Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदर स्त्रियांनी कसा घ्यावा होळीचा आनंद ?

$
0
0

गरोदरपण हा एक आनंदाचा,नवनिर्मितीचा काळ असतो.होळीचा सण साजरा करताना गरोदर महिलांनी काही विशेष काळजी घेतल्यास त्यांना या उत्सवाचा आनंद नक्कीच लुटता येऊ शकतो. उदा. काही ब्रॅन्डेड रंग हे नैसर्गिक व ऑरगॅनिक रंग असले तरी ते हानिकारक देखील असू शकतात हे तुम्हाला माहित आहे का? ‘नॉन टॉक्सिक’ रंगांनी होळी खेळणं कितपत सुरक्षित ?

दिल्ली मधील मॅक्स हॉस्पिटच्या गायनेकॉलॉजीस्ट डॉ.अनुराधा कपूर यांच्या मते नैसर्गिक रंग हे फुले व फळांपासून तयार करण्यात येतात पण या पावडर स्वरुपात असणा-या रंगामध्ये शिसे व पारा मिसळण्यात आलेला असतो.त्यामुळे अशा रंगाचा तुमच्या गर्भावर विपरित परिणाम होऊ शकतो.

तुम्हाला जर रंगपंचमीचा आनंद घ्यायचा असेल तर काही गोष्टींची दक्षता जरुर घ्या-

जर तुम्ही गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये असाल-

या स्थितीत तुमचे पोट दिसत नसल्यामुळे तुम्ही या सणाच्या निमित्ताने ही गोड बातमी सर्वांना सांगू शकता.पण जर तुम्हाला इतक्यात ही बातमी कोणालाही सांगायची नसेल तर मात्र हा सण जरा सावधपणेच साजरा करा.या सणातील रंग व अन्न यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला मळमळ किंवा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊ शकतो.तसेच जास्त दगदग केल्याने तुम्हाला थकवा व मरगळ देखील येऊ शकते.जर तुम्हाला रंगपंचमी साजरी करणे फारच आवडत असेल तर घरच्या घरीच फक्त काही जवळच्या लोकांना बोलावून एक छोटेखानी गेट-टूगेदर करुन ती साजरी करा.ज्यामुळे तुम्हाला जास्त दमायलाही होणार नाही व सणाचा आनंद देखील घेता येईल.तसेच हेही वाचा होळीच्या रंगांनी केसांचे नुकसान टाळण्यासाठी जावेद हबीब यांच्या खास टीप्स !

जर तुम्ही गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीमध्ये असाल-

या स्थितीत सर्वांना तुम्ही गरोदर आहात याबाबत पुरेशी जाणिव झालेली असल्याने सर्वजण तुमची काळजी घेतीलच पण तुम्ही देखील स्वत:ची विशेष काळजी घ्या.नातेवाईक व मित्रमैत्रिणींना भेटताना स्वत:ला जपा.सण साजरा करताना धावणे अथवा भांग पिणे अशा गोष्टी करु नका.यापेक्षा सावधपणे नैसर्गिक व कोरडी रंगपंचमी खेळा व लवकर आपल्या घरी परत जा.

जर तुम्ही गरोदरपणाच्या तिस-या तिमाहीमध्ये असाल-

तुम्हाला हालचाल करणे कठीण होत असेल किंवा जर तुमचा प्रसूतीकाळ जवळ आला असेल तर रंग व सण साजरा करण्यापासून दूर राहणे हेच तुमच्यासाठी योग्य आहे.पण जर तुम्हाला अशा स्थितीतही रंगपंचमीचा आनंद लुटायचा असेल लांब बसून रंगाची उधळण बघण्याचा आनंद घ्या.तुम्ही स्वत:ला अगदी सौम्य रंग लावून घेणे हे ठीक आहे पण रंगाचा अतिरेक होणार नाही याबाबत काळजी घ्या.कारण या काळात तुमची रोगप्रतिकार शक्ती फार कमी झालेली असते ज्यामुळे या रंगामुळे तुम्हाला एखादी अॅलर्जी अथवा समस्या निर्माण होऊ शकते.

रंगपंचमीसाठी योग्य रंगाची निवड कशी कराल?

गरोदरपणात रंगाची निवड करण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स-

रंगपंचमीसाठी रंग निवडताना ते होममेडच असतील याची काळजी घ्या.घरातील स्वयंपाकातील वस्तू व फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या यापासून असे रंग तयार करता येतात.होममेड रंगामुळे तुम्हाला त्या रंगातील घटकपदार्थ समजू शकतात.डॉक्टरांच्या मते तुम्ही हे घरगुती रंग हळद,कुंकू,उकडलेले बीट अाणि कांदा अशा गोष्टींपासून जरुर बनवू शकता.परंपरेनूसार चंदन अथवा केशराचा टिळा बाळाच्या कपाळी लावून हा सण साजरा करण्यात येत असे.डॉक्टरांचा मते असे घरी केलेले हे रंग हानिकारक देखील नसतात.़तज्ञांच्या मते स्तनपान करणा-या नवमातेने देखील याबाबत बाळाची विशेष काळजी घ्यायला हवी.कारण केमिकलयुक्त रंग हे कृत्रिम घटक,औद्योगिक रंग व ऑक्सीडाइज धातूपासून तयार केलेले असतात.ज्यामुळे स्तनपान करणा-या बाळांसाठी ते हानिकारक ठरु शकतात.यातील काही रंगामुळे कर्करोग देखील होण्याची शक्यता असते.त्यामुळे गरोदर महिलांप्रमाणेच स्तनपान करणा-या मातेने देखील रंगाबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी .घरच्या घरीच बनवा होळीचे रंग आणि बिनधास्त लूटा आनंद !

