अन्न शिजवताना त्यात वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांवर पदार्थाची पौष्टिकता अवलंबून असते. त्यासाठी आरोग्यदायी पदार्थ कोणते? कोणते पदार्थ शिजवून किंवा कच्चे खावेत. याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जेव्हापासून कच्चे पदार्थ खाण्याचा ट्रेंड आला आहे तेव्हापासून बरेचजण अनेक पदार्थ कच्चे खाऊ लागले आहेत. Eat Rite 24×7 च्या न्यूट्रीशियनिस्ट करिष्मा चावला यांनी कोणते पदार्थ कच्चे खावे व कोणते शिजवून यावर मार्गदर्शन केले. स्वयंपाकघरातील या ’6′ गोष्टींमुळे बिघडू शकते तुमचं आरोग्य !
- फळे:
फळे शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खाणं केव्हाही उत्तमच. कारण शिजवल्यास त्यातील कॅलरीज वाढतात. फळांचा रस पिण्याऐवजी अख्खे फळ खाणे योग्य ठरेल. फळांच्या रसामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल. त्याचप्रमाणे साखरेऐवजी फळे खा. उदा. दही गोड करण्यासाठी त्यात साखरेऐवजी फळे घाला. टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !
- Beans:
बीन्स शिजवून खाणे योग्य ठरेल. कारण त्यामुळे पचनास मदत होते आणि शरीरातील व्हिटॅमिनचे प्रमाण वाढते. कच्चे बीन्स पचनास जड असतात.
- भाज्या:
भाज्यांमधील व्हिटॅमिनचे प्रमाण राखण्यासाठी त्या उकळून खाण्यापेक्षा वाफवून खा. भाज्या उकळल्याने त्यातील वॉटर सोल्युबल बी, सी ग्रुप आणि अनेक मिनिरल्स निघून जातात. म्हणून भाज्या वाफवणे योग्य. कधीतरी भाज्यांचे तळलेले पदार्थ देखील आहारात घ्या. त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. भाज्या मायक्रोवेव्ह शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन बी६ नष्ट होते. म्हणून भाज्यांचे वाफवलेले व सौम्य तळलेले पदार्थ खाणे योग्य ठरेल. खाण्यापूर्वी फळं/ भाज्या कशाप्रकारे धुणे गरजेचे आहे ?
- मटण, चिकन व मासे:
यातून पुरेसे प्रोटीन मिळण्यासाठी हे पदार्थ बेक, ग्रिल्ड आणि कधीतरी तळून खा. मटण ग्रील करताना त्यात अगदी थोडेसे तेल घाला. एक मासा दुसऱ्या माशाला खात असल्याने (परजीवी) कच्चे मासे खाणे टाळावे. त्याचबरोबर अन्न अधिक शिजवल्याने त्यातील व्हिटॅमिन्स नष्ट होतात. कच्ची अंडी देखील खाऊ नका. कारण त्यातून बॅक्टरीया, व्हायरस यांसारखे इन्फेकशन होऊ शकते. जे अंड शिजवल्यास नष्ट होतात. या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव !
- धान्य:
धान्य शिजवून खा. कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखले जाईल. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल. रिफाईंड पीठ खाणे टाळा. त्यातून शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि अनावश्यक फॅट्स वाढीस लागतात. त्याचप्रमाणे साखर आणि प्रोसेस्ड रिफाईंड कार्ब्स घेणे टाळा. या पदार्थांमधून कमी प्रमाणात पोषकघटक आणि अधिक कॅलरीज मिळतात. अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांनीही , वजन ठेवा काबूत!
- Cereals:
रेडी तो इट सिलियल्स थंड दूध किंवा दह्यातून घेत असाल तर त्याचे प्रमाण कमी करा. कारण त्यात छुप्या स्वरूपात साखर असते.
कुकींग टीप्स:
- पदार्थ तळून खाऊ नका. त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतात.
- स्वयंपाकासाठी राईस ब्रान ऑइल, ऑलिव्ह ऑइल, शेंगदाण्याचे तेल वापरणे अधिक उत्तम. हे तेल हेल्दी असून त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
- सोयाबीन मध्ये phytoestrogens असल्याने शरीरातील फिमेल हार्मोन्सचे प्रमाण वाढते. म्हणून पुरुषांनी सोया युक्त पदार्थ नियमित खाणे टाळावे.
- मिठाचे प्रमाण शक्य तितके मर्यादीत ठेवा. यामुळे ब्लड प्रेशर आणि वॉटर रिटेन्शन सारख्या समस्या आटोक्यात राहण्यास मदत होईल.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock