Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

त्वचेला नुकसान न पोहचवता हाताला लागलेले ग्रीस कसे काढावे ?

$
0
0

तुमच्या हातांना कधी ग्रीस लागलंय ? एखाद्या मशीनला किंवा शटरच्या पट्टीला चुकून हात लागतो आणि हाताला ग्रीस लागते. मग साबणाने खूप वेळ हात घासले तरी ग्रीस निघत नाही. याउलट हात रफ होतात आणि त्वचा निघू लागते. इतर वेळेस आपण त्वचेची अनेक प्रकारे काळजी घेतो.  पण यावर काय करावे ते आपल्याला समजत नाही. पण त्वचा तज्ज्ञ नंदीता दास यांनी हाताला नुकसान न पोहचवता लागलेले ग्रीस काढून हात स्वच्छ करण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. जाणून घ्या: त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे

पायरी १: तेल लावा.

यासाठी फक्त बॉडी ऑइल वापरा. emulsifier सोबत बॉडी ऑइल लावा त्यामुळे ग्रीस पूर्णपणे निघण्यास मदत होईल. त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय

तेल सौम्य असल्याने वापरण्यास सुरक्षित ठरेल व त्यामुळे मृत त्वचा निघाल्यास मदत होईल. तेलाने त्वचा सौम्य व मऊ होईल. तसंच त्वचेवर सुरक्षित आवरण तयार होऊन धुळीपासून त्वचेचे संरक्षण होईल. म्हणून ग्रीस लागल्यावर हातांना बॉडी ऑइल लावा आणि हात न धुता पुसा. नखांची वाढ आणि सौंंदर्य वाढवण्यासाठी असा करा ऑलिव्ह ऑईलचा वापर

पायरी २: स्क्रब करा.

साबणाने हात जोरजोरात घासण्यासापेक्षा घरगुती स्क्रब बनवा. त्यासाठी मधात चमचाभर साखर घाला आणि हातावर चोळा. या घरगुती स्क्रबने पोर्स ओपन होऊन त्वचा खोलवर स्वच्छ होते. तसंच यामुळे मृत त्वचा निघून जावून त्वचा मऊ होते. जरूर वाचा: नखांजवळील काळवंडलेली त्वचा कशी दूर कराल ?

दुसरे स्क्रब बनवण्यासाठी अर्ध्या लिंबाच्या रसात २ चमचे ऑलिव्ह ऑइल आणि २ चमचे ब्राउन शुगर घाला. हातावर हलकासा मसाज करून १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर हात धुण्याआधी pumice stone हातावर चोळा आणि बफरने बफ करा. बोटं आणि नखं साफ करण्यासाठी तुम्ही टूथब्रशचा देखील वापर करू शकता. नैसर्गिकरित्या वाढवा नखांची शुभ्रता !

पायरी ३: मॉइश्चरायझर लावा

स्क्रब केल्यानंतर तुमचे हात थोडे रफ होऊ शकतात. म्हणून त्यावर चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर ग्लोज घालून शांत बसा. झोपताना ग्लोज घालून झोपल्यास त्वचेतील मॉइश्चर टिकून राहील. नक्की वाचा: या ’5′ संकेतांवरून ओळखा तुमचे मॉईश्चरायझर झाले ‘Expire’ !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>