जर तुम्ही हर्बल कलर वापरणार असाल तर त्यांच्यावर दिलेले लेबल जरुर वाचा.Gurgaon’sColumbia Asia Hospital च्या कन्सल्टंट गायनेकॉलॉजीस्ट डॉ.चेतना जैन यांच्यामते आजकाल नैसर्गिक रंग ही संकल्पना फारच उथळपणे वारपण्यात येते त्यामुळे रंग निर्मितीच्या नियमांवर संशय घेणे स्वाभाविक आहे.उदा.नैसर्गिक हीना अथवा मेंहदी सुरक्षित अाहे असे मानले जाते.पण paraphenylendiamine युक्त काळ्या मेंहदीमुळे तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते.कदाचित अशा रंग मिसळलेल्या मेहंदीच्या पाकिटावर ती नैसर्गिक आहे असे देखील लिहीलेले असू शकते.त्यामुळे गरोदर महिलांनी फक्त घरगुती रंग वापरणे हेच त्यांच्या हिताचे असू शकते.

डॉ.जैन यांच्या मते बाजारातील रंगाच्या गुणवत्तेबाबत असेलेले नियंत्रण अचूक नसल्याने हर्बल असे लिहीलेल्या अथवा सुरक्षित असे समजल्या जाणा-या रंगामध्ये देखील भेसळ असण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे असे रंग अवधानाने गिळले गेल्यास अथवा त्वचेमध्ये शोषले गेल्यास तुमच्या गर्भाला त्रास होऊ शकतो.एकतर गरोदर स्त्रीची रोगप्रतिकार शक्ती फारच कमी झालेली असते तसेच तिची त्वचा देखील खूपच सवंदेनशील असते त्यामुळे रंगामुळे या काळात तिला इनफेक्शन होणे अथवा ती आजारी पडणे या शक्यता वाढू शकतात.हे जरुर वाचा होळीचे रंग डोळ्यात-तोंडात गेल्यानंतर काय करावे ?

खाताना सावध रहा-

पारस हॉस्पिटलच्या गायनेकॉलॉजीस्ट डॉ.अंजली कुमार यांच्यामते तुम्ही सणसमारंभात जे अन्न खात आहात त्याबाबत फार सावध रहा.सहाजिकच यासाठी तुम्ही जड व तेलकट अन्न खाणे टाळणे गरजेचे आहे.कारण या अन्नामुळे तुम्हाला अपचन व छातीत जळजळ होऊ शकते.तसेच यासोबत उत्तेजीत पेय टाळा व स्वत:ला हायड्रेट ठेवा.चहा,कॉफी,कोला अशा कॅफेनयुक्त पेयांपासून देखील दूर रहा.कशा कराल होळीसाठी हेल्दी आणि टेस्टी रव्याच्या पुरणपोळ्या !

डॉ.जैन यांच्या सल्लानूसार अशा वेळी गरोदर स्त्रीने योग्य फिटींगचे कपडे,अॅन्टी-स्कीन शूज व गॉगल वापरावे.पाण्यामध्ये खेळताना पडण्याची व घसरण्याची शक्यता असल्याने सावध राहावे व मोठ्या व्यक्तींचा आधार घ्यावा.त्वचेवर मॉश्चराइजर व केसांना तेल लावावे.ज्यामुळे तुमचा रंग लवकर निघण्यास मदत होईल.तसेच मुलांच्या सेफ होळीसाठी या ’10′ टीप्स नक्की लक्षात ठेवा !!

घराबाहेर जाताना काय काळजी घ्याल-

डॉ.कपूर यांच्यामते रंगपंचमीमध्ये घराबाहेर देखील रंगाच्या फुग्यांपासून वाचण्यासाठी या काळात गरोदर स्त्रीने घराबाहेर जाताना एखादी छत्री सोबत घ्यावी.त्याचप्रमाणे स्तनपान करणा-या मातेने रंगपंचमीनंतर स्वत:चे अंग स्वच्छ धुवावे कारण असे न केल्यास स्तनपान करताना अंगावरील रंग बाळाच्या पोटात जाऊ शकतो.थोडक्यात नवमाता असो अथवा भावीमाता सर्वांनी थोडीशी काळजी घेतली तर त्यांना या सणाचा आनंद लुटणे सहज शक्य आहे.त्यामुळे काळजी घ्या व आनंदी रहा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>