महाराष्ट्रासह देशभरात ‘डेंग्यू’चा प्रसार वाढतोय. अशावेळी प्रत्येकाला काळजी घेणं गरजेचे आहे. म्हणूनच त्याच्या लक्षणांसोबतच त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी नक्की पाळा या खास 10 टीप्स …
- दिवसाची सुरवात फळांनी करा -
तुम्हांला खाण्याची इच्छा होत नसल्यास किमान फळं खावीत. फळांमधून शरीराला एनर्जी मिळते. 7-8 तासांच्या आरामानंतर शरीराला सफरचंद, मोसंबी अशी फळं किंवा रस प्या. (मॉन्सूनमध्ये तुमचं आरोग्य सांभाळतील ही ’10′ फळं !)
- हलका-फुलका आहार, नाश्ता घ्यावा -
नाश्त्याला पोहे, उपमा, इडली असे पोषक आणि हलके पदार्थ खावेत. त्यामुळे आवडीनुसार खा म्हणजे तुमचे प्लेटलेट्स वाढतील.
- औषध वेळेवर घ्यावीत -
तुम्हांला वेळेवर औषधं घेणे गरजेचे आहे. त्याची एक्पायरी डेट पाहून घ्या. तसेच प्रिस्काईबनुसार औषधांचा वेळा पाळा.
- थोडे पण विशिष्ट वेळाने खात रहा -
हॉस्पिटलमधून डीस्चार्ज मिळाल्यानंतरही रुग्णांना थकवा जाणवतो. त्यामुळे तुम्हांला विशिष्ट वेळाने थोडे-थोडे खात रहाणे गरजेचे आहे. यामुळे शरीर औषधांना उत्तमप्रकारे प्रतिसाद देईल व तो आजार पलटण्याची किंवा गुंतागुंत वाढण्याची शक्यता कमी होईल.
- भरपूर पाणी प्या -
सतत पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र तुम्हांला हा प्रकार कंटाळवाणा वाटत असल्यास साध्या पाण्याऐवजी शहाळयाचे पाणी, फळांचा रस किंवा साखर मीठाचे पाणी प्या. यामुळे डीहायड्रेशनच्या त्रासापासून तुमचा बचाव होईल. तासा-तासाला पाणी पिण्याची सवय ठेवा यामुळे तोंड सुकणे किंवा शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होईल.
- जंक फूड टाळा –
सतत निरस जेवण जेवणामुळे तुम्हांला काही चटकदार किंवा चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल.मात्र त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.अन्यथा तब्येत सुधारण्याची प्रक्रिया मंदावेल. म्हणूनच मधल्या वेळेत भूक लागल्यास सुकामेवा, मनुका, खजूर खावेत.
- रात्रीचे जेवण 8 पूर्वी घ्या -
रात्रीच्यावेळी 8 वाजण्याच्या आसपास जेवण करा. त्यानंतर औषधं घ्यायची असतात. त्यामुळे झोपेच्या आणि खाण्याच्या वेळेत पुरेसे अंतर राहील. परिणामी पचन सुधारेल.
- आरोग्यदायी सवयी लावा -
औषधगोळ्यांमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे फायबरयुक्त आहार, सुप्स, पेजचा समावेश करा. चहा / कॉफी टाळा.
- आराम करा -
थकवा, कमजोरपणा यावर मात करण्यासाठी आराम करणे गरजेचे आहे. या दिवसात थकवणारे व्यायाम टाळा. तसेच औषध घेऊन मगच झोपा.
- फॉलो अप करायला विसरू नका –
तुमच्या औषधांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना नक्की भेटा. तसेच रक्ताची चाचणी आवर्जून करून घ्या. कारण अनेकदा डेंगू परतण्याची शक्यतादेखील असते.
संबंधित दुवे -
तापाचा अशक्तपणा टाळणारे ’7′ सुपरफूड्स !
भाताची पेज रोज पिण्याची ’5′ हेल्दी कारणं
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - 10 step guide for speedy recovery from dengue
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.