एखाद्या दिवशी अचानक तुम्हाला कळलं की तुमचा मुलगा/मुलगी पॉर्न बघतो. तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? स्वाभाविकच तुम्ही चिडाल, रागवाल. तुम्हाला काळजी वाटेल. टेन्शन येईल. सेक्स बद्दलची मुलांची उत्सुकता स्वाभाविक आहे. पण पॉर्न बघणं ही मुलांची सवय झाली तर? मुलांना सामान्य वाटणारी ही गोष्ट कालांतराने गंभीर रूप धारण करेल. कारण इंटरनेटवर मुलं बघत असलेल्या पॉर्नमध्ये सेक्सचे अत्यंत विदारक आणि अवास्तविक स्वरूप दाखवले जाते.आणि हेच चिंतेचे कारण आहे.
परंतु, ही गोष्ट अतिशय नाजूक असल्याने याबद्दल मुलांशी कसे बोलावे हा प्रश्न अनेक पालकांच्या डोक्यात असतो. यावर मुलांना कसे समजवावे ? याबद्दल चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. शुची दळवी यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे अशी परिस्थिती हाताळणे आणि सेक्सबद्दलचा मुलांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल.
- परिस्थिती हळुवारपणे हाताळा: तुमच्या मुलाला पॉर्नची माहिती त्याच्या फ्रेंड्स कडून मिळाली असेलच आणि कदाचित तो/ती पॉर्न बघत असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे याविषयावर बोलताना तटस्थ राहून बोला. मुलाला लाज वाटावी हा तुमचा उद्देश नाही, हे प्रथम लक्षात घ्या. सेक्सबद्दल वाटणारी उत्सुकता नैसर्गिक असली तरी त्यावर पॉर्न बघणं हा उपाय नाही, हे तुम्ही मुलांना सांगायला हवं. जर तुमच्या बोलण्याने तिला/त्याला लाज वाटली तर ते संभाषण टाळतील. मुलांमध्ये पौगंडावस्था लवकर येण्याची 5 प्रमुख कारणंं
- बोलण्यात सकारात्मकता ठेवा: पॉर्न मध्ये प्रेम किंवा नातं याबद्दल काहीही न दाखवता सेक्स हा त्याचा महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर त्यात दाखवले जाणारे सेक्स हे कृत्रिम आणि कल्पनेच्या पलीकडचे असते. हे मुलांना समजावून सांगा. प्रेम, नातं, हेल्दी सेक्स याचे महत्त्व पटवून सांगा.
- पॉर्नमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टीबद्दल सांगा: पहिल्या सेक्सची भावना किती सुंदर, तरल असते, हे मुलांना सांगा. पॉर्न मध्ये दाखवले जाणारे सेक्सचे स्वरूप हे अत्यंत अनैसर्गिक आणि अवास्तविक असते, हे पटवून देण्यासाठी त्याबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजेच शूटिंग टेक्निक्स, मेकअप, इत्यादी. त्यामुळे खऱ्या आयुष्यातील सेक्स स्क्रीनवर दिसणाऱ्या सेक्सपेक्षा वेगळे असेल, याची कल्पना मुलांना येईल. कारण ते अक्टर्स आहेत आणि ते त्यांच अॅक्टींग करण्याचं काम करतात. त्यामुळे आपल्या खऱ्या आयुष्यातही सेक्स करताना तसंच होईल, हा चुकीचा समज आहे. या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !
- मुलांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून द्या: मुलांनी काय पाहिले आणि त्याबद्दल त्यांना काही प्रश्न आहेत का, असे मुलांना विचारा. त्याचबरोबर त्यांना समजावून सांगा की पॉर्न मध्ये दाखवलेल्या गोष्टी सुरक्षित आणि नैसर्गिक नाही. मुलांना त्यांचा मर्यादांची जाणीव करून द्या. सेक्सबद्दलची माहिती ते मिळवू शकतात पण पॉर्न न बघता हे बंधन मुलांना घालून द्या. मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग !
अशी परिस्थिती हाताळणं खरंच खुप अवघड आहे. मुलं कदाचित या गोष्टीकडे गंभीर आणि सकारात्मक दृष्टीने बघणार नाहीत. पण तुम्ही त्यांच्या कलाने घेऊन मुलांना समजावले तर उशिरा का होईना मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि भविष्यात ते तुमचे आभार मानतील. तुमची मुलं लपून सिगारेट, ड्रग्ज घेतात का ? हे ओळखण्याचे ’9′ संंकेत
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock