Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांसमोर या ’5′गोष्टी करणे टाळाच !

$
0
0

लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्यांना जसं वळण द्यावा तशी ती घडत जातात. म्हणून लहान मुलांसमोर वावरताना मोठ्या व्यक्तींनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून नकळत आजूबाजूच्या लोकांचे  अनुकरण केले जाते.

1. शिव्या / अपशब्द टाळवेत -

बोलण्यापूर्वी विचार नक्की करावा. कारण 5-16 वयोगटातील मुलांची आकलनक्षमता मजबूत असते. त्यांच्यासाठी शब्दाच्या अर्थाशिवाय त्याचा वापर आवश्यक असतो.  “f-word” किंवा तत्सम भाषा मुलं पटकन शिकतात. त्यामुळे तुम्ही बोलताना विचार करा.

2. नकारात्मकता टाळा –  

लहान मुलांची निरीक्षणक्षमता उत्तम असते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांप्रमाणेच घरातील व्यक्तींचेदेखील ते निरीक्षण करत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्या- बोलण्याचा मुलांवर परिणाम होत असतो. ‘नाही’,’नको’, ‘अशक्य’ अशा सतत नकारात्मक शब्दांसोबत अपशब्दांचा वापर टाळा. अशा शब्दांमुळे आपणच आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतो. मुलांवर अशा नकारात्मक स्थितीत वाढवू नका. त्यांना चुकू द्या, धडपडू द्यावे. म्हणजे ते अधिक शिकू शकतात.

3. राग व्यक्त करण्यापूर्वी विचार करा - 

मुलांसमोर पालकांनी भांडण करणं, रागात मोठ्याने बोलणे धोकादायक ठरू शकते. तुमची मुलंदेखील नातेवाईकांसमोर , मित्रमंडळींसमोर अशाच प्रकारे राग व्यक्त करू शकतात.

4. ग़ॉसिप करणे टाळा - 

मुलांसमोर चुगली किंवा गॉसिप करणे टाळा. मुलांना त्यांच्या निरागसपणाचा आनंद घेऊ द्या. मुलांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काही गोष्टींची जाणीव करून द्या. 12-16 वयोगटात तुमची मुलं असल्यास त्यांना तुमच्यापेक्षा अधिक माहिती असण्याची शक्यता असते.

5. त्यांच्यावर कशाचा ठप्पा मारू नका -

‘असे वागल्यास बाप्पा तुला शिक्षा करेल’ किंवा ‘ असे वागल्यास तुला आम्ही नवीन काहीच घेणार नाही’. त्यांना मूर्ख, वाईट अशा विशेषणांचा ठप्पा मारू नका. कोणीच सर्वगुणसंपन्न नसते. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या चुकांमधूनच शिकते. मुलांनाही ती संधी द्या. मात्र त्यादरम्यान त्यांच्या आत्मासन्मानाला ठेच पोहचवू नका. त्यांना टोमणे मारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळू शकतो. (मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा)

  • नव्याने आई- बाबा झालेल्यांसाठी खास टीप्स :

आयुष्यात नव्याने होणार्‍या गोष्टींना चांगल्या आणि वाईट बाजू असतातच. त्यामुळे त्रासदायक स्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. संभाषणाने आणि समजूतदारपणाने समस्या सोडवा. संयमाने अनेक प्रश्नांवर मात करता येते.

संबंधित दुवे -

या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !

व्हिडियो: लहान मुलांच्या मनात नेमकं दडलयं काय ?

कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  5 things you should never say in front of kids EVER

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>