Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

$
0
0

प्रसूतीनंतरचा काळ बऱ्याच महिलांसाठी फार कठीण असतो. प्रसूतीनंतर वजन वाढते, स्नायू आखडले जातात, सांधेदुखी, पाठदुखी, चिंता, काळजी, हार्मोनल चेंजेस, उच्च रक्तदाब, एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे येणारा अशक्तपणा या सगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतरचे ४० दिवस थोडे कठीण असतात. स्त्री शारीरिक व भावनिकरीत्या कमजोर होते आणि बाळाप्रमाणे तिला देखील प्रेमाची, पुरेसं लक्ष देण्याची गरज भासते. सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !

या काळात काही महिला फार खंबीर राहू शकत नाही आणि लहानसहान गोष्टींवरून त्या चिडचिड करू लागतात. हे फार सामान्य आहे आणि मी आतून गेली आहे, असे योगा टीचर मेघना कल्टा म्हणाल्या. यावर योगसाधना अत्यंत उपयुक्त ठरते. माझे सिझरियन झाले. पण त्या शारीरिक त्रासावर योगा आणि ध्यानधारणा याने पुष्कळ फायदा झाला. मन शांत आणि स्थिर होण्यास मदत झाली, असे कल्टा म्हणाल्या. वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना

प्राणायाम किंवा श्वसन प्रकार:

प्रसूतीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यात मी हळहळू आसने करू लागले. ध्यान आणि प्राणायामापासून सुरुवात केली. उज्जायी, भ्रामरी, नाडी शोधन यांसारखे प्राणायाम केले. नाडी शोधन प्राणायाम प्रसूतीनंतर सलग सहा महिने केला. त्यामुळे मी लवकर पूर्ववत झाले आणि मला अधिक प्रसन्न वाटू लागले. अनेक आजारांना दूर सारतील प्राणायमाचे हे ’8′ प्रकार !

योगमुद्रा:

प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर योगमुद्रा अत्यंत फायदेशीर ठरतात. आयुर्वेदानुसार कोणताही त्रास दूर करण्यासाठी योगमुद्रा परिणामकारक मानल्या जातात. मुद्रा केल्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागांना ऊर्जा मिळते. आपल्या प्रत्येक बोटात निसर्गातील एक तत्त्व आहे. आणि ते प्रत्येक तत्त्व शरीरात एक ठरविक आणि महत्त्वाचं कार्य करतं. आपली बोटं इलेकट्रीक सर्किट सारखं काम करतं. मुद्रांमुळे वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, आकाश या तत्त्वांचा समतोल राखून शरीरातील ऊर्जेचा प्रवाह योग्य राखला जातो. झटपट रिफ्रेश होण्यासाठी करा ‘पृथ्वीमुद्रा’

चीन मुद्रा:

  • अंगठा आणि तर्जनी एकमेकांना हलकेच जोडून ठेवा, बाकीची तिन्ही बोटे मोकळी ठेवा.
  • अंगठा आणि तर्जनी हलकेच जोडून ठेवा. त्यावर अतिरिक्त दाब देऊ नका.
  • बाकीची तीन बोटे शक्य तितकी सरळ ठेवा.
  • आता दोन्ही हात वरच्या दिशेला तोंड करून मांड्यांवर ठेवा.
  • श्वसनाचा प्रवाह आणि परिणाम अनुभवा. मेरूदंड मुद्रा करा आणि स्ट्रेस फ्री व्हा !

चिन्मयी मुद्रा:

ही मुद्रा करण्यासाठी अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडा आणि त्याची रिंग बनवा. बाकीची तीन बोटे आतल्या बाजूला दुमडा. हात वरच्या दिशेकडे तोंड करून मांड्यांवर ठेवा. दीर्घ व खोलवर श्वास घ्या आणि श्वासाकडे लक्ष केंद्रीत करून त्याचा परिणाम अनुभवा.

आदी मुद्रा:

या मुद्रेत अंगठा आतल्या बाजूला दुमडा. (अंगठा करंगळी जवळ येईल अशापद्धतीने दुमडा.) आता बाकीची चार बोटे त्यावर दुमडून मूठ वळा. वळलेल्या मुठी मांड्यांवर ठेवा (वरच्या दिशेने तोंड करून) आणि श्वासाकडे लक्ष द्या. वायुमुद्रा- शरीरातील वात कमी करण्याचा नैसर्गिक उपाय !

ब्रह्म मुद्रा:

ही मुद्रा करण्यासाठी प्रथम आदी मुद्रा करा. नंतर हात एकत्र जोडून वरच्या दिशेला तोंड करून नाभीजवळ ठेवा आणि श्वसन चालू ठेवा. व्हिडीयो : योगा – वजन घटवण्याचा राजमार्ग

टीप्स:

  • योग मुद्रा करताना वज्रासन किंवा पद्मासनात बसा. ते शक्य नसल्यास खुर्चीवर आरामात बसा. बऱ्याचशा मुद्रा करताना उज्जायी प्राणायाम करणे योग्य मानले जाते.
  • प्रत्येक मुद्रेत १२ वेळा श्वसन करा आणि शरीरात चालणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
  • या मुद्रा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा सल्ला दिला जातो.
  • सहा महिन्यांनंतर तुम्ही काही बेसिक आसने करू शकता.

प्रसूतीनंतर वाढणारे वजन:

वाढलेले वजन कमी करून पुन्हा शेप मध्ये येणे, वाढलेले पोट कमी करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्याचा परिणाम माझ्या पाय व गुडघ्यांवर होऊ लागला होता. प्रसूतीनंतर सहा महिन्यांनी नियमित योगसाधना आणि सूर्यनमस्कार केल्याने मी वजन कमी करू शकले. असे कल्टा यांनी सांगितले. सिझरियन होऊन देखील योगसाधना आणि ध्यानधारणेमुळे माझे आयुष्य सोपे, सुलभ झाले. प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स लेझर उपचारांनी दूर करता येतात का?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>