गर्भारपणात आणि स्तनपानाच्या काळात स्त्री च्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच तिने काय खावे, काय खाऊ नये यासंबंधी अनेक सल्ले दिले जातात. गरोदर स्त्रीने दोन जीवांंसाठी म्हणजे नेमके किती खावे ? परंतु, पाणी किती प्यावे याबद्दल फार कमी बोलले जाते. स्तनपानाच्या काळात हायड्रेट राहणे गरजेचे आहे. आईच्या दुधात अँटीबॉडीज, मिनरल्स, इतर पोषकघटकांबरोबरच पाणी देखील असते. म्हणून या काळात आईने हायड्रेट राहणे अत्यंत गरजेचे आहे. स्तनपान देणा-या मातेला हे ९ सल्ले अजिबात देऊ नका !
स्तनपानाच्या काळात मातेला ५०० कॅलरीज अधिक लागतात. परंतु पॅकेज फूड्स आणि इतर प्रिर्झ्वेटिव्हज घातलेल्या पदार्थांमधून ही गरज भागवली जात नाही. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
स्कुल ऑफ नर्सिंग, के. जे. सोमय्या कॉलेजच्या प्राचार्य अवनी ओक यांच्या सल्ल्यानुसार अन्नामुळे आईच्या दुधाचा दर्जा सुधारतो. म्हणून स्तनपानाच्या काळात आहारात हेल्दी बदल करणे गरजेचे आहे. यासाठी पालेभाज्या, फळे, फायबर युक्त पदार्थ, दुधाचे पदार्थ याचा आहारात समावेश करा आणि भरपूर पाणी प्या. स्तनपान देणार्या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !
मातेने दिवसभरात १.५ – २ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु, काही वेळेस पुरेसे पाणी प्यायले जात नाही किंवा त्याच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणे कठीण होते. यासाठी उत्तम उपाय म्हणजे दिवसभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी बाळाला दूध पाजण्यापूर्वी किंवा पाजल्यानंतर एक किंवा अर्धा ग्लास पाणी प्या. गरोदरपणात हाता-पायावर येणार्या सूजेमुळे पाणी कमी प्यावे का ? यामुळे पाण्याची गरज तर भागवली जाईल. त्याचबरोबर सामान्यपणे स्तनपान करताना येणारा आळस, कंटाळा दूर होण्यास मदत होईल, असे डॉ. ओक म्हणाल्या. स्तनपानाच्या काळात बाळाचे कमी वजन ही तुमच्या चिंतेची बाब आहे का?
स्तनपानाच्या काळात थकवा जाणवला किंवा काही काम आल्यास अनेकजणी मुलांना बाटलीने दूध देणे पसंत करतात. म्हणजे डिहायड्रेशनमुळे तुम्ही असा निर्णय घेण्यास प्रवृत्त होता. परंतु, पहिले सहा महिने बाळाला आईचे दूध देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याबरोबरच ताक, फळांचा ताजा रस, भाज्यांचे सूप यांसारखे पदार्थ अवश्य घ्या. या १० कारणांसाठी एक वर्षापेक्षा लहान बाळाला गायीचे दूध देऊ नका !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock