प्रकार असतात.त्यामुळे तुम्हाला केसांना कशा प्रकारचे कर्लींग करायचे आहे ते प्रथम निवडा.लूज कर्ल्स,रीबन कर्ल्स,टाईट कर्ल्स असे हेअर कर्लींगचे अनेक प्रकार अाहेत.तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडल्यावर केस कर्ल करण्यासाठी त्या प्रकाराला योग्य असलेला कर्ल टूल अथवा साधन मात्र जरुर वापरा.तसेच केस कलर करण्याचा विचार करत असाल तर हे घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय ! जरुर करुन बघा.
तापमान-
लक्षात ठेवा ३०० ते ३५० degree Fahrenheit हे केस कर्ल करण्याचे योग्य तापमान आहे.मात्र तापमान त्या पलीकडे गेल्यास तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते.
कर्लींग टूल ची साईज-
केस कर्ल करण्याच्या प्रकाराप्रमाणेच कर्लींग टूल ची साईज देखील खूप महत्वाची आहे.उदा.जर तुम्हाला राउंड बाउन्सी कर्ल्स हवे असतील तर थीन कर्लींग आर्यनचा चुकूनही वापर करु नका.
केस करण्यापूर्वी हेअर स्प्रे वापरु नका-
जर तुम्हाला असे वाटत असेल की कर्ल करण्यापूर्वी केसांना भरपूर हेअर स्प्रे वापरल्याने कर्ल्स बराच काळ तसेच राहतील तर तुम्ही फार चुकीचा विचार करताय.अगदी तो हेअर स्प्रे अगदी खास केसांचे कर्ल्स बराच काळ टिकावेत यासाठी जरी तयार केलेला असला तरी तो वापरणे टाळा.कारण त्यामुळे तुमचे कर्ल्स बिघडणार नाहीत पण तुमचे केस मात्र नक्कीच खराब होऊ शकतात.यासाठी तयार करा चमकदार आणि मऊसूत केसांसाठी घरगुती ‘ हेअर स्प्रे’ !
डायरेक्शन-
केस वरुन खाली की खालून वर किंवा मध्यापासून कसे कर्ल करण्यास सुरु करावेत यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात.खरेतर कर्ल्सच्या प्रकारानूसार ते कुठून कर्ल्स करण्यास सुरु करावेत हे ठरत असते.जर तुम्ही कर्ल्सचा कोणताही विशिष्ट प्रकार करणार नसाल तर सामान्यत: केसांच्या मध्यभागापासून कर्ल करण्यास सुरु करावेत.चमकदार आणि मजबूत केसांसाठी अंड्याचे घरगुती हेअरपॅक जरुर वापरुन बघा.
केस थंड होऊ द्या-
केसांवर कोणत्याही गरम साधनाचा वापर केल्यावर ते थंड करणे खूप गरजेचे आहे.केस कर्ल करताना जरी तुमचे केस गुंतले असले तरी केस थंड होईपर्यंत केसांना हात लावू नका.
गुणवत्ता महत्वाची -
केसांसाठी चांगल्या दर्जाचे सिरॅमिक कर्लींग आर्यनच खरेदी करा.कारण स्वस्त व कमी दर्जाच्या साधनांनी तुमचे नुकसानच अधिक होऊ शकते.चांगल्या परिणामांसाठी चांगल्या दर्जाच्याच वस्तू खरेदी करा.हे देखील जरुर वाचा केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
या हेअर टीप्सचा तुम्हाला कितपत फायदा झाला हे आम्हाला जरुर कळवा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock