होळी हा रंगांचा सण आहे. पण कृत्रिम रंगांनी होळी खेळणे काहीसे धोकादायक आहे. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच डोळे, फुफ्फुसे यांना इजा पोहचू शकते. म्हणून होळी खेळताना शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि सुरक्षित होळी खेळा. परंतू, काही वेळेस नकळत रंग नाका-तोंडात किंवा डोळ्यात जाऊ शकतात. अशा वेळी काय करावे हे आपल्याला माहित नसते. तर यावर माहीमच्या फोर्टीज हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी मार्गदर्शन केले आहे.
डोळ्यांसाठी:
जर कोरडे रंग डोळ्यात गेले तर सगळ्यात आधी डोळे पाण्याने धुवा. पूर्ण रंग निघून जाईपर्यंत डोळे स्वच्छ धुवा. यासाठी गरम किंवा थंड पाणी न वापरता साधे पाणी वापरा. कारण अधिक थंड किंवा गरम पाण्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. रंग डोळ्यात गेल्यानंतर स्वाभाविकपणे आपण डोळे चोळू लागतो. पण त्यामुळे अधिक त्रास होऊन डोळ्यातून पाणी येऊ लागेल. म्हणून डोळे चोळू नका. डोळे स्वच्छ धुतल्यानंतर त्यात मॉइश्चराइजिंग आयड्रॉप्स घाला. त्यामुळे डोळ्यांचा त्रास कमी होऊन आराम मिळेल. ‘नॉन टॉक्सिक’ रंगांनी होळी खेळणं कितपत सुरक्षित ?
त्वचेसाठी:
रंग लावल्यानंतर त्वचेला खाज किंवा कोणताही त्रास होऊ लागल्यास त्वचेचा तो भाग पाण्याने धुवा व त्यावर मॉइश्चरायझर लावा. जर त्वचा लाल झाली किंवा त्वचेला खाज येऊ लागल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची भेट घ्या. घरच्या घरीच बनवा होळीचे रंग आणि बिनधास्त लूटा आनंद !
काही वेळेस त्वचेचा संपर्क रंगातील केमिकल्सशी आल्यास अॅलर्जी होण्याची संभावना असते. त्यावर अँटी अॅलर्जी औषधंच परिणामकारण ठरतील. परंतु, त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. होळी खेळताना तुम्हाला जर एखादी जखम झाली तर ती पाण्याने स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घ्या आणि मग त्यावर अँटिसेप्टिक क्रीम लावा. इन्फेकशन पासून बचाव करण्यासाठी जखमेवर बँड एड लावा. मुलांच्या सेफ होळीसाठी या ’10′ टीप्स नक्की लक्षात ठेवा !!
तोंडात रंग गेल्यास:
तोंडात रंग गेल्यास सर्वप्रथम पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे तोंडात गेलेला सर्व रंग बाहेर निघेल. त्याचप्रमाणे रंगांच्या संपर्कात आलेला किंवा रंग लागलेला कोणताही पदार्थ खाऊ नका. होळी खेळताना मध्ये काही खाण्याची वेळ आल्यास हात स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नका. कारण रंग पोटात गेल्यास हानीकारक ठरतील.
चुकून रंग पोटात गेल्यास किंवा अस्वस्थ वाटू लागल्यास डॉक्टरांची भेट घ्या. स्वतःबरोबरच इतरांची ही काळजी घ्या आणि सुरक्षित होळीचा आनंद लुटा.
उन्हात रिकाम्या पोटी खूप वेळ होळी खेळल्याने चक्कर येण्याची शक्यता असते. त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा: चक्कर आल्यानंतर कोणते प्रथमोपचार कराल ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock