Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

World Kidney Day 2017- किडनी डायलिसीस बाबतचे 5 समज-गैरसमज !

$
0
0

किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात अतिरिक्त टॉक्सिन्स जमा होतात ज्यामुळे त्या रुग्णाला जीवन जगणे अक्षरश: कठीण होते.यावर उपचार करण्याचा उत्तम उपाय म्हणजे किडनी प्रत्यारोपण करणे हा होय.पण रुग्णाची शारीरिक अवस्था,किडनी दान करणारा दाता मिळणे व प्रत्यारोपणाची भिती अशा अनेक गोष्टींमुळे हा उपचार करणे अशक्य होते.त्यामुळे अशा रुग्णाला डायलिसीसवर ठेवणे हाच एक एकमेव पर्याय असू शकतो.मात्र आजही लोकांमध्ये डायलिसीस उपचारांबाबत अनेक गैरसमज असतात.झेन हॉस्पिटलचे Consultant Nephrologist and Kidney Transplant Physician डॉ. विश्वनाथ बिला यांच्याकडून जाणून घेऊयात डायलिसीस बाबत अशा काही सत्य गोष्टी ज्या सर्वांनाच माहित असणे आवश्यक आहे.लक्षात ठेवा किडनी खराब होण्याची ही आहेत ‘५’ कारणंं

सत्य १-डायलिसीस प्रक्रिया वेदनादायक नसते-

अनेकजणांना असे वाटत असते की शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी डायलिसीस मशिन शरीराला जोडणे फारच त्रासदायक असेल.पण खरेतर डायलिसीस ही प्रक्रिया मुळीच वेदनादायक नसते.तसेच जर या प्रक्रियेत तुम्हाला काही वेदना जाणवल्याच तर तुम्ही हॉस्पिटलच्या स्टाफला त्याबाबत सांगू शकता ज्यामुळे मशिनच्या सेट-अपमध्ये एखादी चुक झाली असल्यास ती त्यांच्या लक्षात येईल.मागील काही दशकांमध्ये डायलिसिस ही प्रक्रिया अत्यंत सुलभ व वेदनारहीत झाली आहे.पूर्वी डायलिसीस करण्यासाठी रुग्णाच्या भगेंद्रामध्ये सुया टोचाव्या लागत असल्याने वेदना होत असत पण कालांतराने या प्रक्रियेमध्ये फार सुधारणा झाली.

सत्य २-डायलिसीस वर असलेल्या रुग्णांचे आयुष्य कमी होत नाही-

किडनी प्रत्यारोपणासाठी दाता न मिळाल्यास रुग्णाकडे किडनी डायलिसीस हा पर्याय उरतो.तर काही जणांना अवयव प्रत्यारोपणाची भिती वाटते त्यामुळे त्यांना डायलिसीवर रहावे लागते.किडनी डायलिसीवर रहाणे म्हणजे आयुष्य कमी होणे असे नव्हे कारण रुग्ण डायलिसीस करुन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढल्यावर निरोगी आयुष्य नक्कीच जगू शकतो.किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय न निवडता केवळ डायलिसीस करुन देखील एखादी व्यक्ती किमान २५ वर्षे निरोगी आयुष्य जगू शकते.जाणून घ्या किडनीविकारांमध्ये डायलिसीसचा पर्याय कधी निवडला जातो ?

सत्य ३-डायलिसीसमुळे रुग्णाला दैनंदिन जीवनातील संघर्षाला झुंज देण्यास मदत होते-

एकदा तुम्ही डायलिसीवर गेलात की तुम्हाला तुमचे काम,प्रवास असे दैनंदिन जीवन जगणे शक्य नाही असे नसते.फक्त तुमची नित्याची कामे करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामांचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे अाहे.लक्षात ठेवा कोणीही दिवसरात्र डायलिसीसवर असत नाही कारण तसे करण्याची मुळीच गरज नसते.चांगले आयुष्य जगण्यासाठी रुग्णाने आठवड्यातून किमान १२ तास डायलिसीस साठी देणे गरजेचे आहे.याचा अर्थ आठवड्यातून तीन वेळा चार तास तुम्हाला डायलिसीससाठी द्यावे लागतात.पण एखाद्याने यापैकी एक वेळचे जरी नियोजन चुकवले तर मात्र त्याला गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सत्य ४-डायलिसीस मुळे रुग्ण कमजोर होत नाही.

एकदा रुग्णाच्या शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकले की काही काळ त्या रुग्णाला उत्साही व निरोगी जीवन जगण्यास मदत होते.पण असे असले तरी या काळात त्याने त्याचा आहार व द्रवपदार्थांच्या बाबतीत त्याला सांगण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.शरीराची काळजी घेण्यासाठी व आरोग्य समस्या टाळण्यासाठी रुग्णाला योग्य आहाराची मदत होत असते.यासाठी हे जरुर वाचा किडनी विकाराच्या रुग्णांसाठी ११ डाएट टीप्स

सत्य ५-डायलिसीस रुग्णावर देखील किडनी प्रत्यारोपण उपचार करता येतात-

डायलिसीस करण्याचा अर्थ असा नव्हे की त्या रुग्णाला आयुष्यभर डायलिसीसवरच राहावे लागणार.कारण त्या दरम्यान जर त्याला किडनी दान करणारी एखादी व्यक्ती भेटली तर त्याला किडनी प्रत्यारोपण उपचारांनी पुन्हा जीवनदान मिळणे शक्य असते.त्यामुळे फक्त दाता मिळेपर्यंतच त्या रुग्णाला डायलिसीसची प्रक्रिया नियमित करणे गरजेचे आहे.यासाठी वाचा डायलिसीस की किडनी ट्रान्सप्लान्ट – किडनीविकाराच्या रुग्णांनी नेमका कोणता पर्याय कधी निवडावा ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>