नच बलिये सिझन 7 चे विजेतेपद पटकावल्यानंतर आता अमृता खानविलकर ‘झलक दिख ला जा- रिलोडेड’ च्या एका विशेष भागात पुन्हा थिरकताना दिसणार आहे. चमकदार त्वचा आणि कमनीय बांधा असलेली अमृता इतकी फीट राहते कशी हा प्रश्न तुम्हांलाही पडलाय ना? मग जाणून घ्या तिची ‘ एक्सक्लुझिव्ह फीटनेस सिक्रेट्स’ …
डान्स कधीच सोडणार नाही
अमृता खानविलकरच्या आयुष्यात ‘नृत्या’ला एक विशेष आणि आदाराचे स्थान आहे. ‘मला केवळ डान्सच फीट ठेवू शकतो’ असे तिचे म्हणणे आहे. वर्क आऊट सोबतच अमृता आठवड्यातून किमान 3-4 दिवस नृत्याचा सराव करते. सद्ध्या अमृता कन्टेम्पररी आणि हिप-हॉप डान्सचे अधिकृतपणे शिक्षण घेत आहे. त्यामुळे ‘नच बलियेमधून मला नृत्याचे विशेष शिक्षण मिळाले आणि आता मी नृत्य कधीच सोडणार नाही. तसेच भविष्यातसुद्धा मला वेगवेगळे डान्स प्रकार शिकायला आवडतील त्यामुळेच मी फीट राहीन’ असा मानस अमृताने व्यक्त केला आहे.
घरचं जेवणच मला अतिशय प्रिय
‘डान्स आणि वर्क आऊट नियमित सुरू केल्यानंतर स्टॅमिना आपोआपच वाढतो’. त्यासाठी विशेष डाएट पाळत नसल्याचं अमृता सांगते. नच बलियेमुळे अमृताचा स्टॅमिना वाढला आहे. मात्र आता तो कमी होणार नाही याबाबत ती जागृत राहण्याचा प्रयत्न करते. बाहेरचे खाण्याची फारशी शौकीन नसलेली अमृता घरच्या जेवणाचीच दिवानी आहे. घरचं जेवण हे परिपूर्ण आणि उत्तम असल्याने भात-डाळ, पोळी-भाजी सारे काही अमृता खाते. यामध्ये डाएटच्या नावाखाली कशाचीच टाळाटाळ नसते.
वर्कआऊट गरजेचा
खाण्याच्या बाबतीत कोणतेच विशेष बंधन न पाळणारी अमृता मात्र वर्क आऊटच्या बाबतीत मात्र फारच दक्ष असते. फक्त जिम किंवा एखादाच विशिष्ट व्यायाम अमृताला आवडत नाही. ‘कधी जिम, तर कधी स्विमिंग असे वेगवेगळे प्रकार मला करायला आवडतात.सोबतीला घरी डान्सची प्रॅक्टीस आहेच’ असे अमृता सांगते. (वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !)
‘कोल्ड शॉवर’ माझा स्ट्रेस बस्ट्रर
ताण-तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. मात्र तो दूर करण्याचा अमृताचा फंडा म्हणजे – आंघोळ ! ‘थंड पाण्याने आंघोळ करणे हा माझ्यासाठी स्ट्रेस ब्लस्टर’ असल्याचे अमृता सांगते. यामुळे त्वचेचे सौंदर्य सुधारते, मनाला शांतता मिळते तसेच थकवाही कमी होत असल्याने अमृता ताण हलका करण्यासाठी हा पर्याय स्विकारणे पसंत करते.
‘मेंटल प्रेशर’ कमी करण्यासाठी मित्रमंडळी हवीच !
प्रत्येकाची ‘मेंटल प्रेशर’ हलकं करण्याची पद्धत वेगवेगळी असते. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळताना येणारं ‘मेंटल प्रेशर’ मोकळं करण्यासाठी अमृता मैत्रिणींना भेटते, खूप सिनेमे पाहते, लोकांमध्ये मिसळते. यामुळे तिचा ताण हलका होण्यास मदत होते.
खा, प्या, मजा करा – अमृताचा खास ‘फ़ीटनेस संदेश’
‘वर्कआऊटला पर्याय नाही.’ हा अमृताचा ठाम विश्वास आहे. वेळीच आरोग्याची काळजी घेतली तरच आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. त्यामुळे व्यायाम करा. खा, प्या, मस्त रहा. खाण्यावर कुठलीच अनावश्यक बंधन घालू नका. मात्र त्यानंतर व्यायाम करायला मुळीच विसरू नका.
संबंधित दुवे
मी कधीच फेशियल, ब्लिचिंग केलं नाही : तेजस्विनी पंडीत ( Exclusive Beauty Secrets )
व्यायाम ‘सिक्स पॅक अॅब ‘साठी नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठी करा: भूषण प्रधान
छायाचित्र सौजन्य –Instagram / Amruta Khanvilkar
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.