त्वचा तेलकट असेल तर व्हाईटहेड्स वाढण्याचा धोका अधिक असतो. प्रत्येकवेळेस तुम्हांला त्यांना साफ करण्यासाठी पार्लरमध्ये जायला मिळेलच असे नाही. मग अशावेळी दालचिनीची पावडरने घरच्या घरीच व्हाईटहेड्सची समस्या दूर करा. दालचिनीमुळे तुमच्या त्वचेचा पोत आणि आरोग्य सुधारण्यासही मदत होते. ( तेलकट त्वचेसाठी 5 उपयुक्त फेसवॉश )
दालचिनीचे फायदे -:
- दालचिनीमुळे त्वचेवरील मृत पेशी, घाण, मळ निघण्यास मदत होते.
- कोलेजनच्या निर्मितीला चालना मिळाल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
- त्वचेवरील छिद्र मोकळी करून अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत होते.
- अॅक्नेची समस्या असणार्यांमध्ये व्हाईट हेड्सचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. दालचिनीमधील अॅन्टीबॅक्टेरियल घटकांमुळे अॅक्नेचा त्रास कमी करण्यास मदत होते.
उपाय #1 -:
- चमचाभर दालचिनीची पावडरमध्ये समप्रमाणात ओट्सची पावडर मिसळा.
- यामध्ये पाणी मिसळून पेस्ट तयार करा.
- त्वचेवर ही पेस्ट लावून 2-3 मिनिटे हलका मसाज करा.
- त्यानंतर 10-15 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
उपाय #2-:
- चमाचाभर मध आणि कोरफडीचा गर एकत्र करा.
- या मिश्रणामध्ये चिमूटभर दालचिनीची पावडर मिसळा.
- 15 मिनिटे हा पॅक सुकू द्यावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
हे दोन्ही उपाय आठवड्यातून 2-3 वेळेस वापरा. तसेच चेहर्यावर दालचिनीचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून पहा.
संबंधित दुवे -
घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !
‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Use cinnamon to get rid of whiteheads at home
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.